जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Whatsapp वरील वाचलेल्या मेसेजलाही करता येणार Unread मार्क; सेंटिग्जमध्ये करा थोडेसे बदल

Whatsapp वरील वाचलेल्या मेसेजलाही करता येणार Unread मार्क; सेंटिग्जमध्ये करा थोडेसे बदल

आता फ्रॉड करणारे, WhtahsApp हॅकिंग OTP द्वारे करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या अनोळखी नंबरवरून मेसेज येतो आणि तो अतिशय इमरजेन्सी असल्याचं सांगितलं जातं.

आता फ्रॉड करणारे, WhtahsApp हॅकिंग OTP द्वारे करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या अनोळखी नंबरवरून मेसेज येतो आणि तो अतिशय इमरजेन्सी असल्याचं सांगितलं जातं.

नव्या वर्षात Whatsapp आपल्या युझर्ससाठी काही भन्नाट फिचर्स आणली आहेत. ही फिचर्स समजायला अतिशय सोपी पण गरजेची आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 जानेवारी: अनेक सुविधा आणि वैशिष्टपूर्ण फिचर्समुळे व्हॉट्सॲप (WhatsApp) हे युझर्सचं आवडीचं सोशल मीडिया हँडल आहे.  त्यातही तरुणाईचा व्हॉट्सॲप वापराकडे कल अधिक असतो. व्हॉट्सॲपने असेच एक महत्वपूर्ण फिचर आणले आहे. या फिचरमध्ये व्हॉट्सॲपवरील प्रोफाईल पिक्चर्स आता कॉटॅक्टमधील (Contact) व्यक्ती, युझर्सला (Users) स्क्रीनशॉटद्वारे (Screem Shots) सेव्ह (Save) करता येणार आहे. गतवर्षात व्हॉट्सॲपने युझर्ससाठी अनेक फिचर्स आणली. त्यामध्ये म्युट (Mute), मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फिचर, व्हॉट्सॲप पेमेंट आणि कार्टस फॉर व्हॉट्सॲप बिझनेस आदींचा समावेश होता. प्रामुख्याने मेसेजेससाठी प्राधान्याने वापरण्यात येणाऱ्या या अॅपमध्ये प्रायव्हसी फिचर्सअंतर्गत ब्लॅाक कॉटॅक्टसारखे (Block Contacts) ही फिचर्स देण्यात आले आहे. तसेच संपर्कातील व्यक्तींना आपले प्रोफाइल पिक्चर (Profile Picture) पाहता येऊ नये, यासाठी हाईड पिक्चरसारखे (Hide Picture) फिचर (Featrue) देखील व्हॉट्सॲपने युझर्सकरिता दिले आहे. त्यातच आता प्रोफाईल पिक्चर्स कॉटॅक्टमधील व्यक्ती किंवा युझर्स स्क्रीनशॉटद्वारे सेव्ह करु शकतात. तसेच व्हॉट्सॲपने युझर्ससाठी कॉटॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तींना प्रोफाइल पिक्चर पाहता येऊ नये यासाठी हाईड प्रोफाईल पिक्चर हा पर्याय दिला आहे. तसेच कॉटॅक्टमधील कोणत्याही व्यक्तीला प्रोफाईल पिक्चर पाहता येऊ नये यासाठीची सुविधा देखील व्हॉट्सॲपने दिली आहे. प्रोफाईल पिक्चर असे हाईड (Hide) करा व्हॉट्सॲप सुरु करा. त्यानंतर सेंटिग- अकाऊंटमधून प्रायव्हसी या पर्यायवर जा प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा त्यामध्ये एव्हरीवन असा उल्लेख असलेली डिफॉल्ट सेटिंग दिसेल जर आपले प्रोफाईल पिक्चर कॉटॅक्टमधील व्यक्तींना पाहता यावे, असे वाटत असेल तर माय कॉटॅक्ट हा पर्याय निवडा जर कोणत्याही व्यक्तीने आपले प्रोफाईल पिक्चर पाहू नये असे वाटत असेल तर नोबडी (Nobody) हा पर्याय निवडावा. प्रोफाईल पिक्चर हाईड (Hide) हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप प्रोफाईल पिक्चरचा जागी राखाडी रंगाचा स्क्रिन येईल. केवळ काही कॉटॅक्टपासून आपले प्रोफाईल पिक्चर लपवण्याचा किंवा हाईड करण्याचा पर्याय मात्र व्हॉट्सॲपमध्ये उपलब्ध नाही. तथापि, ज्या व्यक्तींना आपले प्रोफाईल पिक्चर दिसू नये असे युझर्सला वाटते, त्यांचे क्रमांक युझर्स डिलीट करु शकतात आणि त्यानंतर ओन्ली माय कॅान्टॅक्ट असा पर्याय निवडू शकतात.  व्हॉट्सॲप युझर्स करु शकतात अनरिड मार्क अनेकदा युझर्स व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज वाचतात परंतु त्याला उत्तर द्यायचे विसरुन जातात. अशा स्थितीत स्मरणात राहण्यासाठी युझर्स न वाचलेल्या चॅटला मार्क करु शकणार आहेत. या चॅटला उत्तर देऊ शकतील. अँड्रॉइडवर चॅट अनरिड करण्यासाठी युझर्स चॅटवर प्रेस आणि होल्ड करुन अनरिड हा पर्याय निवडू शकणार आहेत तर आयफोन युझर्स चॅटला उजवीकडे स्वाईप करुन अनरिड आयकॉनवर टॅप करुन अनरिड मार्क करु शकणार आहेत. तसेच व्हॉट्सॲप युझर्स चॅट ओपन न करता देखील मेसेज वाचू आणि पाठवू शकणार आहेत. यासाठी युझर्सला तोंडी मेसेज दयावा लागेल किंवा सिरी आणि गुगल असिस्टंटच्या मदतीने मेसेज वाचवा लागेल. व्हॉट्सॲपवर मेसेज आल्यावर युझर्स स्क्रिनवरच मेसेज वाचून उत्तर देऊ शकणार आहेत. व्हॉट्सॲपवर कॉल करताना डेटाचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी देखील सुविधा देण्यात आली आहे. यासाठी काय करावे लागेल? सेटिंगवर जाऊन डाटा अँड स्टोरेज हा पर्याय निवडावा त्यानंतर कॉल सेटिंगमधील लो डेटा युज हा पर्याय निवडावा चॅटसाठी किती स्टोरेज वापरले गेले आहे याची माहिती देखील युझर्सला मिळू शकणार आहे. व्हॉट्सॲपने यासाठी काही पर्याय दिले असून त्याद्वारे युझर्स काँटॅक्ट आणि वापरलेले स्टोरेज याची माहिती घेऊ शकतील. यासाठी व्हॉट्सॲप या पर्यायावर जावे. त्यातील स्टोरेज अँड डेटा युझेस यातील स्टोरेज युझेस हा पर्याय निवडावा. व्हॉट्सॲपमधील अशी आहेत वैशिष्टे व्हॉट्सॲप युझर्स जे आपल्या कॉटॅक्ट लिस्टमध्ये नाहीत किंवा कॉटॅक्टमधील सर्व व्यक्तींपासून आपले प्रोफाईल पिक्चर हाईड (Hide) करू शकतात. युझर्स लिस्टमधील कॉन्टