• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • ...म्हणून मोबाईल सिम कार्डचा एक कोपरा कापलेला असतो!

...म्हणून मोबाईल सिम कार्डचा एक कोपरा कापलेला असतो!

कोणताही मोबाइल हँडसेट वापरण्यासाठी (Mobile) सिमकार्ड (SIM Card) आवश्यक असतं, हे आपण जाणतोच. सिमकार्ड या शब्दातील SIM चा फुलफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्युल (Subscriber Identity Module) असा आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जुलै : कोणताही मोबाइल हँडसेट वापरण्यासाठी (Mobile) सिमकार्ड (SIM Card) आवश्यक असतं, हे आपण जाणतोच. सिमकार्ड या शब्दातील SIM चा फुलफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्युल (Subscriber Identity Module) असा आहे. सिमकार्ड तुम्ही कधी बारकाईने पाहिलं आहे का? 15 मिमी लांब, 25 मिमी रुंद आणि 0.76 मिमी जाडीचं हे सिमकार्ड नीटपणे पाहिल्यास त्याचा एक कोपरा कापलेला दिसतो. सर्व सिमकार्ड याच आकाराची असतात. सिमकार्डचे अन्य कोपरे व्यवस्थित असताना एक कोपरा कापलेला असण्याचं नेमकं कारण काय? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. सिमकार्ड हे एक इंटिग्रेटेड सर्किट (Integrated Circuit) असतं आणि ते ऑपरेटिंग सिस्टीम चालवतं. या कार्डमध्ये इंटरनॅशनल मोबाइल सबस्क्रायबर आयडेंटिटी (IMSI) सुरक्षितपणे साठवलेली असते. सिमकार्ड खरेदी केल्यानंतर प्रत्येक सबस्क्रायबरला एक युनिक क्रमांक (Unique Number) मिळतो. IMSI आणि युनिक क्रमांकामुळे डिव्हाइसवरच्या युजरची ओळख पटते. मोबाइलमध्ये सिम टाकताना ते कुठे आणि कोणत्या बाजूने घालायचं, हे समजण्यासाठीही सिमकार्डचा एक कोपरा कापलेला असतो. चुकीच्या पद्धतीने सिमकार्ड फोनमध्ये घातलं जाऊ नये, हा त्यामागचा उद्देश असतो. सिमकार्ड योग्य स्थितीत फोनमध्ये राहावे, हेदेखील त्याचा एक कोपरा कापण्यामागचं एक कारण असतं. मोबाइलमध्ये असलेल्या मायक्रोचिपचा आकारदेखील सिमकार्डप्रमाणेच असतो. त्यावरदेखील एक कट मार्क असतो. या चिपवरच्या प्रत्येक कटमार्कला जीएनडी, व्हिपीपी, आय/ओ, ऑप्शनल पॅड, रिसेट आणि व्हिसीसी अशी नावं ठरलेली असतात आणि त्यांची कामंही ठरलेली असतात. सिमकार्डचा एक कोपरा कापलेला का असतो, हे समजून घेण्यासाठी सिमकार्ड ट्रेच्या रचनेविषयी माहिती करून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक मोबाइलमध्ये एक सिमकार्ड ट्रे असतो. हा ट्रे मोबाइलबाहेर काढता येतो. सिमकार्ड आणि हा ट्रे या दोघांचे डिझाइन एकमेकांना पूरक असतं. सिमकार्ड सेट करताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून या ट्रेचा एक कोपरा कापलेला असतो. या ट्रेचा थेट संबंध सिमकार्डचा काँटॅक्ट आणि मोबाइल कार्डहोल्डर पिनशी असतो. सिमकार्डच्या पिन क्रमांक 1 चा मोबाइल फोनच्या पिन क्रमांकाशी मेळ बसावा याकरिता ट्रेमध्ये सिमकार्डच्या योग्य प्लेसमेंटसाठी एक कटमार्क (Cut mark) केला जातो. सिमकार्ड या कटमार्कमध्ये योग्य पद्धतीने बसलं नाही तर फोन लागण्यास अडचणी निर्माण होतात. या ट्रेमध्ये सिम उलटं घातलं गेलं, तर आपल्याला 'सिम डिसेबल' असा मेसेज दाखवला जातो.
  First published: