नवी दिल्ली, 15 डिसेंबर : रिलायन्स जिओ इंफोकॉमने (Reliance Jio Infocom-RJio) एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडियावर (VI) खोट्या बातम्या पसरवण्याचे आरोप केले आहेत. कंपनीने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (TRAI) कडक कारवाईची मागणी केली आहे. जिओचा असा आरोप आहे की, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियाने शेतकरी आंदोलनादरम्यान अनैतिकरित्या अशा अफवा पसरवल्या की, नव्या कृषी कायद्यामुळे जिओला फायदा होणार आहे.
नंबर पोर्ट रिक्वेस्टमधील वाढीसाठी एयरटेल आणि VI ला जबाबदार ठरवलं -
Jio ने सांगितलं की, या कंपन्या सतत अशा प्रकारच्या खोट्या आणि शुल्लक अफवांना सातत्याने, अप्रत्यक्षरित्या समर्थन देत आहेत की, रिलायन्सला कृषी कायद्याचा फायदा होईल. Jio ने या अफवा कँपेनला, मोठ्या संख्येत नंबर पोर्ट रिक्वेस्टसाठीही जबाबदार ठरवलं आहे.
Jio ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आपला नंबर पोर्ट करण्यावेळी या कँपेनचा संदर्भ देत आहेत. या कारणाशिवाय ग्राहकांनी त्यांना Jio कडून कोणत्याही सर्व्हिस संबंधी समस्या नसल्याचं सांगितल्याचं, जिओने म्हटलं आहे.
TRAI कडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये जिओने सांगितलं की, एयरटेल-VI या फूट पाडणाऱ्या कँपेनला आपल्या कर्मचारी, एजेंट्स, रिटेलर्सद्वारे समर्थन देत आहेत. एयरटेल-VI ग्राहकांना असं सांगतात की, Jio चा नंबर दुसऱ्या कंपनीत पोर्ट करणं म्हणजे शेतकरी आंदोलनाप्रति समर्थन प्रदर्शित करणं आहे.
त्याशिवाय जिओने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांवर शेतकरी आंदोलनाचा वापर करून आपली प्रतिमा डागाळण्याचा आरोपही केला आहे.