बाईक चालवणाऱ्या प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं, एकदा आपल्या बाईकवरुन मित्रांसोबत त्या दऱ्याखोऱ्यांत जावं ज्यांची निर्मिती फक्त आणि फक्त रायडर्ससाठी झाली आहे. या प्रवासाला मी नाव दिलं आहे.. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 ते लेह.. जेव्हा तुम्ही लेह, लडाखला बाईकने जाण्याचा विचार कराल, तेव्हा तुम्हाला दोन प्रकारचे लोक भेटतील एक, जे म्हणतील तुम्ही जाऊ नका. आणि दुसरे जा बिनधास्त, जीवनाचा आनंद मिळेल. मी दुसऱ्या लोकांचं ऐकलं. पण, ज्यांनी पहिले मत दिले त्यांचाही सल्ला मनात ठेवाला, कारण ते माझे हितचिंतक होते. प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील हा दुसरा भाग. माझ्या प्रवासाची सुरुवात सांगायची झाली तर एक दिवस मी माझा मित्र विकास सिंग राठोडला भेटलो. म्हटलं चल यार बाईकवरुन भारत दर्शन करू. त्यावेळी माझ्या मनात इंदूरहून नाशिक, मुंबई, गोवा, केरळमार्गे परत यायचं होतं. पण विकास म्हणाला की इथले रस्ते सपाट आहे. फिरायचे असेल तर लेहला जाऊया. पर्वतरांगांमध्ये गाडी चालवायची वेगळीच मजा असते. मी नाशिकला यापूर्वी एकदा बाईकने एकटाच आलो होतो, त्यामुळे मीही लगेच होकार दिला.
इथूनच सुरू झाला प्रवास.. येणाऱ्या सर्व उत्साही मित्रांचा व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार केला. एकूण संख्या अधिक झाली 11. त्यानंतर कसे जायचे? यावरून वादावादी झाली. सर्व प्रकारे विचार केल्यावर असा निष्कर्ष काढला की खूप उन्हाळा खूप कडक आहे….. जम्मूला बाईकने जायला तीन दिवस लागतील… त्यामुळे बाईक जम्मूपर्यंत ट्रेनमध्ये जातील आणि आम्ही विमानाने. जसजसे प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी जाणाऱ्यांची संख्या कमी होत गेली. प्रमुख भागीदार अभिषेक शर्माचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याचं येणं रद्द झालं. बालपणीचे मित्र सुमित ऑफिस तर अजय कौटुंबिक कारणांमुळे येऊ शकले नाहीत. इंदूरहून दिल्लीला जाणारे फ्लाईट इंदूरहून टेकऑफ झाले तेव्हा अनुराग शर्मा, मी आणि विकास आम्ही तिघेच सोबत होतो.
पप्पा म्हणाले बिनधास्त जा इकडे त्याच वर्षी मार्च महिन्यात पप्पांची तब्येत बिघडली होती, अचानक एके दिवशी त्यांना सांगितले की पप्पा, मी बाईकने लेहला जाणार आहे. सुरुवातीला काहीच बोलले नाही, मग नंतर म्हणाले जा पण गाडी सावकाश चालव. त्यानंतर थांबण्याचे कारण नव्हते. बायकोही माझ्या आवेशापुढे काही बोलली नाही. पण, माझ्या आईने आणि बायकोने जगातील सर्व देवांना नवस केला असावा. संपादक आणि मी त्यावेळी महेंद्र श्रीवास्तव आमच्या नईदुनियाच्या इंदूर आवृत्तीचे प्रभारी संपादक होते. मी त्यांच्याकडे रजा मागायला गेलो, तेव्हा मी म्हणाला, सर मला 10 दिवसांची सुट्टी हवी आहे, मला बाईकने लडाखला जायचे आहे. सर लगेच उत्तरले.. वेडा झालाय का? तिकडे हवामान खराब आहे. बाईकवरून कोणी इतक्या लांब जातं का? मी म्हणालो सर घरून परवानगी मिळाली आहे. आपण दिली तर