मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमची बाइक वारंवार नादुरुस्त होते? या सोप्या टिप्स करा फॉलो आणि करा मस्त राईड

तुमची बाइक वारंवार नादुरुस्त होते? या सोप्या टिप्स करा फॉलो आणि करा मस्त राईड

कोणतीही बाइक दररोज किमान 5 किलोमीटर चालवणे आवश्यक आहे. जर तुम्ही बाइक जास्त वापरत नसाल तर बाइकमधील प्लगमध्ये बिघाड होऊ शकतो.

कोणतीही बाइक दररोज किमान 5 किलोमीटर चालवणे आवश्यक आहे. जर तुम्ही बाइक जास्त वापरत नसाल तर बाइकमधील प्लगमध्ये बिघाड होऊ शकतो.

कोणतीही बाइक दररोज किमान 5 किलोमीटर चालवणे आवश्यक आहे. जर तुम्ही बाइक जास्त वापरत नसाल तर बाइकमधील प्लगमध्ये बिघाड होऊ शकतो.

    नवी दिल्ली, 24 जून: देशात टू-व्हिलर सेगमेंटमध्ये (Two Wheeler Segment) बाइकची (Bike) विक्री सर्वाधिक होते. यात सर्वाधिक बाइक्स या Hero Motocorp आणि Bajaj या कंपन्यांच्या असतात. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर TVS च्या बाइक्स सर्वात जास्त विकल्या जातात. जर स्पोर्ट्स किंवा अॅडव्हेंचर सेगमेंटचा विचार केला तर Royal Enfield आणि JAWA च्या बाइक्स सर्वाधिक पसंती असते. परंतु, या सर्व बाइक्समध्ये समान बिघाड (Fault) होत असतो. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी मॅकेनिक तुमच्याकडून मनामनी रक्कम वसूल करतात. त्यानंतरही कोणताही बिघाड कायमस्वरुपी दुरुस्त होईल याची खात्री नसते. त्यामुळे प्रत्येकाला बाइक्समधील लहान स्वरुपाचे बिघाड दुरुस्त करता येणे आवश्यक आहे. यामुळे विनाकारण खर्च वाचण्यास मदत होते.

    बाइकचा योग्य प्रकारे मेटेंनन्स (Maintenance) ठेवला, योग्य वॉशिंग केले तर बाइकचे लाईफ सुधारते. तसेच इंधनात बचत होण्यास मदत होते. पर्यायाने बाइकवरील विनाकारण होणारा अतिरिक्त खर्च वाचतो आणि आपली बचत होते. बाइकमधील छोटे-छोटे बिघाड कसे दुरुस्त करायचे, बाइकचा मेटेंनन्स कसा ठेवायचा याविषयीच्या टिप्स जाणून घेऊया..

    प्रत्येक बाइकमध्ये होतो एकसमान बिघाड

    कोणतीही बाइक दररोज किमान 5 किलोमीटर चालवणे आवश्यक आहे. जर तुम्ही बाइक जास्त वापरत नसाल तर बाइकमधील प्लगमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे तुमची बाइक स्टार्ट (Start) होत नाही आणि तुम्हाला ती स्टार्ट करण्यासाठी धक्का द्यावा लागतो. अशावेळी तुमची बाइक दुरुस्त करण्यासाठी जर तुम्ही मॅकेनिककडे गेलात तर तो तुमच्याकडून मनमानी रक्कम वसूल करतो. त्यामुळे तुम्हाला बाइक दुरुस्त करता येणे आवश्यक आहे.

    25 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; होईल 50 हजारपर्यंत कमाई

    बाइक दुरुस्त कशी कराल?

    बाइकमधील प्लगवर (Plug) कार्बन जमा होणे हा सामान्य बिघाड आहे. जर तुम्हाला याविषयी माहिती असेल तर तुम्ही हा बिघाड दुरुस्त करु शकता. यासाठी तुमच्याकडे दुरुस्तीचे साहित्य असणे आवश्यक आहे. या साहित्याच्या मदतीने तुम्ही प्लग खोलून, त्यावरील कार्बन कापडाने स्वच्छ करु शकता आणि पुन्हा प्लग फिटींग करु शकता. यानंतर जर तुम्हाला बाइक स्टार्ट करणं अगदी सोपं होईल.

    बाइक सुस्थितीत ठेवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स

    बाइक नेहमी सुस्थितीत ठेवण्यासाठी काही टिप्स माहिती असणं आवश्यक आहे. त्यात तुम्ही दररोज किमान 5 किलोमीटर बाइक चालवणं आवश्यक आहे. योग्यवेळी बाइक वॉशिंग केली पाहिजे. यामुळे धूळ,कचरा आणि गंज स्वच्छ होऊन बाइकची लाईफ (Life) वाढते.

    First published:

    Tags: Bike riding