जाहिरात
मराठी बातम्या / ट्रॅव्हल / मुलींनो Solo Trip वर जायचंय, तर मग भारतातील ही शहरं आहेत सर्वात सुरक्षित

मुलींनो Solo Trip वर जायचंय, तर मग भारतातील ही शहरं आहेत सर्वात सुरक्षित

फाईल फोटो

फाईल फोटो

आपल्या देशात अशा अनेक जागा आहेत, अनेक ठिकाणं आहेत, जी मुलींना एकट्याने फिरायला पूर्णतः सुरक्षित आहेत.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 21 एप्रिल : देशात वाढत्या क्राइममुळे पालक आपल्या मुलींना एकटं फिरायला पाठवायला धजावत नाहीत. त्यांना मुलीच्या सुरक्षिततेची चिंता सतावत असते. पण, आपल्या देशात अशा अनेक जागा आहेत, अनेक ठिकाणं आहेत, जी मुलींना एकट्याने फिरायला पूर्णतः सुरक्षित आहेत. मुली एकट्याने इथे बिनधास्त फिरू शकतात. ‘नवभारत टाइम्स’ने या संदर्भात वृत्त दिलंय.

    News18लोकमत
    News18लोकमत

    गोवा गोवा मुलींना एकटं फिरण्यासाठी खूप सुरक्षित आहे. इथे मुली सोलो ट्रिपसाठी जाऊन एंजॉय करू शकतात. इथे रात्री एकट्याने फिरणंही फार सुरक्षित आहे. इथे तुम्ही मनोसोक्त पार्टी करू शकता आणि समुद्र किनारी एकटं बसून स्वतःची कंपनी एंजॉय करु शकता. सिक्कीम सिक्कीम हे राज्य मुलींना फिरण्यासाठी खूप सुरक्षित आहे. तुम्ही वर्षातील कोणत्याही महिन्यात इथे जाऊ शकता. इथली हिल स्टेशन व कंचनजंगा पर्वतराजीमध्ये फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पाँडिचेरी उंच झाडांनी वेढलेले रस्ते, बंगालची खाडी, सुंदर चर्च व फ्रेंच संस्कृतीची झलक असलेलं पाँडिचेरी महिलांना एकटं फिरण्यासाठी सुरक्षित आहे. कसोल हिमाचल प्रदेश येथील कुल्लू जिल्ह्यातील कसोल गाव हे महिलांना फिरण्यासाठी खूप सुरक्षित आहे. इथलं निसर्गरम्य वातावरण डोळे दिपवणारं आहे. शिलाँग मेघालयची राजधानी शिलाँग हे शहर मुलींना एकट्याने फिरण्यासाठी सर्वात सुरक्षित शहर मानलं जातं. इथे मुलींचा आदर केला जातो. हे शहर गुहा, धबधबे, संस्कृती व कलेसाठी जगभरात ओळखलं जातं. या शहराचं नाव U-shyllong नावाच्या देवावरून ठेवण्यात आलंय. जयपूर राजा-महाराजांचे भव्य-दिव्य महल, पपेट शो, मुघलांच्या काळातील किल्ले, संस्कृती व लिट्रेचर फेस्ट जयपूरमधील आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. या ठिकाणी मुली एकट्या फिरू शकतात. तिथे हवामहल, जलमहाल, अल्बर्ट हॉल, जंतर-मंतर व नाहरगढ फिरण्यासारखी ठिकाणं आहेत. कोवलम निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या केरळ राज्यात मुली बिनधास्त एकट्या फिरू शकतात. निळाशार समुद्र, हिरवळ यांनी केरळ समृद्ध आहे. इथे ग्रुपसोबत फिरण्यात जेवढी मजा येते, तेवढीच मजा एकट्याने फिरण्यातही येते. कोवलममधील हाउसबोटमध्ये वेळ घालवण्याचा सुखद अनुभव तुम्ही घेऊ शकता. कोलकाता - कोलकाता मुलींना फिरण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे. या ठिकाणी मुली वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सोलो ट्रिपवर जात असाल तर जिथे जाताय, तिथली संपूर्ण माहिती म्हणजे तुमचं राहण्याचं ठिकाण, तिथले फोन नंबर्स कुटुंबियांना द्या. शहर कितीही सुरक्षित असलं तरी कुटुंबियांना एकट्या मुलीची काळजी असतेच, त्यामुळे त्यांना तुम्ही भेट देत असलेल्या शहराबद्दल माहिती असावी.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: india , travel
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात