मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तब्बल 22.5 कोटी पासवर्ड्स झाले लीक! पाहा तुमचा तर पासवर्ड नाही ना यात?

तब्बल 22.5 कोटी पासवर्ड्स झाले लीक! पाहा तुमचा तर पासवर्ड नाही ना यात?

Passwords

Passwords

ब्रिटनमध्ये नॅशनल क्राइम एजन्सी (NCA) आणि नॅशनल सायबर क्राइम युनिटने (NCCU) केलेल्या एका संयुक्त कारवाईत जगभरातील तब्बल 22.5 कोटी चोरलेले पासवर्ड जप्त करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली, 22 डिसेंबर: ब्रिटनमध्ये नॅशनल क्राइम एजन्सी (NCA) आणि नॅशनल सायबर क्राइम युनिटने (NCCU) केलेल्या एका संयुक्त कारवाईत जगभरातील तब्बल 22.5 कोटी चोरलेले पासवर्ड जप्त करण्यात आले आहेत. एका हॅक करण्यात आलेल्या क्लाउड स्टोरेजमधून हे पासवर्ड मिळवण्यात आले. पोलिसांनी जगभरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पासवर्ड (Police donated stolen passwords) एचआयबीपीच्या डेटाबेसला (HIBP Database) दान केले आहेत. “एनसीएच्या नुकत्याच एका ऑपरेशनमध्ये आम्हाला एका क्लाउड डेटाबेसवर मोठ्या प्रमाणात क्रेडेन्शिअल्स (ईमेल आयडी आणि पासवर्ड) साठवलेले मिळाले आहेत. हे क्रेडेन्शिअल्स लीक झालेले असण्याची शक्यता आहे.” अशी माहिती एनसीएसने दिली.

काय आहे एचआयबीपी

हॅव आय बीन पॉन्ड (Have I Been Pwned) ही एक ऑनलाईन वेबसाईट आहे, जिथे तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा इमेल आयडी लीक झाला आहे का हे मोफत तपासू (Check if my password is leaked) शकता. याठिकाणी आधीपासूनच तब्बल 61.3 कोटी चोरलेले पासवर्ड (Stolen passwords) नोंद करण्यात आले असून, आता त्यात 22.5 पासवर्ड्सची भर पडली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने चोरलेल्या पासवर्डचा डेटाबेस (Stolen credentials) सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे एचआयबीपीने सांगितले. लीक झालेले पासवर्ड हे सायबर क्राइम करणाऱ्यांसाठी बरेच फायद्याचे असतात. या पासवर्ड्सचा वापर करून ते अगदी बँकिंग व्यवहारही करू शकतात. तसेच, ते आपल्या एका पासवर्डवरून आपले बाकी पासवर्ड काय असू शकतील याचाही अंदाज लावू शकतात. एचआयबीपी वेबसाईटवर (HIBP website) तुम्ही तुमच्या इमेल वा फोन नंबरशी संबंधित पासवर्ड लीक झाले आहेत का हे पाहू शकता, आणि तिथे तुमचा पासवर्ड दिसल्यास तो तातडीने बदलू शकता. यासाठी तुम्हाला https://haveibeenpwned.com/ या वेबसाईटवर जावं लागेल. याठिकाणी तुमचा इमेल आयडी टाकून, ‘pwned?’ या बटणावर क्लिक करायचं आहे. जर तुमचा इमेल आयडी लीक झालेला असेल, तर ही वेबसाईट तुम्हाला त्याबाबत इशारा देईल. तुमचा फोन नंबर आणि पासवर्डही तुम्ही अशाच प्रकारे तपासू शकता. जर तुमचा पासवर्ड लीक झाल्याचे तुम्हाला या वेबसाईटवर समजले, तर तातडीने तुम्ही आपला पासवर्ड बदलणे गरजेचे आहे. नवा पासवर्ड हा पहिल्यापेक्षा अगदी वेगळा आणि अधिक अवघड असा असावा. अर्थात, तुमचा पासवर्ड लीक झाला आहे याचा अर्थ तुमचे अकाउंट हॅक झालेच आहे असा नाही. तुमचा पासवर्ड या वेबसाईटवर आहे, म्हणजेच तो सायबर क्रिमिनल्सच्या डेटाबेसवरही आहे, आणि आज नाही तर उद्या तो हॅक होऊ शकतो. याठिकाणी तुमचा इमेल आयडी किंवा पासवर्ड आढळल्यास, तो आयडी पुन्हा कधीही बँकिंग व्यवहारांसाठी न वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
First published:

Tags: Password

पुढील बातम्या