मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

व्हॉटसअ‍ॅपने भारतात दाखल केलं नवीन ‘इन अ‍ॅप नोटिफिकेशन’ फिचर, कसा कराल वापर? जाणून घ्या

व्हॉटसअ‍ॅपने भारतात दाखल केलं नवीन ‘इन अ‍ॅप नोटिफिकेशन’ फिचर, कसा कराल वापर? जाणून घ्या

whatsapp ओपन करून स्क्रिनवर उजव्या हाताला, टॉपला तीन डॉट असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा. तेथे Payments ऑप्शनवर जा आणि Add payment method वर टॅप करा. तेथे विविध बँकांचे ऑप्शन मिळतील.

whatsapp ओपन करून स्क्रिनवर उजव्या हाताला, टॉपला तीन डॉट असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा. तेथे Payments ऑप्शनवर जा आणि Add payment method वर टॅप करा. तेथे विविध बँकांचे ऑप्शन मिळतील.

अ‍ॅप घेतल्यानंतर दोन वेगवेगळ्या पद्धतीनं युजर्सना नोटिफिकेशन्स मिळतात.

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : फेसबुकची (Facebook)कंपनी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने (Whats app) आपल्या भारतातील युजर्ससाठी ‘इन अ‍ॅप नोटिफिकेशन’ (In -app Notification) हे नवीन फिचर दाखल केले आहे. नावाप्रमाणे हे फिचर युजर्सना नोटिफिकेशन्स किंवा अलर्ट्स देते. अ‍ॅप घेतल्यानंतर दोन वेगवेगळ्या पद्धतीनं युजर्सना नोटिफिकेशन्स मिळतात. सध्या हे फिचर आयओएससाठी उपलब्ध असून, अँड्रॉईड युजर्ससाठीही हे फिचर लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतातील आयओएस युजर्स सेटिंगमध्ये नोटिफिकेशन्समध्ये जाऊन इन-अ‍ॅप नोटिफिकेशन बघू शकतात. युजर्सना अलर्ट स्टाईल कशी हवी ती उपलब्ध पर्यायांमधून निवडावी लागेल. तिथे एक म्हणजे नन (None), दुसरा बॅनर्स (Banners) आणि तिसरा अलर्ट्स (Alerts) असे तीन पर्याय दिसतील. बॅनर्स (Banners) हा पर्याय निवडला तर स्क्रीनच्या सर्वांत वरच्या बाजूला नोटिफिकेशन दिसेल आणि आपोआप निघून जाईल. अलर्ट्स (Alerts) हा पर्याय निवडला तर रिक्वायर्स अ‍ॅक्शन बिफोर प्रोसिडिंग्ज ( requires action before proceeding) असा संदेश मिळेल. त्याचप्रमाणे नन (None) हा पर्याय सिलेक्ट केला तर युजर्सना कोणतेही इन-अ‍ॅप नोटिफिकेशन येणार नाही. नन (None) वगळता इतर दोन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडला तर त्यात साउंड आणि व्हायब्रेट यापैकी एक पर्यायही युजर्सना निवडता येईल. या नवीन फिचरमुळे कंपनीला व्हॉटसअ‍ॅपवर उपलब्ध होणाऱ्या नवीन अपडेट्सबाबत युजर्सना पूर्वसूचना देता येईल. ज्याप्रमाणे टेलिग्राम त्यांच्या अ‍ॅपमध्ये होणाऱ्या बदलांबाबत युजर्सना पूर्वसूचना देते तशीच ही सुविधा आहे. यासाठी खास याकरताच तयार करण्यात आलेला चॅटबोट वापरण्यात आला आहे. हे इन-अ‍ॅप नोटिफिकेशन फिचर प्रथम व्हॉट्सअ‍ॅप बीटा इन्फोवर (WABetaInfo) दृष्टीस पडलं होतं. फेब्रुवारी 2021 मध्ये याच्या वापराबाबतचे नियम निश्चित होतील, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार युजर्सना नवीन अटी आणि शर्ती स्वीकारण्याची सुविधा आहे. व्हॉट्सअ‍ॅपशी संबधित आणखी एक नवीन फिचर कंपनीने आणले असून, त्याद्वारे युजर्सना प्रत्येक चॅटसाठी आपल्याला हवा तसा वॉलपेपर ठेवता येणार आहे. त्याचबरोबर नवीन स्टीकर कलेक्शन आणि स्टीकर सर्चही कंपनी आणत असून, येत्या काही आठवड्यातच हे फिचर युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, नवनवीन फीचर्समुळे त्याची उपयुक्तता वाढत आहे. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी कंपनी सातत्याने नाविन्यपूर्ण फिचर्स आणण्यावर भर देत आहे.
First published:

Tags: Whats app news

पुढील बातम्या