जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Wi-fi माहिती असेल, पण Li-fi माहिती आहे का? असं चालवू शकता इंटरनेट

Wi-fi माहिती असेल, पण Li-fi माहिती आहे का? असं चालवू शकता इंटरनेट

Wi-fi माहिती असेल, पण Li-fi माहिती आहे का? असं चालवू शकता इंटरनेट

बहुतांश दैनंदिन कामं ऑनलाइन (Online) झाल्यानं साहजिकच इंटरनेटचा (Internet) वापर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड वाढल्यानं इंटरनेट अतिशय गरजेचं झालं आहे. स्मार्टफोन, टॅब किंवा लॅपटॉपवर इंटरनेटचा वापर करण्यासाठी प्रामुख्यानं वाय-फाय (Wi-Fi) यंत्रणा उपयुक्त ठरते.

    मुंबई, 26 मे : बहुतांश दैनंदिन कामं ऑनलाइन (Online) झाल्यानं साहजिकच इंटरनेटचा (Internet) वापर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे `वर्क फ्रॉम होम`चा ट्रेंड वाढल्यानं इंटरनेट अतिशय गरजेचं झालं आहे. स्मार्टफोन, टॅब किंवा लॅपटॉपवर इंटरनेटचा वापर करण्यासाठी प्रामुख्यानं वाय-फाय (Wi-Fi) यंत्रणा उपयुक्त ठरते. ऑफिसेस किंवा घरात वापरली जाणारी वाय-फाय सुविधा आता रेस्टॉरंट, हॉटेल्स तसंच रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणीही उपलब्ध आहे. परंतु, वाय-फाय प्रमाणेच लाय-फाय (Li-Fi) नावाचीदेखील एक सुविधा असते, ही बाब फार कमी लोकांना माहिती आहे. लाय-फाय ही इंटरनेटशी संबंधित सुविधा आहे. पण तिची कार्यप्रणाली काहीशी निराळी आहे.

    लाईट फिडेलिटी (Light fidelity) हा लाय-फायचा फुल फॉर्म आहे. ही एक वायरलेस टेक्नॉलॉजी (Wireless Technology) आहे. डाटा ट्रान्सफर (Data Transfer) करण्यासाठी या टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. इंटरनेटवरून 1,0 या स्वरुपात डाटा ट्रान्सफर केला जातो. याला बायनरी भाषा असं म्हणतात. याचाच अर्थ इंटरनेटवर तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या गोष्टी या 0,1 या माध्यमातून उपलब्ध होतात. वाय-फाय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही इंटरनेट वापरता तेव्हा डाटा रेडिओ सिग्नलच्या (Radio Signal) माध्यमातून येतो. वाय-फायमध्ये कोणताही सिग्नल 0,1 च्या माध्यमातून ट्रान्सफर होतो. परंतु, लाय-फायचं तंत्र काहीसं वेगळं आहे. यात एलईडी बल्बच्या (LED Bulb) माध्यमातून इंटरनेट सेवा मिळते. ही सिस्टीम सध्या फारशी वापरली जात नाही.

    येत्या काळात लाय-फाय सिस्टीमचा वापर वाढेल आणि लाईटच्या माध्यमातून इंटरनेट सेवा मिळेल, असं मानलं जातं. या सिस्टीमच्या फायद्याविषयी बोलायचं झालं तर, वाय-फायच्या तुलनेत लाय-फायचा स्पीड अधिक असेल. पण ही बाब अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. या सिस्टीमचा वापर मर्यादित केला जात असल्यानं ती अधिक सुरक्षित आहे. लाय-फायचे लाईट जिथपर्यंत पोहोचतील, त्या क्षेत्रातच इंटरनेटचा वापर करता येतो. त्यामुळे तुमचं इंटरनेट अन्य कोणीही व्यक्ती वापरू शकणार नाही आणि विजेचीही बचत होणार आहे.

    लाय-फाय सिस्टीमच्या तोट्यांचा विचार करता, तुम्हाला विनालाईट या सिस्टीमचा वापर करता येणार नाही. तसंच अंधारात तुम्हाला लाय-फाय वापरता येणार नाही. वाय-फायच्या तुलनेत लाय-फाय ही खूप महागडी सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत ही सिस्टीम वापरताना तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सिस्टीमचं एक मर्यादित क्षेत्र असेल आणि त्याचठिकाणी तुम्हाला इंटरनेटचा वापर करता येईल.

    लाय-फायमध्ये लाईटच्या माध्यमातून डाटा ट्रान्सफर होतो. या सिस्टीममध्ये एक एलईडी बल्ब लावलेला असतो आणि त्याच्या प्रकाशाद्वारे डाटा ट्रान्सफर केला जातो. याचाच अर्थ यात एलईडीच्या माध्यमातून इंटरनेट सेवा मिळते. रेडिओ सिग्नलद्वारे डाटा पाठवला जाऊ शकतो. परंतु, यात लाईट कायम चालूच राहते तर मग 1,0 असं कसं पाठवता येईल, असा प्रश्न पडू शकतो. पण लाय-फायमधील एलईडी बल्ब फ्लिक करेल आणि त्याद्वारे डाटा पाठवता जाईल. हा बल्ब एका सेकंदात लाखो वेळा चालू-बंद होतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला इंटरनेट मिळतं. पण ही प्रक्रिया अतिशय जलद होत असल्यानं तुम्हाला त्याविषयी समजून येत नाही.

    अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लाय-फायमधल्या एका एलईडी बल्बच्या माध्यमातून तुम्हाला इंटरनेट उपलब्ध होतं. अगदी घरात एक एलईडी लावला की त्याच्या प्रकाशाद्वारे तुम्हाला इंटरनेट सेवा मिळू लागते. यात एक विशिष्ट सिस्टीम आणि लॅम्प ड्रायव्हर असतो. डाटा ट्रान्सफर करणं हे या सिस्टीमचं प्रमुख काम असतं. तसंच यात एक एलईडी बसवलेला असतो आणि त्याद्वारे तुम्हाला इंटरनेट सेवा मिळते. लाय-फाय सिस्टीम ही फारशी वापरली जात नाही. लाय-फाय सर्वसामान्य होण्यासाठी बराच काळ लागणार आहे. यासाठी काही विशेष डिव्हाइसची (Device) आवश्यकता असते, तसंच तुमची सिस्टीम देखील लाय-फायला सपोर्ट करणारी हवी. त्यामुळे ही सिस्टीम अद्याप फारशा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आणि ती प्रचलित होण्यासाठीदेखील बराच काळ लागू शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात