व्हाॅट्सअॅपमध्ये आलं हे नवं फिचर, तुम्ही पाहिलं का?

व्हाॅट्सअॅपमध्ये आलं हे नवं फिचर, तुम्ही पाहिलं का?

इतर फिचर्सच्या तुलनेत या फिचरचा वापर करणं फारच सोप आहे. कोणत्याही चॅटला लिस्टमध्ये सर्वात वर ठेवण्यासाठी अगोदर त्याला लाँग प्रेस करावं लागेल.

  • Share this:

19 मे : व्हाॅट्सअॅपने पिन टू टॉप हे नवे फिचर लाँच करत आपल्या युजर्सला आणखी एक सुखद धक्का दिलाय. याआधी या फिचरचा वापर फक्त एंड्रॉइड बीटा युजर्स करू शकत होते. आता मात्र एंड्रॉइड वापरणारे ग्राहकही हे फिचर वापरू शकतात.

काय आहे पिन टू टॉप फिचरचा फायदा ?

तुम्ही तुमच्या आवडत्या चॅट्सला पिन टू टॉप करू शकता. ज्यामुळे ते चॅटलिस्टमध्ये सगळ्यात वर दिसेल.

ग्राहक जास्तीत जास्त 3 काँटॅक्ट्स ला पिन टू टॉप ठेवू शकतात.

ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅट्स पाहण्यासाठी लांबलचक लिस्ट स्क्रोल करायला लागू नये यासाठीच हे फिचर दिलं गेलंय, असं व्हाॅट्सअॅपकडून सांगण्यात आलंय.

कसा कराल वापर ?

इतर फिचर्सच्या तुलनेत या फिचरचा वापर करणं फारच सोप आहे. कोणत्याही चॅटला लिस्टमध्ये सर्वात वर ठेवण्यासाठी अगोदर त्याला लाँग प्रेस करावं लागेल. त्यानंतर वर पिन आयकॉन दिसेल, त्या आयकॉनला टच करताच तुम्हाला हवा असलेला चॅट सर्वात वर दिसेल.

याबरोबरच कधी तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राबरोबर खूप जास्त चॅटिंग केली तर ती शॉर्टकट स्वरूपात होमस्क्रीनवरही ठेवता येवू शकते. यामुळे त्या मित्राचा व्हाॅट्सअॅप डीपीचा एक आयकॉन तुमच्या होम स्क्रीनवर दिसू शकेल आणि त्यावर क्लिक करताच तुमच्यात झालेला संवाद लगेच ओपन होईल.

First published: May 19, 2017, 10:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading