जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Electric Airplane: जगातील पहिलं इलेक्ट्रिक विमान ‘अ‍ॅलिस’चं उड्डाण यशस्वी, 'ही' आहेत वैशिष्ट्ये

Electric Airplane: जगातील पहिलं इलेक्ट्रिक विमान ‘अ‍ॅलिस’चं उड्डाण यशस्वी, 'ही' आहेत वैशिष्ट्ये

जगातील पहिलं इलेक्ट्रिक विमान ‘अ‍ॅलिस’चं उड्डाण यशस्वी, 'ही' आहेत वैशिष्ट्ये

जगातील पहिलं इलेक्ट्रिक विमान ‘अ‍ॅलिस’चं उड्डाण यशस्वी, 'ही' आहेत वैशिष्ट्ये

World’s First Electric Airplane: जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘अ‍ॅलिस’ असं या विमानाचं नाव आहे. जगातील पहिले इलेक्ट्रिक विमान अ‍ॅलिसने यशस्वीपणे उड्डाण केलंय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 1 ऑक्टोबर: जगभरात दळण-वळणाच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर करून विविध कंपन्या इलेक्ट्रिक कार, बाईक, ऑटो, बसेसची निर्मिती करत आहेत. आता या यादीमध्ये विमानही समाविष्ट झालंय. जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘अ‍ॅलिस’ असं या विमानाचं नाव आहे. जगातील पहिले इलेक्ट्रिक विमान अ‍ॅलिसने यशस्वीपणे उड्डाण केलंय. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असलेल्या ग्रँट काउंटी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अ‍ॅलिस विमानाने यशस्वी उड्डाण केलं आणि सुमारे 8 मिनिटं ते हवेत उडत होतं. त्यानंतर त्याने अगदी सहजरित्या लँडिंग केलं. या विमानाने यशस्वी उड्डाण केल्यानंतर एक इतिहास रचला गेलाय. हा इतिहास इस्रायली कंपनी ईव्हिएशन एअरक्राफ्टने रचला आहे. या विमानाची अनेक वैशिष्ट्यं आहेत आणि ते विमान दिसायलाही खूप सुंदर आहे. या विमानाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. अ‍ॅलिसचा स्पीड 480 किमी प्रतितास आहे. त्यात नऊ लोक प्रवास करू शकतात आणि एकदा चार्ज केल्यावर ते 250 नॉटिकल माइल्स म्हणजेच सुमारे 400 किमीचं अंतर सहज पार करू शकतं. हे विमान दोन तास सहज उडवता येतं. विमान 2500 पाउंड म्हणजेच सुमारे 1100 किलो वजनासह उड्डाण करू शकतं. पहिल्याच उड्डाणामध्ये अ‍ॅलिसने आकाशात 3500 फूट उंची गाठली आणि यादरम्यान अनेक महत्त्वाचा डेटाही गोळा करण्यात आला. हा डेटा विमानाचा व्यावसायिक वापर करण्याविषयी होता. या डेटाच्या मदतीने हे विमान अधिक चांगलं कसं करता येईल, हे कळू शकेल आणि त्यानुसार त्यात बदल करता येतील. हेही वाचा: 5G लाँचनंतर 10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे ईव्हिएशन एअरक्राफ्ट कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ ग्रेगरी डेव्हिस यांनी या विमानाच्या यशस्वी उड्डाणाबद्दल सांगितलं. ते म्हणाले, ‘आज या विमानाने यशस्वी उड्डाण केल्यानंतर एक नवा इतिहास रचण्यात आला आहे. आम्ही पिस्टन इंजिनवरून टर्बाइन इंजिनकडे शिफ्ट झालो होतो, तेव्हापासून ईव्हिएशन टेक्नॉलॉजीत कोणताही बदल झालेला नाही. 1950 मध्ये जेव्हा हे नवीन तंत्रज्ञान आलं होतं, तेव्हापासून आजतागायत त्यामध्ये कोणताही विशेष बदल झालेला नाही.’

    News18लोकमत
    News18लोकमत

    दरम्यान, कंपनी सध्या विमानाच्या तीन व्हेरियंटवर काम करत आहे. जे सध्या प्रोटोटाइप टप्प्यात आहेत. यात एक कार्गो व्हेरियंट आहे, दुसरा 9 सीटर आणि तिसरा कार्गोसह 6 सीटर व्हेरियंट आहे. या सर्व व्हेरियंटमध्ये दोन क्रू मेंबर्ससाठीही जागा असेल.अ‍ॅलिसमध्ये 640 KW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. पहिल्या विमानाचं यशस्वी उड्डाण करण्यात आलं असलं तरी हे विमान प्रत्यक्ष प्रवाशांना घेऊन उड्डाण करण्यास अजून बराच कालावधी लागेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात