उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय? भारतातील हे ठिकाण आहे बेस्ट पर्याय

उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय? भारतातील हे ठिकाण आहे बेस्ट पर्याय

जर तुम्ही या उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर लडाख हे सर्वात चांगला पर्याय आहे. या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला वेड लावेल.

  • Share this:

लडाख, 23 एप्रिल : जर तुम्ही उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर डोळे झाकून लडाखला (tourist places in ladakh) जा. इथलं नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला वेड लावेल. लडाख हे भारतातील उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथे पर्यटक मठांना भेट देऊ शकतात, पर्वतारोहण करून नवीन अनुभव घेऊ शकतात. याशिवाय लडाखमध्ये तलावांपासून पर्वतांपर्यंत खूप काही पाहण्यासारखे आहे. लडाख हे एक असे ठिकाण आहे, जिथे तेथील नैसर्गिक सौंदर्य आणि विहंगम दृश्ये पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. यामुळेच अनेक पर्यटक बाईकवरून लडाखची सफर करतात.

लडाखमध्ये अनेक प्राचीन बौद्ध मठ आहेत. त्यामुळे याला ‘लिटल तिबेट’ असेही म्हणतात. लडाखची तिबेटशी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. लडाखमध्ये तुम्हाला बौद्ध संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा प्रभाव पाहायला मिळेल. तुम्ही अजून लडाखला भेट दिली नसेल, तर तुम्ही इथे जाऊन लेह आणि लडाखचा थरारक प्रवास अनुभवू शकता. लडाख हा बहुतांशी ओसाड जमीन आणि उंच पर्वत असला तरी, तरीही पर्यटकांना भेट देण्याची अनेक ठिकाणे आहेत.

पँगॉन्ग तलाव

लडाखमधलं पॅंगॉन्ग सरोवर हे मोठं आकर्षण आहे. ब्लू पॅंगॉन्ग लेक हे हिमालयातील लेह-लडाख जवळ 12 किमी लांब असलेले प्रसिद्ध तलाव आहे. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे तो भारतापासून तिबेटपर्यंत पसरलेला आहे. हा तलाव सुमारे 43,000 मीटर उंचीवर आहे. येथील तापमान -5°C ते 10°C पर्यंत असते. हिवाळ्याच्या काळात हा तलाव पूर्णपणे गोठतो. या तलावाला पॅंगॉन्ग त्सो असेही म्हणतात. हे ठिकाण इतके सुंदर आहे की येथे अनेक चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे. लडाखचे पॅंगॉन्ग सरोवर बघायला तुम्ही एकदा जरूर जा. या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. इथल्या अगदी स्वच्छ पाण्याचं दृश्य तुमच्या मनात स्थिर होईल.

थिकसे मठ

थिकसे मठ लेहपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. हे खूप सुंदर ठिकाण आहे. येथे 12 मजली उंच इमारत आहे जी परिसरातील सर्वात मोठा मठ आहे. जिथे तुम्हाला भव्य स्तूप, शिल्पे, चित्रे, थांगका आणि तलवारी पाहायला मिळतात. येथे एक मोठा स्तंभ देखील आहे ज्यामध्ये भगवान बुद्धांनी दिलेले संदेश आणि शिकवण लिहिलेली आहे.

खारदुंगला पास

खारदुंगला पास हे एक सुंदर प्रवेशद्वार आहे, जे नुब्रा आणि श्योक खोऱ्यांच्या दिशेने जाते. लडाखमध्ये भेट देण्यासारख्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही तुमच्या सहलीदरम्यान येथे देखील भेट देऊ शकता.

मरखा व्हॅली

मरखा व्हॅली लडाख ट्रेकिंग प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकपैकी एक आहे. जे सुमारे 11,000 फुटांवर सुरू होते आणि 17,000 फुटांवर संपते. हा इथला सर्वात सुंदर ट्रेक आहे. वाटेत पर्यटकांना बौद्ध गावे आणि खडकाळ दऱ्या दिसतात.

Published by: Rahul Punde
First published: April 23, 2022, 7:46 PM IST

ताज्या बातम्या