आता लक्ष्य 5G... कोण करणार भारतात या नव्या क्रांतीची सुरुवात?

आता लक्ष्य 5G... कोण करणार भारतात या नव्या क्रांतीची सुरुवात?

दिल्लीत सुरू झालेल्या तिसऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसकडे अनेकांचं लक्ष आहे ते येऊ घातलेल्या नव्या 5G तंत्रज्ञानाविषयीच्या उत्सुकतेमुळे. सरकारनं या परिषदेचं आयोजन केलंय आणि त्याचं उद्घाटन टेलिकॉम या क्षेत्रातल्या बड्या उद्योजकांनी केलं. भारताची १०० टक्के जनता लवकरच 4G सेवा वापरू लागेल, असं जिओचे अनिल अंबानी उद्घाटनाच्या वेळीच म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : दिल्लीत सुरू झालेल्या तिसऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसकडे अनेकांचं लक्ष आहे ते येऊ घातलेल्या नव्या 5G तंत्रज्ञानाविषयीच्या उत्सुकतेमुळे. सरकारनं या परिषदेचं आयोजन केलंय आणि त्याचं उद्घाटन टेलिकॉम या क्षेत्रातल्या बड्या उद्योजकांनी केलं. RILचे चेअरमन अनिल अंबानी यांच्यासह भारती एअरटेलचे सुनील मित्तल आणि आयडिया- व्होडाफोन इंडियाचे कुमारमंगलम बिर्ला उपस्थित होते.

2 वर्षांत मोबाईल डेटा वापरणाऱ्यांचं प्रमाण विक्रमी वाढलंय. आपल्या देशातली ही वाढ जगात सगळ्यांत जास्त आहे.  २०२०मध्ये भारत देश डिजिटल कंझम्प्शनमध्ये सर्वांत मोठ्या देशांपैकी एक होईल आणि तेव्हा आपण 5G पर्यंत पोहोचू. या डिजिटल क्रांतीचं आपण स्वागत करायला हवं, असं RILचे चेअरमन अनिल अंबानी यांनी सांगितलं.

देशात लवकरच सर्वच जण 4G सेवा वापरायला लागतील. अल्पावधीत भारत १०० टक्के 4G नेशन होईल, असंही अंबानी म्हणाले. इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

4G कनेक्टिव्हिटी गावागावात पोहोचवण्याचं आपलं ध्येय आहे. सगळ्यांपर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी पोहचवणं आणि तेही किफायतशीर किमतीत यासाठी जिओ कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले.

ही मोबाईल परिषद दिल्लीत सुरू असून आगामी 5G टेक्नॉलॉजी हाच या परिषदेचा मुख्य मुद्दा असणार आहे. सप्टेंबर २०१६पासून जिओनं अगदी कमी किमतीत 4Gडेटा सर्व्हिस सुरू केल्यानं टेलिकॉम कंपन्यांमध्ये दरयुद्ध सुरू झालं. त्यात काही मोठ्या कंपन्यांनी जिओशी टक्कर देण्याच्या उद्देशाने विलिनीकरणही केलं. या पार्श्वभूमीवर आता ही तिसरी मोबाईल काँग्रेस सुरू असल्यानं याचं महत्त्व वाढलं आहे.

भारतातले मोठे टेलिकॉम ऑपरेटर आणि या क्षेत्रातले सगळेच मोठे उद्योजक या परिषदेत सामील झाले आहेत.

पत्नीच्या जागेवर स्टॉल लावला म्हणून शिवसैनिकांनी उत्तर भारतीयाला धुतलं

First published: October 25, 2018, 12:43 PM IST

ताज्या बातम्या