नवी दिल्ली, 17 डिसेंबर : शाओमीचा (Xiaomi) नवा स्मार्टफोन रेडमी 9 पॉवर (Redmi 9 Power) भारतात लाँच झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फोनचा टीजर जारी करण्यात येत होता. Redmi 9 Power ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे लाँच करण्यात आला. काही दिवसांपूर्वी कंपनीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा, ज्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
शाओमी इंडियाच्या इव्हेंट पेज आणि अमेझॉनवर लाईव्ह झालेल्या पेजद्वारे हा एक पॉवर-पॅक्ड #PowerPacked स्मार्टफोन असेल. फोनचे फीचर्स रेडमी नोट 9, 4G प्रमाणे आहेत. यात 6.53 इंची फुल एचडी+ IPS एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्लेसह आहे. Redmi 9 Power च्या 4 GB रॅम + 64 GB वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर 4 GB रॅम + 128 GB वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.
फोनला 4GB रॅम आणि 128 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. स्नॅपड्रॅगन 662 SoC चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. रेडमी 9 पॉवरमध्ये चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 MP + 2 MP + 2MP कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 8 MP कॅमेरा आहे. ‘Redmi’s Biggest Battery Yet’ असं अमेझॉनच्या लाईव्ह पेजवर लिहिण्यात आलं आहे. फोनला 6000mAh दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
We want to give more power to your love, cause you make us feel unstoppable! Join us as we unveil the most #PowerPacked #Redmi smartphone yet!
Leave us a ❤️ & we'll send you a special reminder for the launch of #Redmi9Power. Psst... there's also a special launch day #giveaway! pic.twitter.com/EEa1UjJSVg — Redmi India (@RedmiIndia) December 16, 2020
Redmi 9 Power फोन ग्रे, ब्लू, रेड आणि ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. Redmi 9 Power हा कंपनीच्या 9व्या सीरीजचा चौथा फोन आहे. या सीरीजमध्ये आधी रेडमी 9A, Redmi 9 आणि Redmi 9i सामिल आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Redmi, Xiaomi redmi