मुंबई, 8 डिसेंबर: आजकाल तरुणांमध्ये सोलो ट्रिपचा खूप ट्रेंड आहे. सोलो ट्रिपमध्ये, एखादी व्यक्ती एकटीच प्रवास करते आणि ठिकाणांना भेट देते. धावपळीच्या जीवनात लोकांना हिंडायला कमी वेळ मिळतो. असं अनेकदा घडते की तुम्हाला सहलीला जायचं असतं परंतु तुमचं कुटुंब किंवा मित्र कामात गुंतल्यामुळं प्रवासाची योजना पुढे ढकलावी लागते. त्याचबरोबर आणखी एक विषय असतो, तो म्हणजे बजेट…कमी बजेटमुळे लोकांना प्रवासाला जाता येत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सहलीला जायचं असेल आणि तुमच्याकडे वेळ आणि पैसा मर्यादित असेल, तर तुमच्यासाठी सोलो ट्रिप हा एक चांगला पर्याय आहे. पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जात असाल, तर कमी वेळेत आणि कमी पैशात प्रवासाचा आनंद कसा लुटता येईल, हे तुम्हाला माहीत असायला हवं. बजेटमध्ये सोलो ट्रिपचा प्लॅन करण्यासाठी येथे काही टिप्स सांगणार आहोत. सोलो ट्रिपला जाण्यापूर्वी प्रवाशाला किती पैसे लागतील ते जाणून घेऊया. प्रवास करण्यापूर्वी बजेट तयार करा- तुम्ही सोलो ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर कमी पैशात प्रवास करण्यासाठी आधीच बजेट बनवा. वाहतूक भाड्यापासून मुक्काम आणि प्रवास इत्यादींपर्यंतचं सर्व बजेट सेट केल्यानंतरच तुम्ही त्या मर्यादित रकमेत सहलीला जाऊ शकता. जर तुम्ही जवळच्या हिल स्टेशनवर जात असाल तर 5000 ते 8000 हजार रुपयांमध्ये तुम्हाला अप्रतिम प्रवासाचा आनंद लुटता येईल. हेही वाचा: Holiday 2023 : पुढील वर्षी सुट्ट्याच सुट्या! आत्ताच करा लाँग वीकेंडचं नियोजन, वर्ष होईल यादगार प्रवासासाठी कोणतं वाहनाचा करावा उपयोग? जर तुम्हाला कमी पैशात प्रवास करायचा असेल तर तुमच्या पोहोचण्यासाठी स्वस्त वाहतूक निवडा. तुम्ही रेल्वेनं प्रवास करू शकता, कारणं रेल्वेचं तिकीट खूप कमी असतं. याशिवाय तुम्ही बसनंही प्रवास करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बनारसला जायचं असेल तर आधी तुमच्या शहरापासून बनारसपर्यंत बस आणि ट्रेनचे भाडे किती आहे ते शोधा. 500 ते 1000 रुपयांमध्ये तुम्ही दिल्ली ते बनारस ट्रेन किंवा बसने सहज प्रवास करू शकता. आगाऊ तिकीट बुक करूनही तुम्ही आरामदायी प्रवासाचा आनंद घेऊ शकता. हॉटेल बुकिंग- सोलो ट्रिपला जात असल्यास किंवा प्रवास करत असल्यास, स्थानिक ठिकाणं अधिक चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी अधिक लक्झरी हॉटेल्स निवडू नका. त्यापेक्षा बजेट लक्षात घेऊन हॉटेल घ्या. यासाठी आगाऊ हॉटेल बुक करा. बजेट हॉटेल बुक केलं म्हणजे हॉटेल खराब असेल असं नाही. लक्षात ठेवा की, तुम्ही त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार आहात. त्यामुळं तुम्हाला हॉटेलमध्ये खूप कमी वेळ घालवायचा आहे. त्यामुळे हॉटेल आलिशान असण्याची गरज नाही.
स्थानिक वाहतूक- तुम्ही शहर किंवा पर्यटन स्थळाच्या सहलीला जाता तेव्हा खाजगी टॅक्सीऐवजी सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर्स थोड्या पैशासाठी तुम्हाला स्थानिक ठिकाणी घेऊन जातात. उदाहरणार्थ, जर तुम्ही मथुरा-बरसाना सहलीला गेलात तर तुम्ही ऑटो रिक्षाने प्रवास करू शकता. मथुरा वृंदावनच्या रस्त्यांवरील ऑटो चालक तुम्हाला 500 रुपयांमध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आणि ठिकाणी घेऊन जाऊ शकतात.