मुंबई : भारतात आता 5G सेवा ग्राहकांना लवकरच मिळणार आहे. जिओ आणि एअरटेल कंपन्यांनी ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १३ शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता चर्चा आहे ती 6G ची, कारण त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं विधान केलं आहे. भारत 6G लाँच करण्यासाठी तयारी करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते एका व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान 6G वर बोलत होते. गेमिंग आणि मनोरंजनासाठी इंडियन सोल्युशनला प्रोत्साहन देत आहोत. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की 5G सेवा ही स्वस्त आणि सुलभ उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे.
Jio पूर्वी Airtel 5G सेवा लाँच करणार? महाराष्ट्रातील या शहरांमध्ये सर्वप्रथम मिळणार सुविधा
Addressing the Grand Finale of Smart India Hackathon 2022. It offers a glimpse of India's Yuva Shakti. https://t.co/7TcixPgoqD
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2022
आता जिओ आणि एअरटेल कंपन्या 5G चे दर कसे ठरवतात आणि सेवा ग्राहकांना कधी देतात याकडे लक्ष आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत प्रमुख १३ शहरांमध्ये ही सेवा सुरू होईल असा अंदाज आहे. त्यानंतर 6G सेवा देखील सुरू करण्याचे प्रयत्न सरकारचे आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारतात २०३० पर्यंत ग्राहकांना 6G सेवेसाठी प्रतिक्षा करावी लागू शकते. २०३० पर्यंत भारतात ही सेवा आणण्यावर भर दिला जाणार आहे. त्या दृष्टीनं भारताची तयारी सुरू आहे.