आयुष्य नकारात्मक वाटतंय?; मग ‘ही’ पाच पुस्तकं वाचाच, वाढवतील सकारात्मकता

आयुष्य नकारात्मक वाटतंय?; मग ‘ही’ पाच पुस्तकं वाचाच, वाढवतील सकारात्मकता

सध्याचं जग स्पर्धेचं आणि धावपळीचं आहे. आयुष्यात सर्व काही असलं तरी माणूस समाधानी नसतो. काही जण अपयशामुळे खचून डिप्रेशनमध्ये जातात. काही जण परिस्थितीपुढे हात टेकतात आणि नशिबाला दोष देत जगतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: सध्याचं जग स्पर्धेचं आणि धावपळीचं आहे. आयुष्यात सर्व काही असलं तरी माणूस समाधानी नसतो. काही जण अपयशामुळे खचून डिप्रेशनमध्ये जातात. काही जण परिस्थितीपुढे हात टेकतात आणि नशिबाला दोष देत जगतात. आपल्या सभोवताली अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. अशा परिस्थितीतून सावरण्यासाठी पुस्तकं खूप मदत करू शकतात. चांगली, सकारात्मक पुस्तकं वाचल्यास आपल्या आयुष्यावर त्याचा प्रभाव पडून आपण निराशेच्या गर्तेतून बाहेर येऊ शकतो. अशाच सर्वोत्तम पाच पुस्तकांबद्दल माहिती घेऊ या. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'वेबदुनिया'ने दिलं आहे.

द माँक हू सोल्ड हिज फरारी

रॉबिन शर्मांच्या 'द माँक हू सोल्ड हिज फरारी' या पुस्तकाने लाखो जणांना प्रेरणा दिली आहे. हे पुस्तक वाचकांचे विचार बदलण्यास मदत करतं. रॉबिन शर्मा या पुस्तकातून वाचकांच्या भावनांना थेट स्पर्श करतात. हे पुस्तक भौतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन अतिशय उत्तम पद्धतीने मांडतं.

हेही वाचा-  Numerology : महत्त्वाच्या कामासाठी जाणार असाल तर 'ही' गोष्ट आवर्जून करा; जन्मतारखेनुसार अंकशास्त्र

द अल्केमिस्ट

साहित्यिक 'पाऊलो कोएल्हो' यांचं हे पुस्तक अतिशय लोकप्रिय आणि सकारात्मक आहे. जगातल्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांत त्याचा समावेश झालाय. जीवन जगण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी व जीवनाचा आनंद घ्यायला शिकण्यासाठी हे एक उत्तम पुस्तक आहे. सर्वांनीच हे पुस्तक वाचायला हवं.

द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग

हे पुस्तक डेव्हिड श्वार्ट्झच्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक मानलं जातं. या पुस्तकाची जादू वाचकांना गुंतवून ठेवते. या जगात असं काहीही नाही जे आपण साध्य करू शकत नाही, हे लेखकाने अतिशय मनोरंजक आणि अद्भुत पद्धतीनं पुस्तकात लिहिलं आहे.

थिंक अँड ग्रो रिच

नेपोलियन हिलचं हे पुस्तक व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी उपयुक्त आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या सुमारे 7 कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. जीवनातल्या यशाचे नियम हे पुस्तक प्रभावीपणे सांगतं. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या नकळत झालेल्या चुकांची जाणीवही करून देईल. याची मूळ आवृत्ती 1937 मध्ये प्रकाशित झाली होती.

रिच डॅड, पुअर डॅड

आताच्या काळात संपत्ती ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळतो; पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पैशांचं व्यवस्थापन म्हणजेच मनी मॅनेजमेंट ही आहे. या पुस्तकात लेखक रॉबर्ट किओसाकी यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने मनी मॅनेजमेंटच्या प्रभावी पद्धती स्पष्ट केल्या आहेत. हे पुस्तक आयुष्यात खूप उपयोगी पडेल.

First published: September 24, 2022, 5:06 PM IST

ताज्या बातम्या