जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ट्रॅव्हल / 'या' गोष्टी तुम्हाला फक्त केरळमध्येच पाहायला मिळतील!

'या' गोष्टी तुम्हाला फक्त केरळमध्येच पाहायला मिळतील!

तुम्ही महासागरांचा (Ocean) त्रिवेणी संगम (Triveni Sangam) कधी पाहिला आहे का? किती भव्य, अद्भूत आणि सुदर असेल याची कल्पना करा. आयुष्यात एकदा तरी याचा अनुभव घ्यावा अशी ही गोष्ट आहे. यासाठी तुम्हाला आपल्या देशाच्या शेवटचं टोक असलेल्या कन्याकुमारीला भेट द्यावी लागेल.

01
News18 Lokmat

नद्यांचा संगम तुम्ही नक्कीच पाहिला असेल. दोन किंवा त्रिवेणी संगम (Triveni Sangam) पाहताना किती भारी वाटतं ना? हिंदू धर्मात (Hindu Religion) तर अशा संगमाच्या ठिकाणांना विशेष महत्व असते.

जाहिरात
02
News18 Lokmat

कल्पना करा महासागरांचा संगम किती भव्य, अद्भूत आणि सुंदर दिसत असेल ना? कन्याकुमारी (kanyakumari) हे असेच एक ठिकाण आहे जिथे तीन महासागरांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. तामिळनाडूच्या (tamil nadu) दक्षिण किनार्‍यावर वसलेली कन्याकुमारी हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचा त्रिवेणी संगम आहे. याव्यतिरिक्तही येथे अनेक अशी ठिकाणं आहेत, जिथं तुम्ही भेट द्यायला हवी.

जाहिरात
03
News18 Lokmat

तिरुक्कुरुलची रचना करणारे अमर तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा हा पुतळा पर्यटकांना खूप आकर्षित करतो. 38 फूट उंच चौथाऱ्यावर बांधलेली ही मूर्ती 95 फूट आहे. या पुतळ्याची एकूण उंची 133 फूट असून तिचे वजन 2000 टन आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी एकूण 1283 दगडांचा वापर करण्यात आला होता. तसेच ही मूर्ती तिरुक्कुरलच्या 133 अध्यायांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांची तीन बोटे, म्हणजे अराम, पोरुल आणि इनबाम, नैतिकता, संपत्ती आणि प्रेम या तीन विषयांचा अर्थ दर्शवितात.

जाहिरात
04
News18 Lokmat

पद्मनाभपुरम राजवाड्याच्या विशाल हवेल्या त्रावणकोरच्या राजाने बांधल्या होत्या. या हवेल्या त्यांच्या सौंदर्य आणि भव्यतेसाठी ओळखल्या जातात. कन्याकुमारीपासून त्याचे अंतर 45 किमी आहे. हा राजवाडा केरळ सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

कन्याकुमारीपासून 20 किमी अंतरावर असलेले नगरकोलचे नागराज मंदिर नाग देवाला समर्पित आहे. भगवान विष्णू आणि महादेवाची आणखी दोन मंदिरे आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार चीनच्या बुद्ध विहाराच्या कारागिरीची आठवण करून देणारे आहे. जर तुम्ही कन्याकुमारीला भेट देण्याचा विचार करत असाल तर या मंदिराचा तुमच्या यादीत समावेश करा.

जाहिरात
06
News18 Lokmat

समुद्रात बांधलेल्या या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहण्यासाठी विवेकानंद रॉक मेमोरियल कमिटीने 1970 मध्ये हे पवित्र स्थान बांधले होते. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं. हे ठिकाण श्रीपाद पराई म्हणूनही ओळखले जाते. या स्मारकाचे विवेकानंद मंडपम आणि श्रीपाद मंडपम असे दोन प्रमुख भाग आहेत. प्राचीन मान्यतेनुसार या ठिकाणी कन्याकुमारीनेही तपश्चर्या केली होती. कुमारी देवीच्या पावलांचे ठसे आजही आहेत असे म्हणतात.

जाहिरात
07
News18 Lokmat

जर तुम्ही कन्याकुमारीला जात असाल तर तुम्ही अम्मान मंदिराला जरूर भेट द्या. हे मंदिर माता पार्वतीला समर्पित आहे. हे तीन महासागरांच्या संगमावर बांधले गेले आहे. इथे समुद्राच्या लाटांचा आवाज स्वर्गातील संगीतासारखा ऐकू येतो, अशी लोकांची धारणा आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्त मंदिराच्या डावीकडे 500 मीटर अंतरावर असलेल्या त्रिवेणी संगमात स्नान करतात.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 07

    'या' गोष्टी तुम्हाला फक्त केरळमध्येच पाहायला मिळतील!

    नद्यांचा संगम तुम्ही नक्कीच पाहिला असेल. दोन किंवा त्रिवेणी संगम (Triveni Sangam) पाहताना किती भारी वाटतं ना? हिंदू धर्मात (Hindu Religion) तर अशा संगमाच्या ठिकाणांना विशेष महत्व असते.

    MORE
    GALLERIES

  • 02 07

    'या' गोष्टी तुम्हाला फक्त केरळमध्येच पाहायला मिळतील!

    कल्पना करा महासागरांचा संगम किती भव्य, अद्भूत आणि सुंदर दिसत असेल ना? कन्याकुमारी (kanyakumari) हे असेच एक ठिकाण आहे जिथे तीन महासागरांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. तामिळनाडूच्या (tamil nadu) दक्षिण किनार्‍यावर वसलेली कन्याकुमारी हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचा त्रिवेणी संगम आहे. याव्यतिरिक्तही येथे अनेक अशी ठिकाणं आहेत, जिथं तुम्ही भेट द्यायला हवी.

    MORE
    GALLERIES

  • 03 07

    'या' गोष्टी तुम्हाला फक्त केरळमध्येच पाहायला मिळतील!

    तिरुक्कुरुलची रचना करणारे अमर तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा हा पुतळा पर्यटकांना खूप आकर्षित करतो. 38 फूट उंच चौथाऱ्यावर बांधलेली ही मूर्ती 95 फूट आहे. या पुतळ्याची एकूण उंची 133 फूट असून तिचे वजन 2000 टन आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी एकूण 1283 दगडांचा वापर करण्यात आला होता. तसेच ही मूर्ती तिरुक्कुरलच्या 133 अध्यायांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांची तीन बोटे, म्हणजे अराम, पोरुल आणि इनबाम, नैतिकता, संपत्ती आणि प्रेम या तीन विषयांचा अर्थ दर्शवितात.

    MORE
    GALLERIES

  • 04 07

    'या' गोष्टी तुम्हाला फक्त केरळमध्येच पाहायला मिळतील!

    पद्मनाभपुरम राजवाड्याच्या विशाल हवेल्या त्रावणकोरच्या राजाने बांधल्या होत्या. या हवेल्या त्यांच्या सौंदर्य आणि भव्यतेसाठी ओळखल्या जातात. कन्याकुमारीपासून त्याचे अंतर 45 किमी आहे. हा राजवाडा केरळ सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 07

    'या' गोष्टी तुम्हाला फक्त केरळमध्येच पाहायला मिळतील!

    कन्याकुमारीपासून 20 किमी अंतरावर असलेले नगरकोलचे नागराज मंदिर नाग देवाला समर्पित आहे. भगवान विष्णू आणि महादेवाची आणखी दोन मंदिरे आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार चीनच्या बुद्ध विहाराच्या कारागिरीची आठवण करून देणारे आहे. जर तुम्ही कन्याकुमारीला भेट देण्याचा विचार करत असाल तर या मंदिराचा तुमच्या यादीत समावेश करा.

    MORE
    GALLERIES

  • 06 07

    'या' गोष्टी तुम्हाला फक्त केरळमध्येच पाहायला मिळतील!

    समुद्रात बांधलेल्या या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहण्यासाठी विवेकानंद रॉक मेमोरियल कमिटीने 1970 मध्ये हे पवित्र स्थान बांधले होते. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं. हे ठिकाण श्रीपाद पराई म्हणूनही ओळखले जाते. या स्मारकाचे विवेकानंद मंडपम आणि श्रीपाद मंडपम असे दोन प्रमुख भाग आहेत. प्राचीन मान्यतेनुसार या ठिकाणी कन्याकुमारीनेही तपश्चर्या केली होती. कुमारी देवीच्या पावलांचे ठसे आजही आहेत असे म्हणतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 07