मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp Web वापरताय? लवकरच तुमच्यासाठी येतंय 'हे' जबरदस्त फीचर

WhatsApp Web वापरताय? लवकरच तुमच्यासाठी येतंय 'हे' जबरदस्त फीचर

WhatsApp लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे. आता WhatsApp Webवरुन व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल सुविधा सुरू होणार आहे.

WhatsApp लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे. आता WhatsApp Webवरुन व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल सुविधा सुरू होणार आहे.

WhatsApp लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे. आता WhatsApp Webवरुन व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल सुविधा सुरू होणार आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर: सध्याच्या घडीला व्हॉट्सॲप (WhatsApp) हे अत्यंत गरजेचं झालं आहे. व्हॉट्सॲपमुळे लोकांशी बोलणं, फोटो शेअर करणं, व्हिडिओ शेअर करणं, किंवा व्हिडिओ कॉल करणं अत्यंत सोपं झालं आहे. तसंच व्हॉट्सॲपच्या व्हॉट्सॲप वेब (WhatsApp web) या फीचरमुळे आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सॲप आपल्याला लॅपटॉप (laptop)वर वापरता येतं. फेसबुक (Facebook)च्या मालकीचं असलेला हा मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप वेबवर लवकरच व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल सुविधा घेऊन येणार आहे. एका अहवालानुसार व्हॉट्सॲप वेबच्या व्हर्जन 2.2043.7 झालेल्या अपडेटमध्ये हे वैशिष्ट्य आहे. WABetaInfo मधील अहवालानुसार व्हॉट्सॲप वेबमध्ये हा बदल करण्यात येणार आहे. या अहवालात असंही म्हटलं आहे की व्हॉट्सॲप त्यांच्या वेबमध्ये त्यासाठी आवश्यक  विकास करत असून काही दिवसांनी ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

या अहवालात आणखी काही नवीन बदलसुद्धा देण्यात येणार आहेत, ज्यात वापरकर्त्यांना जेव्हा कॉल येईल तेव्हा विंडो पॉप-अप होईल, येणारा कॉल स्वीकारणं, नाकारणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं या पर्यायांसह एक छोटी 'इन्कमिंग कॉल' विंडोसुद्धा देण्यात येणार आहे. या विंडोमध्ये येणारा कॉल अत्यंत सहजरित्या पाहता येईल. आउट गोईंग कॉलसाठी पॉप-अप विंडो लहान असणार आहे. याव्यतिरिक्त ती कॉलिंग, रिंगिंग आणि कॉल टायमर या गोष्टी दर्शवणार आहे. WABetaInfo च्या अहवालात असं म्हटलंय की या अपडेटमुळे व्हॉट्सॲप वेबवर ग्रुप कॉलिंगसुद्धा करता येणार आहे.

व्हॉट्सॲप वेबवरून व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करता यावेत, यासाठी जगभरातील वापरकर्त्यांकडून खूप मोठी मागणी करण्यात आली होती.आतापर्यंत व्हॉट्सॲप किंवा फेसबुकने या बदलांबाबत कुठलीही माहिती समोर आणलेली नाही. ही खूपच चांगली गोष्ट आहे की व्हॉट्सॲप वापरकर्त्यांकडून फीडबॅक घेऊन ज्या बदलांची मागणी वापरकर्त्यांकडून जास्तीत जास्त प्रमाणात केली जात आहे यावर आता व्हॉट्सॲप प्रामुख्याने काम करत आहे व तसे बदल घडवून आणत आहे.

First published:

Tags: Video call