मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

OnePlus कडून बाजारात दमदार Earphone एकदा चार्ज केल्यावर चालतील तब्बल 38 तास!

OnePlus कडून बाजारात दमदार Earphone एकदा चार्ज केल्यावर चालतील तब्बल 38 तास!

तुम्ही चांगल्या इअरफोनच्या शोधात असेल तर वन प्लस (Oneplus) या कंपनीने जबरदस्त इअरफोन आणले आहेत. हे एकदा चार्ज केल्यावर तब्बल 38 तास चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

तुम्ही चांगल्या इअरफोनच्या शोधात असेल तर वन प्लस (Oneplus) या कंपनीने जबरदस्त इअरफोन आणले आहेत. हे एकदा चार्ज केल्यावर तब्बल 38 तास चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

तुम्ही चांगल्या इअरफोनच्या शोधात असेल तर वन प्लस (Oneplus) या कंपनीने जबरदस्त इअरफोन आणले आहेत. हे एकदा चार्ज केल्यावर तब्बल 38 तास चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

मुंबई, 18 डिसेंबर : सध्या मोबाइल स्मार्टफोनच्या (Smartphone) बाजारपेठेत मोबाईलशी निगडीत अनेक साधनांचीही चलती आहे. यामध्ये इअरफोन (Earphone), हेडफोन (HeadPhone), इअर बड्स (Earbuds), पॉडस आदींचा समावेश आहे. आजकाल स्मार्टफोनवरून गाणी, व्हिडिओ, ओटीटी कंटेंट असा विविध प्रकारचा कंटेंट बघितला, ऐकला जातो. त्यामुळे खूप काळ इअर फोन वापरले जातात. तसेच कॉल्स घेणे, बोलणे यासाठीदेखील इअरफोन वापरणे अधिक सोयीचे असते. तासतासभर कानात घालून ठेवावे लागणारे इअरफोन्स अधिक आरामदायी आणि आकर्षक असावे अशी अपेक्षा वाढत असल्याने कंपन्यांनी उच्च दर्जाचे आणि वापरण्यास आरामदायी डिझाइन असलेले इअरफोन्स आणण्यावर भर दिला आहे. स्मार्टफोनच्या बाजारपेठेत आघाडीवर असणाऱ्या वन प्लस (One plus) या लोकप्रिय कंपनीने नुकतेच अतिशय आधुनिक असे TWS OnePlus BudsZ2 हे इअरफोन दाखल केले आहेत.

हा इअरफोन कंपनीच्या BudsZची पुढची आवृत्ती आहे. याची किंमत अतिशय किफायतशीर असून यात व्हॉईस कॅन्सलेशनचीही सुविधा आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे याची बॅटरी मोठी असून, एकदा चार्ज केल्यावर ती तब्बल 38 तास चालते. पर्ल व्हाइट आणि ऑब्सिडीन ब्लॅक या रंगामध्ये हे इअरफोन्स सादर करण्यात आले आहेत.

Google Chrome ची Online Shoppingसाठी मदत; सर्वात आधी देणार स्वस्त वस्तूची माहिती

वन प्लसचे हे इअर फोन्स 20 डिसेंबर 21पासून ब्रिटन (UK)आणि युरोपमध्ये (Europe) विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असून, अमेरिकेत सुरुवातीला फक्त पर्ल व्हाइट रंगाचे इअर फोन उपलब्ध करण्यात आले असून ब्लॅक कलरचा पर्याय पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे इअरफोन्स 99 डॉलर्स म्हणजे सुमारे 7,600 रुपये किमतीत उपलब्ध आहेत.

मात्र, भारतात हे इअरफोन कधी दाखल होणार याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. चीनमध्ये OnePlus Buds Z2 या वर्षी ऑक्टोबरमध्ये OnePlus 9RT सोबत दाखल करण्यात आला होता. यामध्ये 11 मिमीचे डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले असून ते 40 डेसिबलपर्यंत आवाज रद्द करण्यास सक्षम आहेत. यामध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देण्यात आल्यानं संगीत अधिक चांगले ऐकता येतं. विशेष बाब म्हणजे या उपकरणात पारदर्शकता अर्थात ट्रान्सपरन्सी मोडमुळे संगीत आणि कॉल दरम्यान अॅम्बियंट साउंड सहज ऐकू येईल.

Samsung चा 1 लाखाचा फोन 7,417 रुपयांत घरी आणा, Flipkart ची जबरदस्त ऑफर

OnePlus Buds Z2 मध्ये चांगली मोठी बॅटरी (Battery) देण्यात आली असून, एका चार्जिंगमध्ये ती 38 तास चार्जिंग केससह वापरली जाऊ शकते. असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10 मिनिटांच्या चार्जवर 5 तास संगीत ऐकता येते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ 5.2 व्हर्जन असून, संगीत, चित्रपट आणि मोबाइल गेमिंग मोड आहेत. याला IP55 रेटिंग मिळाले आहे.

First published:

Tags: Ear, Mobile, Oneplus