मुंबई, 5 एप्रिल : ग्राहकांना रिअलमीचा (Realme) स्मार्टफोन (SmartPhone) स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. रिअलमीच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 1 ते 6 एप्रिल दरम्यान कंपनीने प्रीपेड ऑफर देऊ केली आहे. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. किमतीचा विचार केला तर रिअलमी X7 5G हा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी रॉम व्हेरिएंट 19,999 तर 8 जीबी आणि 128 जीबी व्हेरिएंट 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. परंतु, रिअलमीच्या अधिकृत वेबसाईट वरुन मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना प्रीपेडच्या माध्यमातून मोबाईल खरेदीवर एक हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे.
जाणून घेऊया या फोनचे फिचर्स
रिअलमी एक्स 7 या स्मार्टफोनचा 6.4 इंच फूल HD + Super AMOLED डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 180 Hz आणि रेझ्युल्युशन रेट 1080 X 2400 पिक्सल आहे. या डिस्प्लेच्या टॉपला पंच-होल देण्यात आले आहे. तसेच डिस्प्लेला गोरिला ग्लास प्रोटेक्शनदेखील आहे. या फोनच्या डिस्प्लेचा स्क्रिन टू बॉडी रेश्यो 90.8 टक्के आहे. हा स्मार्टफोन Realme UI वर आधारित Android 10 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये Media Tek Dimensity 800 U आॅक्टोकोर CPU 7nm, up to 2.4 GHz प्रोसेसर देण्यात आला आहे. तो Mail0G57 GPU बरोबर जोडण्यात आला आहे.
Realme X7 मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी स्टोरेज देण्यात आले आहे. युझर मायक्रो एसडी कार्ड स्लॉट च्या माध्यमातून 256 जीबीपर्यंत मेमेरी वाढवू शकतात. ग्राहकांसाठी हा फोन स्पेस सिल्व्हर (Speace Silver), न्यूबेला (Nubela) या रंगामध्ये उपलब्ध आहे. कॅमेराचा विचार करता या फोनमध्ये f/1.8 अॅपरेचसह 64 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा, f/2.3 अॅपर्चरसह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड एगल कॅमेरा आणि f/2.4 अॅपर्चरसह 2 मेगापिक्सला मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरादेखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4310 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ती 50 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टीव्हिटीचा विचार करता, या फोनमध्ये डयुअल 5G सिम, वायफाय 802.11 a/b/g/n/ac, ड्युअल बॅण्ड वाय-फाय ब्लूटुथ 5.1, टाइप सी पोर्टसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Realme, Technology