मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

भारतात PUBG वरची बंदी उठणार? नव्या जॉब पोस्टिंगमुळे चर्चेला उधाण

भारतात PUBG वरची बंदी उठणार? नव्या जॉब पोस्टिंगमुळे चर्चेला उधाण

चिनी Apps वरच्या बंदीनंतर आता भारतात PubG वरची बंदी उठणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. निमित्त ठरलं आहे एक जॉब पोस्टिंग.

चिनी Apps वरच्या बंदीनंतर आता भारतात PubG वरची बंदी उठणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. निमित्त ठरलं आहे एक जॉब पोस्टिंग.

चिनी Apps वरच्या बंदीनंतर आता भारतात PubG वरची बंदी उठणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. निमित्त ठरलं आहे एक जॉब पोस्टिंग.

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर :  भारत सरकारनी काही महिन्यांपूर्वी 118 Mobile Apps वर चिनी डेव्हलपर आणि पब्लिशर्सशी संबंध असल्यामुळे बंदी घातली होती. भारत- चीन सीमेवरचा (India-China border tension) तणाव आणि दोन देशांचे ताणलेले संबंध याची पार्श्वभूमी त्या वेळी होती. याचा मोठा फटका PUBG Mobile ला कंपनीला बसला होता. पण आता भारतात PubG वरची बंदी उठणार असल्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. निमित्त ठरलं आहे एक जॉब पोस्टिंग.

PUBG Corp च्या वतीने  LinkedIn या जॉब आणि करिअर साइटवर एक पोस्ट 20 ऑक्टोबरला केली. भारतात कंपनीला असोसिएट लेव्हलचे मॅनेजर हवे असल्याची ती जाहिरात होती. यामुळे PUBG आता भारतात पुन्हा सुरू होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही पब्जी मोबाइलने चीनमधल्या टेन्सेंट गेमिंगबरोबर करार करून त्यांना भारतात पब्लिशर म्हणून काम करण्यास सांगितल्याचं कळाल्यानंतर  गेल्या काही आठवड्यांत पबजी मोबाइल गेम पुन्हा भारतात येणार असल्याच्या अनेक वावड्या उठत होत्या. PUBG Corp च्या नोकरीविषयक पोस्टने त्यात भर पडली.

असं असलं तरी PUBG Corp च्या पोस्टमध्ये PUBG Mobile चा कुठलाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे या पोस्टचा अर्थ PubG गेम पुन्हा खेळता येणार असं म्हणता येणार नाही. गेमच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असली तरी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. डेस्कटॉपवरील पबजी आणि त्याच्या कन्सोलवरून  अजूनही भारतात खेळता येऊ शकतो. तरीही स्मार्टफोनवरील खेळाची लोकप्रियता लक्षात घेता या नोकरभरतीच्या जाहिरातीवरून एवढे अंदाज का बांधले जात आहेत हे लक्षात येत असेलच.

PUBG ने दिलेल्या जॉब पोस्टिंगमध्ये या पदावरचा मॅनेजर सगळ्या मर्जर, अक्विझिशन आणि इन्व्हेसमेंटच्या स्ट्रॅटर्जीसंबंधी काम करणार असून मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली पबजी इंडियाच्या प्रोसेसला मदत करणार आहे. या जाहिरातीवरून लक्षात येतंय की पबजी मोबाइलच्या भारतातील मोठ्या ग्राहकसंख्येवर अजूनही कंपनीचा डोळा असून ते भारत सरकारने दाखवलेल्या त्रुटी सुधारून आपला व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे. लवकरात लवकर भारतात गुगल पे, अपल स्टोअरवर आपला खेळ उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे असंही यावरून दिसतंय.

चीन मोबाइल गेमच्या माध्यमातून भारतातील डेटा गोळा करत असल्याची माहिती कळाल्यानंतर भारताने पबजी मोबाईल गेमवर बंदी घातली होती. चाहते, प्रोफेशनल गेमर्स आणि कंपनीला त्यामुळे धक्का बसला होता कारण जगभरातील एकूण गेमबेसपैकी 25 टक्के भारतात आहे. आतापर्यंत भारताने कोणत्याही अपवरची बंदी उठवलेली नाही.

First published:

Tags: India china, PUBG