मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अत्यंत स्वस्तात मिळत आहे 2021 चा फ्लॅगशिप स्मार्टफोन! मिळणार 8GB पर्यंत RAM

अत्यंत स्वस्तात मिळत आहे 2021 चा फ्लॅगशिप स्मार्टफोन! मिळणार 8GB पर्यंत RAM

शाओमी    (Xiaomi)   कंपनी ही खरंतर स्वस्तात मस्त स्मार्टफोन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यात वर्षाअखेरीस इतर कंपन्यांबरोबरच शाओमीदेखील आपल्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स   (Xiaomi offers)   देत आहे.

शाओमी (Xiaomi) कंपनी ही खरंतर स्वस्तात मस्त स्मार्टफोन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यात वर्षाअखेरीस इतर कंपन्यांबरोबरच शाओमीदेखील आपल्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स (Xiaomi offers) देत आहे.

शाओमी (Xiaomi) कंपनी ही खरंतर स्वस्तात मस्त स्मार्टफोन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यात वर्षाअखेरीस इतर कंपन्यांबरोबरच शाओमीदेखील आपल्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स (Xiaomi offers) देत आहे.

मुंबई, 14 डिसेंबर-   शाओमी    (Xiaomi)   कंपनी ही खरंतर स्वस्तात मस्त स्मार्टफोन्स बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यात वर्षाअखेरीस इतर कंपन्यांबरोबरच शाओमीदेखील आपल्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स   (Xiaomi offers)   देत आहे. त्यामुळे तुम्ही देखील नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आताच चांगली संधी आहे. कारण शाओमीच्या फ्लॅगशिप फोनवर (Xiaomi flagship phones) मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे.

सध्या Mi Flagship Days 2021 सेल सुरू आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कंपनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर ऑफर (Mi 11 lite offers) सुरू आहेत. यातच ग्राहकांना 2021चा सर्वात स्लिम आणि सर्वात हलका फ्लॅगशिप स्मार्टफोन (Most lightweight and slimmest smartphone) अगदी कमी किंमतीत मिळत आहे. Mi 11 lite या स्मार्टफोनची किंमत 21,499 रुपयांपासून सुरू होते आहे. याबाबतची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर (Mi.com) देण्यात आली आहे. यासोबतच एक्सचेंज ऑफर अंतर्गत या फोनवर तब्बल 21,600 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच, Mi Rewards अंतर्गत या फोनवर 500 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळत आहे. याबाबतच्या अटी व शर्तींची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्वस्तात मस्त फीचर्स

एमआय 11 लाईट (Mi 11 lite Features) या फोनमध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 60 आणि 90 Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशिओ मिळतो. तसेच डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनही देण्यात आले आहे. तर याचा टच सॅम्पलिंग रेट 240 Hz एवढा आहे.

या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G हा तगडा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात Adreno 618 GPU आणि 8GB रॅमही देण्यात आली आहे. Mi 11 Lite हा 6GB RAM+128GB इंटर्नल मेमरी, आणि 8GB RAM+128GB इंटर्नल मेमरी अशा दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये बॅक साईडला ट्रिपल लेन्स कॅमेरा (Mi 11 lite camera) देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 64 मेगा पिक्सलचा आहे. यासोबत 5 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्सही देण्यात आली आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तब्बल 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यात 30 Fps फ्रेम रेटने 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.

या फोनला 4,250 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यासोबत 33W फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. फोनमध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला असून, 3.5mm हेडफोन जॅक मात्र उपलब्ध नाही.

या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे, याची जाडी केवळ 6.8 mm आहे. एवढे सगळे फीचर्स असूनही हा फोन अगदीच स्लिम आणि हलका आहे. फोनचे वजन केवळ 157 ग्रॅम आहे. वजन कमी ठेवण्यासाठी या फोनमध्ये मॅग्नेशियम अलॉयचा वापर करण्यात आला आहे. अगदी स्लिम-ट्रिम आणि फ्लॅगशिप असणारा हा फोन सध्या अगदीच कमी किंमतीत उपलब्ध होतो आहे. तेव्हा जर तुम्ही फोन घेण्याच्या विचारात असाल, तर ही एक चांगली संधी आहे.

First published:

Tags: Smart phone, Xiaomi