Home /News /technology /

आता मोबाईल फोनवर अधिक खर्च कराव लागू शकतो; हे आहे कारण...

आता मोबाईल फोनवर अधिक खर्च कराव लागू शकतो; हे आहे कारण...

येणाऱ्या काही दिवसांत अनेक कारणांमुळे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये प्रति युजर सरासरी महसूल वाढणार आहे. त्यामुळे मोबाईलचा खर्च, मोबाईलचं बिल वाढण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : आता तुमच्या मोबाईलचा खर्च, मोबाईलचं बिल वाढण्याची शक्यता आहे. टेरिफमधील वाढीसह अन्य काही गोष्टींद्वारे टेलिकॉम इंडस्ट्रीच्या (Telecom Industry) सरासरी महसूलमध्ये (ARPU - Average Revenue Per User) वाढ होण्याबाबत, सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. जे एम फायनेंशियलने 'A tale of supremacy, defence and survival' या रिपोर्टमध्ये, टेलिकॉम इंडस्ट्रीतील एकीकरण जवळपास पूर्ण झाल्याचं सांगितलं. परंतु 2024-25 मध्ये वायरलेस इंडस्ट्रीतील महसूल जवळपास 2 पटींनी वाढून साधारणपणे 2,60,000 कोटी रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ARPU अर्थात Average Revenue Per User मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांत अनेक कारणांमुळे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये प्रति युजर सरासरी महसूल वाढणार आहे. वायरलेस इंडस्ट्रीमध्ये काही दिवसांत गुंतवणूकही वाढणार आहे. त्यामुळे Average Revenue Per User मध्ये वाढ होण्याचं बोललं जात आहे. येत्या काळातील मार्केटमधील स्पर्धा पाहता, दर वाढीबाबत अनिश्चितता आहे. मात्र रिपोर्टनुसार, लोकांच्या घरांपर्यंत पोहचण्याचं काम आणि एंटरप्राईज कनेक्टिव्हिटी बिजनेस सध्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. कोरोना काळात डेटाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मार्केटनुसार मागणीच्या आधारे Average Revenue Per User मध्ये वाढीची शक्यता आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Telecom, Telecom companies

    पुढील बातम्या