मुंबई, 11 डिसेंबर : तुम्हाला देखील ट्विटर वापरण्यात अडचण येत असेल. तर नेटवर्क कंपनी किंवा मोबाईलवर राग काढू नका. कारण, अशी अडचण येणार तुम्ही एकटेच नाहीत. देशभरात संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ट्विटर डाऊन झाल्याची माहिती मिळाल्याने रविवारी ट्विटर वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. Twitter सारख्या साइट्सच्या ऑपरेशनवर लक्ष ठेवणारे पोर्टल DownDetector ने सांगितले की, भारतात संध्याकाळी 7 वाजता, 2,838 वापरकर्त्यांनी Twitter नीट काम करत नसल्याची तक्रार केली. अनेक वापरकर्त्यांच्या टाइमलाइन पूर्णपणे रिकाम्या झाल्या, तर अनेकांच्या टाइमलाइन्स अजिबात रिफ्रेश होत नाहीत. या सगळ्याशिवाय अनेक युजर्सचे ट्विटर अकाउंट पूर्णपणे बंद झाले आहे. तर काही वेळापूर्वी ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी एक ट्विट शेअर करत म्हटले आहे की, ‘उद्या बॉट्ससाठी सरप्राईज आहे. अनेक वापरकर्त्यांनी टि्वटर अॅप फक्त अँड्रॉइड हँडसेटवर डाऊन झाल्याची प्रतिक्रिया दिली. त्याच वेळी, काहींनी असा दावा केला की अॅप काही नेटवर्कवर काम करत आहे आणि काहींवर बंद आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने दावा केला आहे की ट्विटर व्हीपीएन कनेक्शनसह चांगले काम करत आहे. यापूर्वी जुलैमध्ये मायक्रो-ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार नोंदवली होती, त्यानुसार त्यांना ट्विटर ऍक्सेस करण्यात अडचणी येत होत्या. ट्विट करण्यात आणि ट्विट पाहण्यातही त्रास होत होता. वाचा - असा एक AI बॉट जो लाखो लोकांना बेरोजगार करू शकतो आणि गुगलला सुद्धा मागे टाकू शकतो फेब्रुवारीमध्ये ट्विटर दोनदा ठप्प झाले होते फेब्रुवारी 2022 मध्येही ट्विटरच्या सेवा आठवड्यातून दोनदा ठप्प झाल्या होत्या. अनेक यूजर्सला ट्विटर वापरताना अडचणी येत होत्या. युजर्सच्या म्हणण्यानुसार, अॅप ओपन केल्यावर त्यांना ‘Something Went Wrong. Try Reloading’ असा मॅसेज येत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.