Home /News /technology /

Realme आता वॉशिंग मशीन क्षेत्रातही धमाका करणार, सॅमसंग LG ला टक्कर

Realme आता वॉशिंग मशीन क्षेत्रातही धमाका करणार, सॅमसंग LG ला टक्कर

रियलमी दिवाळीत लॉन्च करणार वॉशिंग मशीन

रियलमी दिवाळीत लॉन्च करणार वॉशिंग मशीन

रिअलमी (Realme) ही कंपनी प्रामुख्याने स्मार्टफोन, टीव्ही, स्मार्टवॉच आणि हेडफोन उत्पादनांसाठी ओळखली जाते. पण आता रिअलमी टेकलाइफ ब्रॅंडच्या (Techlife Brand) माध्यमातून मजबूत इकोसिस्टिम (Eco System) तयार करणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करणार असून, लवकरच वॉशिंग मशीन या उत्पादनांपैकी एक असणार आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 20 ऑगस्ट : रिअलमी (Realme) ही कंपनी प्रामुख्याने स्मार्टफोन, टीव्ही, स्मार्टवॉच आणि हेडफोन उत्पादनांसाठी ओळखली जाते. या कंपनीची ही उत्पादने अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता ही कंपनी स्मार्टफोनच्या नव्या एडिशन्स आणि लॅपटॉप लॉन्च करणार असून, या माध्यमातून कंपनी कॉम्प्युटर मार्केटमध्ये (Computer Market) प्रवेश करणार हे स्पष्ट झाले आहे. रिअलमीने बुधवारी एका महत्वपूर्ण इव्हेंटमध्ये भारतात GT 5G फ्लॅगशिप फोन, GT मास्टर एडिशन डिझायनर फोन आणि Realme Book स्लिम लॅपटॉप सादर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. लॅपटॉप ही काही श्रेणींपैकी एक असून, या श्रेणीचा रिअलमीला आगामी वर्षात विस्तार करायचा आहे. त्याचप्रमाणे रिअलमी टेकलाइफ ब्रॅंडच्या (Techlife Brand) माध्यमातून मजबूत इकोसिस्टिम (Eco System) तयार करणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करणार असून, लवकरच वॉशिंग मशीन या उत्पादनांपैकी एक असणार आहे. याचाच अर्थ रिअलमी कंपनी लवकरच बाजारात वॉशिंग मशीन (Washing Machine) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिअलमी वॉशिंग मशीनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्सविषयी अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु, रिअलमी इंडिया आणि युरोपचे सीईओ माधव शेठ यांनी बुधवारी आयोजित इव्हेंटमध्ये या नव्या वॉशिंग मशीनविषयीचा आराखडा सादर केला. त्यानुसार ही वॉशिंग मशीन फ्रंटलोड (Front Load) असेल असे दिसून येते. फ्रंट लोड वॉशिंग मशीन्स सहसा प्रीमियम किंमतीत उपलब्ध होतात. परंतु, अन्य बॅण्ड्सला टक्कर देण्यासाठी रिअलमी आपली वॉशिंग मशीन किफायतशीर किमतीसह लॉन्च करणार आहे. रिअलमी प्रत्येक उत्पादनांच्या कॅटेगरी प्रवेश करता यावा, यासाठी एक इकोसिस्टीम तयार करु इच्छिते. रिअलमीने यापूर्वी बियर्ड ट्रिमर, हेअर ड्रायर आणि रोबोटिक व्हॅक्युम क्लिनर सारखी उत्पादने लॉन्च केली आहेत. रोबोटिक व्हॅक्युम क्लिनर दिवाळीपूर्वी बाजारात दाखल होईल. तसेच रिअलमीची दिवाळीपूर्वी अजून दोन उत्पादने लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनी आपल्या भारतातील AIot लाइनचा मोठा खुलासादेखील यादरम्यान करु शकते, असे माधव शेठ यांनी सांगितले. रिअलमी लवकरच टेकलाइफ ब्रॅण्ड अंतर्गत वॉशिंग मशीन आणि अन्य उत्पादने लॉन्च करत आहे. रिअलमीसाठी ही नवी उत्पादन श्रेणी असेल आणि तिची स्पर्धा आता सॅमसंग (Samsung) आणि एलजीसारख्या (LG) ब्रॅण्डशी असेल. रिअलमीची वॉशिंग मशीन दिवाळीत दाखल होईल, असे माधव शेठ यांनी सांगितले, त्यामुळे आता रिअलमीच्या या नव्या उत्पादनाची ग्राहकांना प्रतीक्षा आहे.
First published:

Tags: Realme

पुढील बातम्या