व्हॉट्सअॅप यूजर्सना मोठा धक्का बसणार आहे. कंपनी लवकरच अनेक डिव्हाईसवरून आपला सपोर्ट काढून टाकणार आहे. यामुळे अनेक स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. अशा परिस्थितीत अनेक लोकांना त्यांचा फोन बदलावा लागेल.
WhatsApp वेळोवेळी नवं अपडेट आणत असतं. आता पुन्हा एकदा जुन्या उपकरणांसाठी व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद करण्यात आला आहे. म्हणजेच जुन्या उपकरणांवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
अनेक जुन्या iPhone वर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. हे 24 ऑक्टोबर 2022 पासून iOS 10 आणि iOS 11 आवृत्त्यांवर काम करणाऱ्या आयफोनवर काम करणार नाही. म्हणजेच iOS 12 किंवा त्यावरील आवृत्तीला सपोर्ट न करणाऱ्या iPhones वर व्हॉट्सअॅप काम करणार नाही.
iPhone 5 आणि iPhone 5c वर लेटेस्ट सॉफ्टवेअर वर्जन अपडेट केले जाऊ शकत नाहीत. यामुळे या उपकरणांवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo या साइटनं याबाबतची माहिती दिली आहे.
अशा परिस्थितीत, जर तुमचा आयफोन जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असेल तर तुम्हाला तो लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमवर अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन जनरल या पर्यायावर जावे लागेल. यानंतर, तुम्ही सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करून नवीनतम iOS आवृत्ती स्थापित करू शकता.
नवीन अपडेटसह सुरक्षा बगचे निराकरण केले आहे. हे अपडेट्स नवीन फीचर्ससह देखील येतात. Apple या वर्षी iOS 16 रिलीज करणार आहे. सध्या आयफोन वापरकर्त्यांसाठी iOS 15.6 अपडेट जारी करण्यात आले आहे. एका अहवालानुसार, जवळपास 72 टक्के आयफोन लेटेस्ट iOS वर काम करत आहेत.