स्वप्न पूर्ण होईल. यानंतर, जा, पण सावकाश, असे सांगून परवानगी दिली. सफर इंदूरहून रात्रीचे विमान पकडून दुसऱ्या दिवशी जम्मूला पोहोचलो. तिथे जाऊन पाहिलं तर पार्सल ऑफिसमध्ये बाईक नव्हती. दरम्यान, एका एजंटने सांगितलं की काल संध्याकाळच्या ट्रेनमधून काही वाहन आली होती जी प्लॅटफॉर्मवर आहे. त्याला सोबत घेऊन गेलो तर बाईक बेवारस उभी होती. धावतच तिथे पोहोचला तर बुलेट मिळाली. गाडीला चालवत बाहेर आणलं. एजंटसोबत पेट्रोल घेऊन आलो, सामानाची बांधाबांध केली अन् प्रवास सुरू केला. श्रीनगर-उधमपूर महामार्गावरील लांबलचक जाममधून संध्याकाळपर्यंत पटनीटॉपला पोहोचला तेव्हा पाऊस सुरू झाला. इथल्या एका हॉटेलमध्ये रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा प्रवास सुरू झाला.
प्रवास सुरू केला खरा पण, माझ्या गाडीची बॅटरी डाऊन झाली. तिथून बाहेर पडलो, जाम पार करून दिवसभरात श्रीनगरला पोहोचलो, मोठ्या कष्टाने एक बुलेट शोरूम शोधलं, ज्याने गाडीची बॅटरी बदलण्यास नकार दिला, नंतर लाल चौकाजवळ बॅटरी बदलली. मात्र, काश्मीर, भारत आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावरून दुकानदाराशी वाद झाला. कसंबसं तिथून डल सरोवराची पूर्ण फेरी करून सोनमर्गला पोहोचलो तोपर्यंत रात्र झाली. लेहला जाताना असा विचार करू नका की तिथे स्वर्ग आहे, कारण स्वर्ग तर पूर्ण रस्त्याने आहे. बर्फाचे डोंगर, खडबडीत रस्ते, हजारो फूट खोल दरी, त्याखालून वाहणाऱ्या नद्या. खिडकीतून पाहिलं तर बर्फ! सकाळी लवकर उठून अनुराग म्हणाला अरे खिडकीबाहेर बघ. डोळे चोळत पाहिलं सुमारे 50 मीटर अंतरावर बर्फाचे पर्वत होते. हातपाय धुवून निघाल्यानंतर कळलं की समोरून झोजिला पास (Zoji La) सुरू होतो. ज्यावर आत्ता फक्त समोरुन येणारी वाहनेच येऊ शकतात. तिथे उभ्या असलेल्या सैनिकाने जाऊ देण्यास नकार दिला. आम्ही इंदूरहून आल्याचे सांगितल्यावर पूर्वी महू (मध्य प्रदेश) येथे तैनात असलेले अधिकारी विजय कुमार यांनी बाजूने गाडी चालवण्याची सूचना देऊन जाऊ दिलं. कारण, झोजिला पास खूप धोकादायक आहे.
येथे अनेक वेळा रस्त्याची रुंदी 10 ते 12 फूट राहते. त्यानंतरही आम्ही पुढे निघालो. एका ठिकाणी समोरून आलेला ट्रक पाहून अनुरागने गाडी थांबवली. पण, यामुळे त्याची गाडी उतारावर रिव्हर्स घेऊ लागली. तिथे उभ्या असलेल्या सरदारजींनी त्याची गाडी पकडली म्हणून पुढचं संकट टळलं. झोजिला पास ओलांडता ओलांडता दोन वाजले. येथून द्रासला पोहोचल्यावर विजय स्मारक दिसत होतं. कारगिलचे हे विजय स्मारक आणि टायगर हिल पाहून आजही अंगावर शहारे येतात. सुमारे तासभर इथे घालवल्यानंतर लामायुरूजवळ पोहोचलो तेव्हा थंडीने शरीर कुडकुडायला लागलं. मायनस 5 ड्रॅगी सेल्सियसमध्ये बाईक चालवणे हे आव्हानापेक्षा कमी नव्हते. आमच्याकडे सर्व प्रकारचे उबदार कपडे होते, पण ते काही कामाचे नसल्याचं सिद्ध होत होतं. चंद्रासारखा खडबडीत पृष्ठभाग असलेल्या लामायुरूला पोहोचून हॉटेलमध्ये आलो आणि खोलीत येऊन दोनतीन ब्लँकेट घेऊन झोपलो.
आज गाठणार होतो ध्येय सकाळी तयार होऊन लेहला पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती. लेह हे शांत आणि प्रामाणिक लोकांचे शहर आहे. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर स्वच्छता पाहूनच लगेच रुम बूक केली. मालकच वेटर हॉटेलमध्ये आल्यानंतर सामान घेऊन येणाऱ्या तरुण नेमकोला विकास म्हणाला, जा तुझ्या मालकाला बोलाव तर तो म्हणाला साहेब मीच या हॉटेलचा मालक आहे. इंदूरमध्ये एवढं मोठं हॉटेल कोणाचं असतं, तर मालक महागड्या गाडीशिवाय खाली उतरला नसता, आणि त्याचे पाय जमिनवर तर नक्कीच नसते. रात्री पाणी मागितलं.. तर एक महिला पाणी घेऊन आली. तिला विचारलं तर ती नेमकोची पत्नी असल्याचे सांगितले. आमच्या इथे वेटर नाहीत, आम्ही स्वतः काम करतो.
पँगॉन्ग येथे मेनूमध्ये पोहे 80 रुपये प्लेट लेहच्या या प्रवासात खाण्यासाठी सर्व काही मिळते. पण, वाटेत मॅगी आणि अंड्यांपेक्षा काहीही चांगले नाही. लेहपासून सुमारे 135 किमी गेल्यावर पँगॉन्ग सरोवर डोळ्यासमोर होते. इथेच 3 इडियट्सचा शेवटचा सीन शूट झाला होता. इथे आल्यावर सगळा थकवा निघून गेला. सुमारे तासाभराच्या फोटोशूटनंतर भूक लागली तर तिथे बांधलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो. इथे प्रत्येक हॉटेलचे नाव रँचो किंवा थ्री इडियट्सच्या नावाशी जोडलेले आहे. इथल्या मेनूमध्ये पोहे पाहून आनंद झाला. मात्र, येथे पोहे मिळाले नाहीत. येथून रात्री हॉटेलवर परतलो. वाटेत बाईक बिघडली. तिला लेह येथील प्रसिद्ध बुलेट मेकॅनिक जुम्माकडे घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी लेहला फिरलो. इथले मंदिर, इथल्या राजाचा महाल, मठ, रँचोची शाळा आता प्रसिद्ध झाली आहे.
पुन्हा बाईक बिघडली एकीकडे सतत प्रवास केल्यामुळे प्रकृती बिघडत होती. तर परतताना अडचण येत असल्याने दुचाकी ट्रकमध्ये टाकून आम्ही विमानातून परत आलो. पण, अजूनही काही बाकी आहे. जे लेहमध्ये शोधायचं आहे. जे पुन्हा एकदा आम्ही तिघेच शोधणार. इतर कोणाला यायचं असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण यावेळी मनाली ते लेह मार्गे…
या कोरोनाच्या काळापासून मुक्ती मिळाल्यावरच… आणि हो, लेहला जाताना काही सोबत नाही नेलं तरी चालेल. फक्त तुमचे काही चांगले मित्र आणि प्रचंड आत्मविश्वास सोबत असुद्या. शेवटी तेच खूप कामी येतं. - नवीन यादव, (इंदोर, मध्यप्रदेश) तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.