मुंबई, 16 ऑक्टोबर: भारतासह अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंग बेकायदेशीर आहे. तथापि अजूनही असे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत ज्यावरून कॉल रेकॉर्डिंग कोणालाही नकळत करता येते. नवीन स्मार्टफोन कॉल रेकॉर्डिंग वैशिष्ट्यांसह येतात, परंतु ते परवानगीशिवाय रेकॉर्ड करू शकत नाहीत. तुम्ही कॉल रेकॉर्डिंग सुरू करताच, तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्या व्यक्तीला तुम्ही कॉल रेकॉर्ड करत असल्याची माहिती मिळते. काही थर्ड पार्टी अॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही ते लोकेशन आणि व्हॉइसची परवानगी दिल्याशिवाय वापरू शकत नाही. तुमचाही कॉल रेकॉर्ड होत आहे का? हे जाणून घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा. तुमचा कॉल या पद्धतींनी रेकॉर्ड केला जात आहे का ते शोधा-
- तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी कॉल प्राप्त करताना सतर्क रहा.
- कॉल रिसिव्ह केल्यानंतर जर बीपचा आवाज आला तर समजून घ्या की तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.
- बोलत असताना कोणी स्पीकरवर कॉल ठेवला तर अशा स्थितीत कॉल रेकॉर्ड करता येतो.
- फोनवर बोलत असताना तुम्हाला अनावश्यक आवाज ऐकू आला, जो आवाज एखाद्या व्यक्तीचा नसून मशीनचा आहे, तर तुमचा कॉल रेकॉर्डिंग होऊ शकतो.
- स्मार्टफोन पुन्हा-पुन्हा गरम होत असल्यास, किंवा तो न वापरताही स्क्रीन चालू होत असल्यास, आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
हेही वाचा: दिवाळीनिमित्त कमी पैशात आयफोन खरेदी करायची संधी, ‘या’ मॉडेलवर मिळतीये 17000 रुपयांची सूट
- एखादे अॅप वापरत असताना, स्मार्टफोनच्या वरच्या बाजूला माइक वारंवार दिसला, तर तुम्हाला समजेल की तुमचे रेकॉर्डिंग होत आहे.
- वापरल्यापेक्षा जास्त डेटा खर्च होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण काही थर्ड पार्टी अॅप्स डेटा वापरून तुमचे रेकॉर्डिंग दुसऱ्याला पाठवतात.
- नोटिफिकेशन बंद केल्यानंतरही जर तुम्हाला पॉप-अप दिसला तर अशा परिस्थितीत तुमचे रेकॉर्डिंग केली जाऊ शकते.
- कोणत्याही वेळी समोरचा कॅमेरा अचानक चालू होण्याकडे विनाकारण दुर्लक्ष करू नका.
- स्मार्टफोनला सायलेंट मोडवर ठेवल्यानंतर काही वेळानंतर तो स्वतःच नॉर्मल मोडवर आल्यास काळजी घेणे आवश्यक आहे.
तुमच्या कॉलचं रेकॉर्डिंग होत असल्याचे तुम्हाला लक्षात आलं असेल तर सर्वप्रथम स्मार्टफोनमधून थर्ड पार्टी अॅप्स इन्स्टॉल करा. फोनचा बॅकअप घेतल्यानंतर तो फॅक्टरी डेटावर रीसेट करा. तुमच्या स्मार्टफोनवर थर्ड पार्टी अॅप्स कधीही इन्स्टॉल करू नका. अॅप्स इन्स्टॉल केल्यानंतर परवानगी देताना टर्म आणि कंडिशन काळजीपूर्वक वाचा. स्मार्टफोनमध्ये आवश्यक असलेल्या गोष्टींनाच परवानगी द्या. फोन बंद करायला जास्त वेळ लागत असेल तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका.