तुम्ही कितीही अनुभवी आणि चांगले बाईक रायडर असले तरी रस्ते तुम्हाला आश्चर्यचकीत करण्यासाठी तयार असतात. मीही देशभरातील अनेक ऑफ रोड ते राष्ट्रीय महामार्गावर बाईक चालवली आहे. मात्र, खोपोलीजवळ मोठा अपघात झाला तेव्हा मला एका गोष्टीची जाणीव झाली. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे
Adventure on Wheels
आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. हाय फ्रेंड्स, मी गौरव.. माझी biking आवडीची सुरुवात ही खूप पूर्वीपासूनची आहे. हे सर्व सुरू झाले मी लहान असताना, तेव्हा मला सायकल चालवण्याची आवड होती. उन्हाळा असो किंवा पावसाळा मला कल्याणच्या आसपासच्या ठिकाणी माझ्या सायकलीवरुन फिरायला आवडत असे. आमच्या मित्रांचा एक ग्रुप होता. ज्यांना शाळा/ट्यूशननंतर शहरात किरायला आवडायचे, तेव्हापासूनच मला ग्रुप रायडिंगची आवड लागली.
माझी ड्रीम बाइक असेच दिवसांमागून दिवस गेले आणि मी पदवीच्या तिसऱ्या वर्षात होतो, तेव्हा मला माझी पहिली बाईक मिळाली (Hero Honda Karizma R). 2003 मध्ये ही बाइक लॉन्च झाली, त्या दिवसापासून ती माझी ड्रीम बाइक होती. त्या दिवसांमध्ये बाइक राईड किंवा ग्रुप राईड फार प्रसिद्ध नव्हत्या, निदान मला तरी याची जाणीव नव्हती. त्यावेळी रायडिंग गिअर्स म्हणजे फक्त हेल्मेट माहित होतं.
माझ्या हँड ग्लोव्ह्जचं महत्व अपघातानंतर समजलं हळूहळू लांबच्या राईड्सची माझी आवड वाढत गेली. लडाख बाईक राइड हे जवळजवळ प्रत्येक रायडरचे स्वप्न असते, इंटरनेटवर पण लडाख बाईक राइडच्याच चर्चा होत्या. मी नाशिक, पुणे, लोणावळा, चिपळूण, गोवा इत्यादी ठिकाणी छोट्या राइड्स करत होतो. रायडिंग गिअर्सचे महत्त्व, स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढत होती. त्याच काळात मी माझे पहिले हँड ग्लोव्हज (Rynox) घेतले. 2000 रुपयांचे हातमोजे खरेदी करणे तेव्हा खुप मोठी गोष्ट होती. पण जेव्हा मला खोपोलीजवळ मोठा अपघात झाला तेव्हा मला त्याचं महत्त्व कळलं. हातमोज्यांमुळेच माझे तळहात वाचले आणि मला असे वाटले की, “ग्लोव्ह्जचा पैसा वसुल हो गया”. रायडिंग गिअर्स म्हणजे रायडिंग जॅकेट्स, रायडिंग पँट, रायडिंग शूज, हे सगळं नेहमीच आकर्षक दिसतात. पण, तेवढेच ते महागही असतात. प्रत्येक गोष्ट खूप महाग वाटत होती, म्हणून मी एका वेळी एक गोष्ट खरेदी करण्याचा विचार केला. त्यामुळे प्रथम जॅकेट घेतेलं नंतर रायडिंग पँट, माझ्याकडे अजूनही चांगले रायडिंग शूज नाहीत. मला लवकरच नवीन शूज घेता येतील अशी आशा आहे.
डोंबिवली रायडर्स क्लबचा आयुष्यात प्रवेश सोलो बाइक राईडला मजा तर येत होती. पण, प्रवास करताना मला नेहमीच एकटं वाटायचं. मी जेव्हा एकट्याने राइड करायचो, तेव्हा माझ्या घरच्यांना कायम माझ्या सुरक्षेची काळजी असायची. मग मला डोंबिवली रायडर्स क्लब (DRC) बद्दल माहिती मिळाली, बाईक रायडर्सचा एक सच्चा आणि समर्पित ग्रुप. मी या ग्रुपमध्ये सामील झालो आणि त्यानंतरचा प्रवास आपोआपच सोपा झाला. संस्थापक अद्वैत परब सर्व सदस्यांना एकत्रित करून राइडला नेण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. DRC रायडिंग गिअर्स आणि सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देतात. DRC मध्ये सर्व रायडर्सना हेल्मेट, जॅकेट, शूज आणि हँड ग्लोव्ह्ज यासारखे मूलभूत रायडिंग गिअर्स घालणे अनिवार्य आहे. जेव्हा आपण समान आवडी असलेल्या लोकांना भेटतो तेव्हा ते आयुष्य अधिक रोमांचक बनते, मी DRC मध्ये सामील झालो तेव्हा माझ्या बाबतीत असेच काहीसे झाले. मी नोव्हेंबर 2021 मध्ये एक नवीन बाईक खरेदी केली. KTM Adventure 390. ही बाइक विकत घेण्यासाठी मला अद्वैत परब यांनी खूप प्रोत्साहन दिले. DRC ने आजपर्यंत लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, कर्नाटक, गोवा या राज्यांमध्ये यशस्वी राइड्स केल्या आहेत.
यंदाचा गुढीपाडवा ग्रुपसाठी खूप खास यंदाचा गुढीपाडवा (2022) आमच्या ग्रुपसाठी खूप खास होता. जगभरात सर्व हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभा यात्रा साजऱ्या होतात. पण, ह्या स्वागत यात्रेची सुरुवात डोंबिवली मधून झाली. ह्या वर्षीच्या पारंपरीक गुढी पाडवा शोभा यात्रेचे नेतृत्व करण्याचा मान DRC ला मिळाला. संपूर्ण शोभा यात्रेचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता. आम्ही रॅलीमध्ये सुरक्षित बाईक रायडिंग आणि रायडिंग गिअर्सचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. शिस्त हा डीआरसीचा मूलमंत्र आहे. DRC चा भाग बनणे हे माझे भाग्य आहे.
शेवटी मी सर्व वाचकांना सुरक्षितपणे बाइक चालवणे आणि नेहमी किमान रायडिंग गिअर्सचा वापर करण्याची विनंती करेन. प्रवासात रस्ता तुम्हाला आश्चर्यचकीत करण्यासाठी नेहमीच तयार असतो. म्हणून तुम्ही सर्व सुरक्षेसह त्याला सामोरे जाण्यासाठी तयार असले पाहिजे. (The road out there is always ready to surprise you, so you have to be all safe and ready to face it) - गौरव दळवी, बाईक रायडर, कल्याण तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.