नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : देशातील आघाडीची बाईक उत्पादक कंपनी रॉयल एनफील्डने (Royal Enfield) आपल्या प्रसिद्ध बाईक क्लासिक 350 चे (Classic 350) नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केले आहे. बाईकच्या या नेक्स्ट जनरेशन मॉडेलमध्ये (Next Generation Model) ग्राहकांना नवीन इंजिनसह पूर्वीपेक्षा अधिक वैशिष्ट्ये देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच याचे नवीन इंजिन आणि काही वैशिष्ट्ये गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Meteor 350 वरून घेण्यात आली आहेत.
नवीन क्लासिक 350 आहे 11 रंगात उपलब्ध
रॉयल एनफील्डने दिलेल्या माहितीनुसार, नवीन क्लासिक 350 मध्ये ग्राहकांना अधिक रंगांचे पर्याय मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा आवडता रंग विविध 11 रंगांमधून निवडू शकाल. इंधन पातळी, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर सारखी महत्त्वाची माहिती प्रदर्शित करण्यासाठी यात एक छोटा डिजिटल क्लस्टर आहे. मात्र, याचे स्पीडोमीटर खूप जागा व्यापते. क्लासिक 350 मध्ये टर्न-बाय-टर्न ट्रिपर नेव्हिगेशन आहे, जे प्रथम Meteor 350 मध्ये वापरण्यात आले होते.
डबल डाउनट्यूब युनिट अधिक स्टेबिलिटी देईल
टर्न-बाय-टर्न ट्रिपर नेव्हिगेशन केवळ क्लासिक 350 क्रोम सीरिजमध्ये उपलब्ध असेल. उर्वरित सीरिजमध्ये हे पर्याय नाहीत. नव्या बाईकचे इंजिन 20PS पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने चेसिसमध्ये मोठी सुधारणा केली आहे. हे दुहेरी डाउनट्यूब युनिट आहे. यामुळे दुचाकीस्वाराला चांगली स्थिरता (स्टेबिलिटी) मिळेल.
हे वाचा - Success Story: कधीकाळी कमवत होता अवघे 10 रुपये, आज आहे तब्बल 730 कोटींच्या कंपनीचा मालक
नेक्स्ट जनरेशन मॉडेलची किंमत किती?
याच्या Redditch सीरिजची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.84 लाख रुपये आहे. त्याचे सर्वात महाग प्रकार क्रोम मॉडेल आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 2.51 लाख रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bullet, Royal enfield 350