मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Jioचं 5G नेटवर्क वापरण्यासाठी नवं सिम घ्यावं लागेल का? कंपनीनं दिली महत्त्वाची माहिती

Jioचं 5G नेटवर्क वापरण्यासाठी नवं सिम घ्यावं लागेल का? कंपनीनं दिली महत्त्वाची माहिती

Jioचं 5G नेटवर्क वापरण्यासाठी नवं सिम घ्यावं लागेल का? कंपनीनं दिली महत्त्वाची माहिती

Jioचं 5G नेटवर्क वापरण्यासाठी नवं सिम घ्यावं लागेल का? कंपनीनं दिली महत्त्वाची माहिती

काही दिवसांपूर्वी जिओच्या 5G सर्व्हिसची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर Jio True 5G सेवा सुरू झाली आहे. कंपनीने आपली सेवा देशातील काही शहरांमध्ये लाइव्ह केली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 9 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी जिओच्या 5G सर्व्हिसची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर Jio True 5G सेवा सुरू झाली आहे. कंपनीने आपली सेवा देशातील काही शहरांमध्ये लाइव्ह केली आहे. 5G सेवा अजून सर्व युजर्सपर्यंत पोहोचलेली नाही. जिओने दसऱ्याच्या मुहूर्तावर चार शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू केली होती. नंतर कंपनीने त्याचा विस्तार आणखी दोन शहरांमध्ये केला आहे. यात 5G सेवा आणि आणखी एक 5G आधारित वाय-फाय फीचर्स यांचा समावेश आहे. दरम्यान, 5G लाँच झाल्यापासून लोकांच्या मनात एक प्रश्न सातत्याने येतोय, तो असा की युजर्सना 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी 5G सिम कार्डची देखील लागेल का? तर याचं उत्तर देत कंपनीने महत्त्वाची माहिती दिली आहे.

   तुम्हाला 5G SIM लागेल का?

  जिओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटनुसार तुमचे Jio सिम 5G रेडी आहे. तुमचे आई-वडील आणि मित्र सर्वांचं सिम 5G आहे. म्हणजेच जिओ युजर्सना नवीन सिम कार्ड घेण्याची गरज नाही. तर, 5G सर्व्हिस त्यांच्या आताच्याच सिम कार्डवर उपलब्ध असेल. तुम्ही आता वापरत असलेलं जिओचं सिमकार्ड 5G आहे.

   हेही वाचा:

  कोणत्या शहरात मिळतेय Jio 5G सर्व्हिस?

  जिओने सुरुवातीला दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांमध्ये आपली 5G सेवा लाँच केली. मात्र, काही दिवसांनी त्याचा विस्तार आणखी दोन शहरांमध्ये करण्यात आला. तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये Jio 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. तसंच राजस्थानच्या नाथद्वारामध्ये कंपनीने Jio 5G वर आधारित Wi-Fi सर्व्हिस लाँच केली आहे.

  कुणाला मिळतेय 5G सर्व्हिस?

  5G सेवा सुरू करण्यासोबतच जिओने वेलकम ऑफरची घोषणा केली होती. या अंतर्गत, Jio 5G सर्व्हिससाठी युजर्सना इनव्हाइट पाठवण्यात येत आहेत. ज्या युजर्सना इनव्हाइट मिळतंय ते Jio 5G सेवेअंतर्गत अनलिमिटेड डेटा अॅक्सेस करण्यास सक्षम असतील. ही एक इनव्हाइट बेस्ड ऑफर आहे आणि केवळ निवडक युजर्सनाच याचा लाभ मिळेल, असं कंपनीने आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला इनव्हाइट आलं असेल तरच तुम्हाला या वेलकम ऑफरचा लाभ मिळेल. तुम्हीही 5G वापरायला आतुर झाला असाल तर तुम्हाला शोधून काढावं लागेल की इनव्हाइट मिळवण्यासाठी काय पात्रता लागते. त्याला तुम्ही पात्र झालात तर तुम्हालाही ही सेवा मिळेल.

  First published:
  top videos

   Tags: 5G, Reliance Jio, Reliance Jio Internet