मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /खूशखबर! भारतात सोनी प्लेस्टेशन-5 लवकरच उपलब्ध; प्री-ऑर्डर उद्यापासून सुरू

खूशखबर! भारतात सोनी प्लेस्टेशन-5 लवकरच उपलब्ध; प्री-ऑर्डर उद्यापासून सुरू

भारतात गेल्या वर्षी पहिल्यांदा ऑक्टोबरमध्ये हे प्ले स्टेशन 5  (Sony Play Station) सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ते वितरित करण्यात आलं. या प्ले स्टेशन 5ला इतका प्रतिसाद मिळाला की, अल्पावधीतच त्याचा साठा संपून गेला. आता आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे प्ले स्टेशन 5 भारतात दाखल होणार असून, त्याची अत्यंत आतुरतेनं वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. उद्यापासून (5 ऑक्टोबर) सोनीच्या प्ले स्टेशन 5 ची नोंदणी सुरू होत आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 04 ऑक्टोबर : आजच्या पिढीत अॅनिमेशन गेम्स (Animation Games) प्रचंड लोकप्रिय आहेत. लहान आणि तरुण मुलांमध्ये हे गेम्स प्रसिद्ध असून, त्यासाठी प्लेस्टेशन (Play Station) हे साधन सर्वांच्या पहिल्या पसंतीचं आहे. खेळणाऱ्याला स्वतःच तो गेम प्रत्यक्ष खेळत असल्याचा अनुभव देणारे सोनी कंपनीच्या प्लेस्टेशनचे (Sony Play Station) जगभरात असंख्य चाहते आहेत. दरम्यान, आता आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे प्ले स्टेशन 5 भारतात दाखल होणार असून, त्याची अत्यंत आतुरतेनं वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. उद्यापासून (5 ऑक्टोबर) सोनीच्या प्ले स्टेशन 5 ची (PlayStation 5 India Restock Today)नोंदणी सुरू होत आहे.

    'बीजीआर डॉट इन'नं दिलेल्या वृत्तानुसार, स्टँडर्ड (Standard) आणि डिजिटल (Digital) अशा दोन प्रकारांत दाखल करण्यात आलेल्या प्ले स्टेशन 5ला भारतीय बाजारपेठेत इतका प्रतिसाद मिळाला, की तेव्हा उपलब्ध असणारा साठा अपुरा पडला. मागणीच्या प्रमाणात माल उपलब्ध नसल्यानं अॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आदी ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक रिटेल विक्रेत्यांना (Retailers) घेतलेल्या ऑर्डर्स रद्द कराव्या लागल्या. आता आठव्यांदा याची पूर्वनोंदणी (Pre Order) करण्यात येत असून, प्ले स्टेशन 5च्या डिजिटल प्रकाराचा तर पाचव्यांदा नव्यानं साठा उपलब्ध करण्यात येत आहे.

    याबाबत सोनी सेंटरच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार,12 ऑक्टोबर रोजी याचं वितरण सुरू होणार असून, अॅमेझॉन, शॉप अॅट एससी, क्रोमा, फ्लिपकार्ट, गेम लूट, गेम्स द शॉप, प्रीपेड गेमर कार्ड, रिलायन्स डिजिटल, सोनी सेंटर आणि विजय सेल्समध्ये हे प्लेस्टेशन उपलब्ध होणार आहे. इथे या प्लेस्टेशनची ऑनलाइन ऑर्डरही नोंदवता येणार आहे. प्लेस्टेशन-5च्या स्टँडर्ड प्रकाराची किंमत 49 हजार 990 रुपये इतकी, तर डिजिटल प्रकाराची किंमत 39 हजार 990 रुपये इतकी आहे.

    अत्यंत महाग असूनही या गेमिंग कन्सोलला (Gaming Console) भारतीय बाजारपेठेत चांगली मागणी असते. आजच्या आधुनिक पिढीमध्ये हा गेमिंगचा अत्याधुनिक आविष्कार अत्यंत लोकप्रिय आहे. लहान मुलं, तरुणाई अत्यंत आवडीनं हा गेम खेळते. कोरोना संकटाच्या काळात मुलांना घरातच बसून राहावं लागत असल्यानं वेळ घालवण्यासाठी हे उत्तम साधन ठरल्यानं त्याच्या मागणीला चालना मिळाली आहे. आता सणासुदीच्या काळात याची मागणी आणखी वाढेल असा कंपनीला विश्वास आहे.

    First published:
    top videos

      Tags: Games