नाशिक, 28 जून : नाशिक शहराची ओळख ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून तर आहेच. मात्र, पर्यटन नगरी म्हणूनही नाशिक शहर ओळख आहे. नाशिक शहर हे ऐतिहासिक ठेवा जपणारं शहर आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकी एक विशेष प्रेक्षणीय स्थळ प्राचीन पांडवलेणी (Famous Pandav Caves in Nashik) आहे. चला तर आपण या पांडवकालीन लेण्यांची सफर करूया… महाराष्ट्र हा मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा साक्षीदार आहे. संपूर्ण देशात असणार्या एकूण 1200 प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी तब्बल 680 लेणी महाराष्ट्रात आहेत. त्यात या ‘पांडवलेणी’ किंवा ‘त्रिरेशमी’ बौद्ध लेण्यांचा देखील समावेश होतो. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी लेणी बघण्यासाठी येत असतात. एकूण 24 लेणी या ठिकाणी आहेत. काही लेण्यांमधील मुर्ती अजुनही चांगल्या स्वरुपात आहेत. तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. वाचा :
Success Story : आई-वडील मूकबधिर, परिस्थिती बेताची, तरीही नाशिकच्या श्वेताने घर सांभाळत दहावीत मिळवले 91 टक्के : VIDEO
बुद्धस्तूप, भिक्षूंची निवासस्थाने, बुद्धबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्ती, पाच पांडवसदृश मूर्ती, भीमाची गदा, कौरव मूर्ती, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्ती, या सर्व लेण्यांमध्ये आहेत. मात्र, या ठिकाणी मूर्तींची शिल्पकला जबरदस्त आहे. पर्यटक लेण्यांमधील कोरीव काम बघून भारावून जातात. …असा सांगितला जातो इतिहास इतिहासात या लेण्यांचे अनेक दाखले आहेत. गौतमीपुत्र सातकर्णी हा त्या काळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा होता. त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा कोणी नव्हता. सातवाहन, क्षात्रप आणि अभिर, या एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या 3 राजघराण्यांच्या 2500 वर्षे कालावधीत या लेणी कोरण्यात आल्याचं इतिहासात काही ठिकाणी नोंद आहे. खरं तर या लेण्यांची त्रिरेशमी नावानं ओळख असल्याचं अनेक इतिहासकार सांगतात. वाचा :
अहो, आश्चर्यम्! नाशिकच्या 21 वर्षांच्या चारूदत्तने केलीय हजारो अभंगांची रचना, तेही कोणत्याही अध्यात्मिक शिक्षणाशिवाय, पहा VIDEO
लेण्यांमध्ये कोरले गेलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत. ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो. लेण्यांमध्ये केलेल्या कोरीव कामावर बौद्ध संस्कृतीचा प्रभाव इथे दिसतो. प्राचीन काळाच्या ग्रीक, इराण संस्कृतीचे अवशेषदेखील इथे ग्रीफीन, स्फिंक्स यासारख्या मूर्तींच्या असण्यामधून आपल्याला दिसतात. प्राचीन काळात पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्या व्यापाराचा पुरावा दाखवतो.
गुगल मॅपवरून साभार…
पांडव लेणी पाहण्यासाठी किती आहे अंतर? पांडवलेणी हे प्रेक्षणीय स्थळ नाशिक-मुंबई महामार्गवर मुंबईच्या दिशेने शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर एका मोठ्या उंच टेकडीवर आहे. पर्यटकांना वरती जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पायऱ्या पूर्णतः दगडात असल्यामुळे वरती जाण्याच्या मार्गात कोणतीच अडचण नाही. पावसाळ्यातदेखील देशभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. WPRX+FCM, पांडव लेणे रोड, Buddha Vihar, पाथर्डी फाटा, नाशिक, महाराष्ट्र 422010 हा पत्त्यावर या पांडवकालीन लेण्या पहायला मिळतात. तुम्ही पुण्यातून येणार असाल, तर 218 किलोमीटर अंतरावर असून 5 तासांचा प्रवास करावा लागतो. मुंबईवरून येणार असाल तर 159 किलोमीटर अंतर असून साधारण 3 तास लागतात. पहाटे 5 वाजताच लोक ट्रेकिंगसाठी जातात. पहाटेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या लेण्या बघण्यासाठी लोक येतात. सध्या तरी या लेणी पाहण्याासाठी कोणते तिकीट नाही.