मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ना गुजरात, ना महाराष्ट्र! देशातील हे शहर आहे ऑटोमोबाईल कॅपिटल; कशी साधली किमया?

ना गुजरात, ना महाराष्ट्र! देशातील हे शहर आहे ऑटोमोबाईल कॅपिटल; कशी साधली किमया?

ना गुजरात, ना महाराष्ट्र! देशातील हे शहर आहे ऑटोमोबाईल कॅपिटल

ना गुजरात, ना महाराष्ट्र! देशातील हे शहर आहे ऑटोमोबाईल कॅपिटल

अनेक देशी-विदेशी कार उत्पादक कंपन्यांनी चेन्नईमध्ये त्यांचे कारखाने उभारले आहेत. एका अंदाजानुसार, चेन्नईतील या प्लांट्समध्ये दर 3 मिनिटांनी एक कार तयार होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेला. यावरुन सध्या राजकारण सुरू आहे. पण, 18 मे 2006 ही अशी तारीख आहे जी टाटासह कोणताही वाहन उत्पादक विसरू शकत नाही. टाटासारख्या नामांकित कंपनीच्या विरोधात या दिवशी एका मोठ्या आंदोलनाचा पाया रचला गेला. हा तो दिवस होता जेव्हा पश्चिम बंगाल सरकारने सिंगूरमध्ये नॅनो प्लांट उभारण्यासाठी टाटाला 1000 एकर जागा दिली होती. ही बातमी टाटाच्या नॅनो प्लांटची नसली तरी टाटांनी जेव्हा नवीन राज्यात जाऊन प्लांट लावण्याचा विचार केला तेव्हा काय घडले हे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. कोट्यवधींचे नुकसान, कर्मचाऱ्यांना मारहाण आणि नंतर प्लांट हटवणे.

पण देशात असे एक राज्य आहे, ज्याला ऑटो मॅन्युफॅक्चरर्स पॅराडाईज म्हणतात. हे दुसरेतिसरे कोणते नसून तामिळनाडू आहे. जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादकांपासून ते स्वदेशी कंपन्यांपर्यंत अनेकांनी चेन्नईमध्ये त्यांचे प्लांट स्थापन केले आहेत. ते या ठिकाणी इतके आनंदी आहेत की त्यांना येथून जाण्याची इच्छा नाही. चला तर मग जाणून घेऊया असे काय आहे की चेन्नई हे कंपन्यांचे नंदनवन म्हणून उदयास आले आहे.

चेन्नईचं का?

चेन्नईला एक बंदर आहे, त्यामुळे माल आणि गाड्यांची आयात आणि निर्यात करणे सोपे आहे. तसेच, चेन्नई बंदराची कनेक्टिविटी संपूर्ण शहरासाठी अगदी सोपी आहे. इतर शहरांतील बंदरांच्या बाबतीत असे नाही.

चेन्नईच्या उपनगरात किंवा चेन्नईच्या बाहेरील भागात भरपूर जमीन आहे, जी समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असल्यामुळे लागवडीयोग्य नाही, त्यामुळे प्लांट उभारण्यासाठी भरपूर जमीन सहज उपलब्ध होते.

तमिळनाडू सरकारला फार पूर्वीच समजले आहे की विकासाचा एकमेव मार्ग उद्योगांमधून आहे. याची सातत्याने अंमलबजावणी करून कंपन्यांना सर्व सुविधा देण्यात आल्या.

चेन्नईचे हवामान सतत दमट असते, हे हवामान एका प्रकारे कार उत्पादनासाठी अनुकूल आहे. कारण या सीझनमध्ये ओईएम पेंट चांगली पकड घेतो. हाच पेंट कंपनीच्या माध्यमातून तुमच्या वाहनावर येतो. याला सामान्य भाषेत पावडर कोटिंग पेंट म्हणतात.

वाहन उत्पादक कंपन्यांना सरकार सूट देते म्हणा किंवा अनेक प्रकारच्या करांमध्ये सवलत देते.

चेन्नईमध्ये कामगार ते कुशल तंत्रज्ञ आणि अभियंते भरलेले आहेत, कामगारांना त्यांच्याच शहरात काम आणि चांगले पैसेही मिळतात, त्यामुळे ते त्यांचे काम कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे करतात.

देशातील प्रमुख शहरांशी चेन्नईची कनेक्टिव्हिटी रस्ते आणि हवाई मार्गाने खूप चांगली आहे. अशा स्थितीत बनवलेला माल इतर शहरात नेणे सोपे जाते.

वाचा - DELAGE D12: कार आहे की फायटर जेट? 'या" कारचे Photo पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

कोणत्या कंपन्या आहेत

हुंडाई

बि.एम. डब्लू

रेनॉल्ट

निसान

मित्सुबिशी

फोर्ड मोटर्स

यामाहा मोटर्स

महिंद्रा अँड महिंद्रा

फोर्स मोटर्स (कांचीपुरममध्ये)

टाटाचे सध्या येथे छोटे युनिट आहे

यासोबतच अनेक व्यावसायिक वाहन उत्पादक आणि दुचाकी कंपन्या

कंपन्या काय म्हणतात?

महिंद्रा अँड महिंद्राचे ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर आर वेलुसामी म्हणतात की जेव्हा तुम्ही तामिळनाडूमध्ये वाहन तयार करता तेव्हा तुमची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते. सरकार विविध कर सवलती आणि सबसिडी देखील देते.

दुसरीकडे, बीएमडब्ल्यू सारख्या कंपन्या, ज्या आता त्याच्या चेन्नई प्लांटमध्ये 12 मॉडेल्स बनवतात, त्यांनी एकेकाळी असेंबलिंग युनिट म्हणून सुरुवात केली होती. आता कंपनीचा येथे पूर्ण प्लांट आहे. या संदर्भात, डीडब्लूला दिलेल्या मुलाखतीत, बीएमडब्ल्यू चेन्नई प्लांटचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस डोसे म्हणाले की, सरकार, प्रशासन आणि समाज हे तिघेही तुम्हाला इथे काम करण्यासाठी आणि तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करतात. इंडस्ट्रीला कसे सामोरे जायचे हे तिघांनाही माहीत आहे. त्याचेही आम्हाला कौतुक वाटते.

…लहान उद्योजकांनाही मोठी बाजारपेठ

या मोठ्या कंपन्यांच्या मागे छोट्या उद्योजकांनाही मोठी बाजारपेठ मिळाली. कार उत्पादनाशी संबंधित छोटे पुरवठादारही या कंपन्यांच्या आसपास त्यांचे प्लांट लावतात. याचे दोन मोठे फायदे होते. पहिले, छोट्या व्यापाऱ्यांना चालना मिळाली आणि दुसरे म्हणजे या कंपन्यांमुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात दूर झाला.

First published:
top videos

    Tags: Auto expo, Chennai, Tamilnadu