मुंबई 28 डिसेंबर: व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे आजच्या घडीला जगातलं सर्वांत लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप (Instant Messaging App) बनलं आहे. 2020मध्ये तर त्याला जास्तच महत्त्व प्राप्त झालं. कारण मित्रपरिवार, कुटुंबीय यांच्याशी कायम संपर्कात राहण्यासोबतच कामासाठीच्या संवादासाठीही ते प्राधान्याचं साधन बनलं. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या वापरात वाढ झाली आहे. कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे (Coronavirus Pandemic) मार्चमध्ये जेव्हा लॉकडाउन (Lockdown) आणि अन्य परिणाम जाणवू लागले, त्या वेळी व्हॉट्सअॅप कॉल्सवर एका दिवसात सुमारे 15 अब्ज मिनिटांहून अधिक काळ बोलणं होऊ लागलं होतं.
महामारीपूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत त्याच खूपच वाढ झाली होती. स्टॅटिस्टा या रिसर्च फर्मच्या संशोधनानुसार, ऑक्टोबर 2020च्या आकडेवारीनुसार, जगभरात व्हॉट्सअॅपचे दोन अब्जाहून अधिक अॅक्टिव्ह युझर्स आहेत. त्याखालोखाल फेसबुक मेसेंजर 1.3 अब्ज युझर्स, तर वीचॅट 1.2 अब्ज युझर्स वापरतात. भारत ही व्हॉट्सअॅपसाठी मोठी बाजारपेठ आहे.
अँड्रॉइड, आयफोन आणि वेबसाठी नवी फीचर्स आणण्यात, तसंच अपडेट्स लाँच करण्यात व्हॉट्सअॅप या वर्षी खूपच सक्रिय होतं. या वर्षी व्हॉट्सअॅपने सादर केलेल्या नव्या फीचर्सपैकी पाच फीचर्सची माहिती आपण पाहू या. ही अशी फीचर्स आहेत, की जी अनोखी आहेत.
व्हॉट्सअॅप पेमेंट्स (WhatsApp Payments) : व्हॉट्सअॅप पेमेंट्स सेवा सुरू करणं ही या वर्षीची सर्वांत शेवटची आणि मोठी घडामोड होती. व्हॉट्सअॅपच्या भारतातल्या दोन कोटी ग्राहकांना व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा वापरता येईल, अशी घोषणा व्हॉट्सअॅपकडून 2020 या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस या बँकांच्या सहयोगाने भारतात ही सेवा सुरू झाल्याचं फेसबुकच्या या कंपनीने जाहीर केलं. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) यूपीआय (UPI) या पेमेंट सिस्टीमवर ही सेवा आधारलेली आहे. त्याद्वारे युझर्सना पैसे पाठवता येतील, स्वीकारता येतील आणि आणखीही बरंच काही करता येईल. फेसबुक फ्युएल फॉर इंडिया या परिषदेत ही घोषणा करण्यात आली. व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा भारतात सुरू करण्याची परवानगी कंपनीला नोव्हेंबर महिन्यात देण्यात आली होती.
डार्क मोड (Dark Mode) : युझर्सनी अनेक महिने खूप वाट पाहिल्यानंतर व्हॉट्सअॅपने अखेर डार्क मोड सुरू केला. अँड्रॉइड आणि आयफोनसाठी डार्क मोड हे फीचर या वर्षाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलं. अलीकडच्या एका अपडेटनंतर डार्क मोडसाठी नवे चॅट वॉलपेपर्सही उपलब्ध करण्यात आले आहेत. डेस्कटॉप व्हॉट्सअॅपसाठीही डार्क मोड उपलब्ध करून देण्यात आला.
डिसअॅपिअरिंग मेसेजेस (Disappearing Messages): व्हॉट्सअॅपचं डिजअॅपिअरिंग मेसेजेस हे फीचर आता सर्व युझर्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर ऑन केल्यास तुम्ही पाठवलेले मेसेजेस सात दिवसांनंतर आपोआप दिसेनासे होणार आहेत; पण सात दिवसच का? 'आम्ही ही सेवा सात दिवसांच्या अवधीपासून सुरू करतोय. कारण आम्हाला असं वाटतं, की त्यातून मनःशांती मिळते, की संवाद हे कायमस्वरूपी नाहीत. आपण काय आणि कशाबद्दल बोलतो आहोत, हे आपण विसरून चालणार नाही, असा प्रॅक्टिकल दृष्टिकोन त्यामागे आहे. तुम्हाला पाठवण्यात आलेली शॉपिंग लिस्ट किंवा स्टोअर अॅड्रेस यांची तुम्हाला काही दिवस गरज आहे, तोपर्यंत ते राहील, नंतर दिसेनासे होईल,' अशा शब्दांत व्हॉट्सअॅपने या सुविधेचे वर्णन केले आहे.
ग्रुप व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल्स (Group Video Calls, Voice Calls) : जगभरातले लाखो लोक जेव्हा घरून काम करत होते, इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस आणि व्हिडिओ कॉलिंग अॅप्सवर अवलंबून राहत होते, तेव्हा व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलिंग फीचरमध्ये आठ जण सहभागी होऊ शकतील, असं फीचर सुरू केलं. त्याआधी केवळ चारच जण या ग्रुप कॉलमध्ये सहभागी होऊ शकत असत. मार्चमध्ये व्हॉट्सअॅप कॉल्सवर दिवसभरात 15 अब्जाहून अधिक मिनिटं संवाद होत होता.
ग्रुप्स कामस्वरूपी म्यूट (Mute) : त्रासदायक आणि अतिशय अॅक्टिव्ह असलेल्या ग्रुप्सच्या कटकटीपासून कायमची मुक्तता देण्याचं फीचर व्हॉट्सअॅपने लाँच केलं आहे. याआधी ग्रुप जास्तीत जास्त एका वर्षापर्यंतच म्यूट करण्याची सोय होती. आता त्यात Always हा पर्यायही उपलब्ध करण्यात आला आहे. त्याशिवाय आठ तास आणि एका आठवड्यासाठी ग्रुप म्यूट करण्याचा पर्याय आधीपासून आहे. हे पर्याय अँड्रॉइड आणि आयफोनसाठीही आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp