मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; 75 रुपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा

Reliance Jio चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; 75 रुपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा

रिलायन्स जिओ (jio) फोनधारकांना कंपनीने 75 रुपयांपासून सुरुवात होणारे अनेक प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. यातील सर्वात कमी किंमत असलेल्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 08 मे : रिलायन्स जिओकडून (Reliance jio) अनेक प्रीपेड प्लॅन्स ग्राहकांना दिले आहेत, जे अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. रिलायन्स जिओ (jio) फोनधारकांना कंपनीने 75 रुपयांपासून सुरुवात होणारे अनेक प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. यातील सर्वात कमी किंमत असलेल्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा देण्यात आला आहे.

या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. यात एकूण 3 जीबी डेटा देण्यात येतो. ग्राहक दररोज 0.1 जीबी म्हणजे 100 एमबी डेटा वापरू शकतो. दिवसाला मिळणारा डेटा संपल्यानंतर डेटा स्पीड कमी होऊन 64 Kbps राहतो.

हे वाचा - Explained: भारतात हवा प्रदूषण 1 टक्क्यांनी वाढल्यास कोरोना मृतांची संख्या 5.7 टक्क्यांवर पोहोचेल

जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर लोकल आणि एसटीडी कॉल्स अनलिमिटेड दिले जातात. तसंच 28 दिवसांत एकूण 50 एसएमएस ग्राहक मोफत पाठवू शकतात. जिओच्या या रिचार्जमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड, या जिओ ॲप्सचे सबस्क्रीप्शनदेखील मोफत वापरता येईल.

याशिवाय जिओफोन ग्राहकांना कंपनी 749 रुपये, 185 रुपये, 155 रुपये, 125 रुपयांचे प्लॅन्सही उपलब्ध करून देत आहे. यातील 749 रुपयांचा पॅक 336 दिवसांसाठी आहे. तर बाकीचे सर्व प्लॅन्स 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळतात.

हे वाचा - Post Office योजनांमध्ये आहे तुमची गुंतवणूक? वाचा या सेवांसाठी किती द्यावे लागेल शुल्क

Jio Phone युजर्ससाठीचा कंपनीने 153 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन अलिकडेच बंद केला आहे. या प्लॅनअंतर्गत युझर्सना 28 दिवसांची वैधता आणि रोज 1.5 जीबी हाय स्पीड डेटा मिळत होता. 153 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनला कंपनीने जुलै 2017 मध्ये लाँच केलं होतं. तसंच फेब्रुवारी 2018 मध्ये या प्लॅनला अपडेट केलं होतं. यासोबत 49 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान कंपनीने आणला होता. जिओ फोन युझर्सला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस फ्री मिळत होते. जिओकडून नुकतीच फ्री कॉलिंग सुरू करण्यात आल्यानंतर काही दिवसांच्या आत हा प्लॅन बंद करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Recharge, Reliance Jio, Relince jio