मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट! 36 परदेशी सॅटेलाइट्ससह पहिल्या व्यावसायिक उड्डाणासाठी इस्रो सज्ज

भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट! 36 परदेशी सॅटेलाइट्ससह पहिल्या व्यावसायिक उड्डाणासाठी इस्रो सज्ज

इस्रो आणखी एक विक्रम नावावर करण्यास सज्ज

इस्रो आणखी एक विक्रम नावावर करण्यास सज्ज

इस्रोनं आतापर्यंत 345 आंतरराष्ट्रीय उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात सोडले आहेत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 22 ऑक्टोबर : इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO LVM3 प्रक्षेपक आपल्या पहिल्या व्यावसायिक प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे. या लाँचरसोबत 5796 किलोग्रॅम वस्तुमानाचे उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. LVM3च्या मदतीने शनिवारी (22 ऑक्टोबर) रात्री 12 वाजून सात मिनिटांनी यूके-स्थित 'वन वेब' या कंपनीचे 36 उपग्रह प्रक्षेपित केले जातील. ते पृथ्वीच्या जवळच्या म्हणजेच लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये इंजेक्ट केले जाणार आहेत. GSLV सीरिजमधल्या नव्याने आणलेल्या 43.5 मीटर उंचीच्या या रॉकेटचं हे पाचवं प्रक्षेपण आहे. चेन्नईजवळच्या श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधल्या दुसऱ्या लाँच पॅडवरून ते आकाशात झेप घेईल.

  इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यूस्पेस इंडिया (NSIL) आणि वनवेब यांच्यातल्या पहिल्या व्यावसायिक कराराचा भाग म्हणून 36 सॅटेलाइट्स प्रक्षेपित केले जाणार आहेत. 2023 पर्यंत अंतराळातल्या 648 उपग्रहांच्या पहिल्या काँन्स्टेलेशनच्या साह्याने जागतिक स्तरावर हाय-स्पीड लो-लेटेन्सी ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणण्याची योजना आखली जात आहे.

  टेलिकॉम टायकून सुनील मित्तल यांची भारती एंटरप्रायझेस कंपनी वनवेब कंपनीतली एक प्रमुख गुंतवणूकदार आणि भागधारक आहे. या कंपनीने 2019 मध्ये आपलं काम सुरू केल्यापासून आतापर्यंत 13 प्रक्षेपणं केली आहेत. आताच्या नवीन प्रक्षेपणामुळे लाँच केलेल्या सॅटेलाइट्सची संख्या 464 पर्यंत वाढेल.

  सर्व वनबेव सॅटेलाइट्स 12 ऑर्बिटल प्लेन्सवर 1200-किमी वर्तुळाकार कक्षेत पसरलेले आहेत. प्रत्येक ऑर्बिटल प्लेनवर 49 सॅटेलाइट्स आहेत. प्रत्येक सॅटेलाइट 109 मिनिटांनी (1.49 तासांनी) पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सॅटेलाइट्समाणे पृथ्वीही फिरते. परिणामी ते नेहमी नवीन स्थानांवरून फिरतात. प्रत्येक सॅटेलाइट रीअल-टाइम आणि हाय स्पीड डेटा प्रसारित करण्यासाठी पृथ्वीवरचे अँटेना आणि ग्राउंड नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतो.

  वाचा - Netflix युजर्स शेअर करू शकणार नाहीत पासवर्ड, भरावं लागेल अतिरिक्त शुल्क

  इस्रोसाठी LVM3-M2 ही मोहिम अद्वितीय आहे. कारण, सॅटेलाइट्स अनेक बॅचमध्ये विभक्त केले जातील, हे इस्रोला सुनिश्चित करावं लागेल. तसंच संपूर्ण प्रक्रियेदरम्यान योग्य प्रकारे डेटा उपलब्ध होईल, याकडेही लक्ष द्यावे लागेल. यामुळे मोहिमेचा कालावधीदेखील वाढेल. सर्व सॅटेलाइट्स पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 601 किलोमीटर उंचीवर ठेवावे लागतील.

  इस्रोच्या सर्वात वजनदार लाँचरचं पहिलं व्यावसायिक प्रक्षेपण

  इस्रोनं आतापर्यंत 345 आंतरराष्ट्रीय उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात सोडले आहेत. त्यासाठी सर्वांत विश्वसनीय मीडियम-लिफ्ट पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकलची (PSLV) मदत झाली आहे. 2017 मध्ये, रॉकेटने मॅपिंगसाठीच्या कार्टोसॅट-2 सॅटेलाइटसह 1378 किलो वजनाचे 103 परदेशी सॅटेलाइट्स अंतराळात पाठवले आहेत. यातले 96 सॅटेलाइट्स अमेरिकेचे, तर नेदरलँड, स्वित्झर्लंड, इस्रायल, कझाकस्तान आणि यूएईचा प्रत्येकी एक सॅटेलाइट होता.

  आत्ताच्या नवीन मोहिमेसह इस्रो आपलं सर्वांत वजनदार रॉकेट LVM-3 हे कमर्शिअल स्पेस लाँचसाठी वापरण्याच्या तयारीत आहे. हे रॉकेट चार हजार किलोग्रॅम वजनाचे सॅटेलाइट्स अवकाशात वाहून नेईल अशी त्याची रचना करण्यात आली आहे. GSLV च्या आधीच्या रॉकेटच्या दोन हजार किलोग्रॅम क्षमतेपेक्षा ही क्षमता दुप्पट आहे. 500 किलोपेक्षा कमी वजनाच्या आणि कमी टर्नअराउंड वेळ लागणाऱ्या सॅटेलाइट्ससाठी इस्रोने स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेइकल (SSLV) विकसित केलं आहे. त्याची पहिली मोहीम ऑगस्टमध्ये झाली.

  First published:

  Tags: Isro, Satellite