मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Realme ग्राहकांसाठी खुशखबर! 'हा' फोन त्वरित खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Realme ग्राहकांसाठी खुशखबर! 'हा' फोन त्वरित खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Realme C25Y

Realme C25Y

रियलमी (Realme) ग्राहकांसाठी खुशखबर रियलमीचा बजेट फोन म्हणून ओळखला जाणारा Realme C25y हा फोन चांगल्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहे.

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर:  रियलमी (Realme) ग्राहकांसाठी  एकापेक्षा एक दर्जेदार फोन आणत आहे. बजेट फोन्सपासून ( budget phones) प्रीमियम फोन्सपर्यंत ( premium phones) विविध प्रकारचे फोन्स ग्राहकांसाठी कंपनी लाँच करत असते. यामुळेच रियलमी कंपनीचे स्मार्टफोन ( realme smartphone) लोकांना आवडत आहेत. तुम्हीही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रियलमीचा बजेट फोन म्हणून ओळखला जाणारा Realme C25y हा फोन चांगल्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहे.

Realme C25Y ची किंमत भारतात 10,999 रुपयांपासून सुरू होते. त्यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हॅरिएंट मिळतो. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. आजपासून (17 नोव्हेंबर) ते 21 नोव्हेंबरपर्यंत सर्व व्हॅरिएंटवर 1,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या फोनची संपूर्ण स्पेसिफिकेशन्स कशी आहेत, ते जाणून घेऊ या.

Realme C25Y फोनला 6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे. तो 720×1,600 पिक्सेल रिझोल्युशनसह येतो. यात 20:9 आस्पेक्ट रेशो आहे. Realme C25Y मध्ये ऑक्टा-कोर Unisoc T610 प्रोसेसर आहे आणि 4 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आहे. Realme C25Y हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित आहे.

या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. 2 मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. फोनचा बॅक कॅमेरा एआय ब्युटी, एचडीआर मोड, पॅनोरामिक व्ह्यू, पोर्ट्रेट, टाइमलॅप्स, एक्सपर्ट आणि प्रीलोडेड फिल्टरला सपोर्ट करतो.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये f/2.0 अॅपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 128 जीबी पर्यंत स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येतं.

5000mAh बॅटरी

या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की फोनची बॅटरी 48 तासांचा स्टँडबाय टाइम देते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth v5, GPS/ A-GPS, इन्फ्रारेड (IR) ब्लास्टर, मायक्रो यूएसबी आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे.

First published:

Tags: Phone, Phone battery, Smart phone