मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /स्मार्टफोन EMI वर खरेदी करावा की पैसे साठवून? समजून घ्या फरक

स्मार्टफोन EMI वर खरेदी करावा की पैसे साठवून? समजून घ्या फरक

स्मार्टफोन EMI वर खरेदी करावा की पैसे साठवून? समजून घ्या फरक

स्मार्टफोन EMI वर खरेदी करावा की पैसे साठवून? समजून घ्या फरक

काही जण पैसे साठवून रोख रक्कम देऊन फोन खरेदी करतात, तर काही जण एका ठराविक बजेटचा फोन ईएमआयवर घेणं पसंत करतात. ईएमआय व रोख रक्कम देऊन फोन खरेदी करणं, यात फोनच्या किमतीत काही फरक पडतो का किंवा दोनपैकी कोणता पर्याय फायद्याचा आहे, ते जाणून घेऊयात.

पुढे वाचा ...
 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 4 नोव्हेंबर: फोन जुना झाला असेल किंवा व्हर्जन आउटडेटेड झालं असेल तर आपण नवीन फोन घेतो. फोन घ्यायला गेलो की अनेक ब्रँड्स आणि अनेक व्हर्जन असलेले फोन वेगवेगळ्या स्पेसिफिकेशनसह उपलब्ध असतात, त्यामुळे बऱ्याचदा आपला गोंधळ होतो. कारण फोन घेताना आपण त्यासाठी एक बजेट ठरवलेलं असतं. काही जण पैसे साठवून रोख रक्कम देऊन फोन खरेदी करतात, तर काही जण एका ठराविक बजेटचा फोन ईएमआयवर घेणं पसंत करतात. ईएमआय व रोख रक्कम देऊन फोन खरेदी करणं, यात फोनच्या किमतीत काही फरक पडतो का किंवा दोनपैकी कोणता पर्याय फायद्याचा आहे, ते जाणून घेऊयात.

  तुम्हाला 40 हजार रुपयांचा फोन आवडला असेल तर तुम्ही रोख 40 हजार रुपये देऊन तो फोन खरेदी करू शकता. पण ईएमआयवर फोन घेताना असं होत नाही. फोन खरेदी करताना ईएमआयचं गणित काय असतं ते समजून घेऊयात.

  उदाहरणार्थ, तुम्हाला 38,999 रुपयांचा एक फोन आवडला आहे, पण तुमच्याजवळ तेवढी रोख रक्कम नाही. त्यामुळे तुम्ही तो फोन ईएमआयवर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्या फोनसाठी तुम्ही 13 टक्के दराने 3 महिन्यांचा ईएमआय प्लॅन निवडल्यास तुम्हाला दरमहिना 13 हजार 283 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच, फोनसाठी तुम्हाला एकूण 39,849 रुपये मोजावे लागतील. याचा अर्थ तुम्ही त्या फोनसाठी 850 रुपये जास्त देत आहात. आणखी जास्त महिन्यांसाठी ईएमआय घेतल्यास ही रक्कम वाढते. समजा, तुम्ही 15 टक्के दराने 36 महिन्यांच्या ईएमआयचा प्लॅन घेतलाय. तर, त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 1,352 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच, फोनसाठी एकूण 48,472 रुपये भरावे लागतील. म्हणजे 38,999 रुपयांच्या फोनसाठी तुम्हाला तब्बल 9,673 रुपये जास्त खर्च येईल. तसंच ईएमआय केल्याबद्दल बँक प्रोसेसिंग फीही आकारते. त्यामुळे रक्कम आणखी वाढते. अशा रितीने ईएमआयचं गणित असतं.

  हेही वाचा:  देवा! आता Sim Card खरेदीचे नियमही बदलणार? ‘ही’ कागदपत्रे असतील आवश्यक

  ईएमआयमध्ये आणखी एक पर्याय असतो, तो म्हणजे नो-कॉस्ट EMI. हा पर्याय चांगला आहे, यात तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागत नाहीत. पण हा पर्याय सर्वच फोनवर उपलब्ध असेल असं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं तुम्हाला तीन किंवा सहा महिन्यांचे ईएमआय मिळतात. यात फायदा असा असतो की क्रेडिट कार्डावर ईएमआयने फोन घेतला आणि तो नो कॉस्ट ईएमआयमध्ये तर फोनची तीच रक्कम तीन किंवा सहा हप्त्यांत विभागली जाते. त्यामुळे जादा पैसे द्यावे लागत नाहीत. दरमहा हप्ता वगळता उर्वरित रक्कम आपल्याला पुढचे महिने वापरायला उपलब्ध राहते.

  महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या ब्रँडच्या कोणत्याही सीरिजचा नवीन फोन बाजारात आल्यावर आधीच्या सीरिजची किंमत कमी होते. फोनचे व्हॅल्युएशन काळानुसार कमी होत जाते, त्यामुळे ईएमआयवर फोन घेताना आपण त्याचे पैसे पूर्ण भरेपर्यंत कदाचित तो फोन कॅश पेमेंटमध्ये आणखी स्वस्त झालेला असू शकतो. त्यामुळे फोन घेताना रोख रक्कम हा पर्याय कधीही ईएमआयपेक्षा चांगला असू शकतो. अर्थात आम्ही दोन्ही गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या निर्णय तुम्ही घ्यायचाय.

  First published:

  Tags: Smartphones