जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Tesla ची केव्हा होणार भारतात एंट्री? मोदी सरकारने कंपनीसमोर ठेवल्या नव्या अटी, वाचा काय आहे प्रकरण

Tesla ची केव्हा होणार भारतात एंट्री? मोदी सरकारने कंपनीसमोर ठेवल्या नव्या अटी, वाचा काय आहे प्रकरण

Tesla ची केव्हा होणार भारतात एंट्री? मोदी सरकारने कंपनीसमोर ठेवल्या नव्या अटी, वाचा काय आहे प्रकरण

भारत सरकारनं (Indian Government) टेस्ला समोर काही अटी ठेवल्या असून त्या पूर्ण केल्याशिवाय तिचा भारतीय बाजारपेठेतील (Tesla in Indian Auto Market) प्रवेश कठीण आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: सगळ्या जगासाठी सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी अमेरिकन इलेक्ट्रिक कार टेस्ला (Elecric Car Tesla) गेल्या काही काळापासून सातत्यानं प्रयत्न करत आहे. मात्र उच्च आयात करामुळे (Import Tax) तिचं आगमन लांबत आहे. या पार्श्वभूमीवर टेस्लाच्या आगमनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, भारत सरकारनं (Indian Government) टेस्ला समोर काही अटी ठेवल्या असून त्या पूर्ण केल्याशिवाय तिचा भारतीय बाजारपेठेतील (Tesla in Indian Auto Market) प्रवेश कठीण आहे. टेस्ला आयात कर कपातीसाठी पात्र ठरावी याकरता कंपनीनं 500 दशलक्ष डॉलर्स किंवा 3750 कोटी रुपयांचे स्थानिक ऑटो पार्ट्स खरेदी करण्याची अट केंद्र सरकारनं कंपनीसमोर ठेवली आहे. आता आयात कर सवलतीचा फायदा घेण्यासाठी टेस्लाला भारतीय बनावटीच्या सुट्या भागांची खरेदी सुमारे 10 ते 15 टक्क्यांनी वाढवावी लागेल. थोडक्यात, सरकारने औपचारिकपणे टेस्लाला देशी बनावटीच्या सुट्या भागांचा वापर वाढवण्यास सांगितले आहे. मात्र, याबाबत टेस्लाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, टेस्लाने यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये दावा केला होता की, त्यांनी भारतातून त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुमारे 100 दशलक्ष डॉलर्स किमतीचे सुटे भाग मागवले आहेत. हे वाचा- लहान मुलांना Bike वरुन घेऊन जाता? आता हे नियम न पाळल्यास भरावा लागेल दंड भारतीय वाहन बाजारात प्रवेश करण्याची इच्छा असूनही, आयातीवरील कराच्या उच्च दरामुळे टेस्लाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं कंपनीनं भारतात आधी आपल्या इलेक्ट्रिक कार कम्प्लीटली बिल्ट युनिट (CBU) मॉडेल म्हणून आयात करण्याची योजना आखली आहे. तथापि, उच्च कर दरामुळे, या टेस्ला कारची किंमत खूप जास्त असेल. आयात केलेल्या वाहनांवर भारतात 100 टक्के शुल्क आकारले जाते. तर भारतात असेंब्लिंगसाठी सुटे भाग आयात केल्यास फक्त 15 ते 30 टक्के शुल्क आकारले जाते. टेस्ला आयात केल्यास तिची किंमत प्रचंड वाढणार आहे. भारतीय बाजारपेठेत इतक्या प्रचंड किंमतीला कार विकणे शक्य होणार नाही, त्यामुळे कर कमी करावा अशी या कंपनीची इच्छा आहे. त्यामुळे टेस्ला सरकारकडे कर कमी करण्याची मागणी करत आहे, पण भारत सरकार कर कमी करण्यास तयार नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये, टेस्लाने पंतप्रधान कार्यालयाला (PMO) इलेक्ट्रिक वाहनांवर (EV) आयात कर कमी करण्यास सांगितले होते. टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार बाहेरून आयात करून भारतात विकू इच्छित आहे. टेस्ला आयात कर जास्त असल्याची तक्रार करून कर कमी करण्याची मागणी करत आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. हे वाचा- नवी Two Wheeler घेताय?पॉप्युलर Bikeच्या किमतीत वाढ, किती जास्त पैसे भरावे लागणार दरम्यान, केंद्र सरकारने टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) यांना भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पण मस्क यांना सुरुवातीला त्यांच्या आयात केलेल्या गाड्या भारतात विकायच्या आहेत. त्यासाठी सरकारने वाहन आयातीवरील शुल्क कमी करावे, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र भारत सरकार त्यासाठी तयार नाही. आता सरकारने भारतीय बनावटीच्या भागांचा वापर वाढवण्याची अट ठेवल्यानं कंपनीसमोरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, त्यामुळे आता टेस्लाच्या चाहत्यांना तिच्या आगमनासाठी आणखी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात