मुंबई, 26 जुलै : सोशल मीडियातलं सगळ्यांत लोकप्रिय अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप (WhatsApp ). व्हॉट्सअॅप (WhatsApp ) त्याच्या फीचर्समुळे प्रचंड लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅप (WhatsApp) त्यांच्या युझर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतं. मागणीनुसार किंवा गरजेनुसार कंपनी विविध स्टिकर्स किंवा इमोजी लाँच करतं. नुकतंच कंपनीनं ‘Disappearing Message’ हे फीचर लाँच केलं होतं. हे फीचर युजर्सना खूप आवडलं होतं.अनेकांना हे फीचर सोयीस्कर वाटलं होतं. आता कंपनीनं या पुढचं एक नवीन फीचर आणलं आहे. आता तुम्ही ‘Disappearing Message’ मोड ऑन करून असे WhatsApp मेसेज पाठवू शकता जे काही वेळानंतर गायब होतील. तुमचा मेसेज गायब होण्यासाठीचे कालावधीचे पर्यायही यामध्ये देण्यात आले आहेत. त्यानुसार मेसेज 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवसांनंतर गायब होण्यासाठीचे पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी कोणताही एक पर्याय निवडून तुम्ही ‘Disappearing Message ’ मोड ऑन करू शकता. यामध्ये चॅटमधून पाठवण्यात आलेले नवे मेसेज निवडलेल्या पर्यायानुसार गायब होतील. तुम्ही जो पर्याय निवडला असेल त्याचा परिणाम चॅटच्या फक्त नवीन मेसेजेसवरच होणार आहे. हा मोड ऑन केल्यानंतर तुम्हाला आलेले जुने मेसेजेस गायब होणार नाहीत. जर तुम्हालाही हे फीचर अॅक्टीव्ह करायचं असेल तर त्यासाठीच्या स्टेप्स जाणून घ्या चॅट करणाऱ्या दोन्ही यूजर्सपैकी कोणीही हा मोड ऑन करू शकतो. Disappearing Message मोड कसा ऑन करायचा - Step 1- WhatsApp चॅट उघडा. Step 2- तुम्हाला ज्याच्याशी चॅट करायचं आहे त्याच्या कॉन्टॅक्टवर ( Contact Name) टॅप करा. Step 3 - मेसेज गायब करायच्या पर्यायावर टॅप करा. जर विचारलं तर Continue वर टॅप करा. Step 4 - 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवस यापैकी एका पर्यायाची निवड करा. Step 5 - ज्या चॅट्समध्ये ‘Disappearing Message Mode’ म्हणजेच गायब होणारा मेसेज मोड ऑन करायचा आहे, त्या मेसेजसना निवडा. Step 6 - ग्रीन टिकवर (Green Tick) टॅप करा. Step 7 - Done वर टॅप करा. बँकेशी संबंधित ‘हे’ नियम 1 ऑगस्टपासून बदलणार, तुमच्या खिशावर कसा फरक पडेल? Disappearing Mode बंद कसा करणार? चॅट करताना दोन्ही युजर्सपैकी कोणीही हा मोड कधीही ऑफ करू शकतं. हा मोड ऑन केल्यानंतर चॅटमध्ये पाठवलेले,आलेले मेसेजेस गायब होणार नाहीत. यासाठीच्या स्टेप्स खालीलप्रमाणे - Step 1 - WhatsApp चॅट उघडा. Step 2 - तुम्हाला ज्याच्याशी चॅट करायचं आहे त्याच्या कॉन्टॅक्टवर ( Contact Name) टॅप करा. Step 3- मेसेजेस गायब करायच्या पर्यायावर टॅप करा. जर विचारलं तर Continue वर टॅप करा. Step 4- ‘Off’ अर्थात ऑफ हा पर्याय निवडा. Step 5- ग्रीन टिकवर (Green Tick) टॅप करा. Step 6- Done वर टॅप करा. हे फीचर वापरणं खूप सोपं आहे, तेव्हा नवीन WhatsApp फीचर नक्की वापरून बघा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.