Realme चे 2 धमाकेदार स्मार्टफोनमध्ये आज फ्लॅश सेल आहे. आज Realme 6i चा पहिला सेल आहे, तर Realme Narzo 10A मध्येदेखील फ्लॅश सेल असणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन बजेट सेक्शनमध्ये आहेत. आज दुपारी 12 पासून या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री Flipkart आणि realme.com वर सुरू झाली आहे.
गेल्या आठवड्यात Realme 6i स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता, तो युरोपमध्ये लॉन्च झालेल्या Realme 6s चा रिब्रँडेड वर्झन आहे. (सौजन्य - Realme )
या दोन्ही स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट आणि रियलमी डॉट कॉम कंपनी जबरदस्त ऑफर देत आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड आणि EMI वर 5 टक्के सूट असणार आहे. तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड, अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड आणि 3-9 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय प्लॅनवर ग्राहकांना 100% सुपर कॅशबॅक मिळणार आहे. रियलमीची वेबसाइट मोबिक्विक वापरकर्त्यांसाठी 100 टक्कँपर्यंत सुपर कॅश ऑफर देत आहे. (सौजन्य - Realme )
Realme 6i- हा स्मार्टफोन दोन वेरियंटमध्ये आला आहे. 4GB रॅम + 64GB स्टोरेजवाल्या वेरियंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर 6GB रॅम + 64GB स्टोरेजवाल्या वेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. हे दोन्ही कलर ऑप्शन इक्लिप्स ब्लॅक आणि लूनर व्हाईमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. (सौजन्य - Realme )
Realme Narzo 10A- Narzo 10A, 3GB रॅम + 32GB स्टोरेजवाल्या वेरियंटची किंमत 8,999 रुपये आहे. तर 4GB रॅम + 64GB स्टोरेजवाल्या वेरियंटचीं किंमत 9,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लू आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. (सौजन्य - Realme )
Realme 6i मध्ये 6.5 इंचीची फुल HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G90T प्रोसेसरशी पावर्ड आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे. (सौजन्य - Realme )
याचा प्राइमरी कॅमरा 48 मेगापिक्सलचा आहे. या व्यतिरिक्त फोनच्या बॅकमध्ये 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमरा देण्यात आला आहे. तर 2-2 मेगापिक्सलचे दोन आणि सेंसर देण्यात आले आहे. (सौजन्य - Realme )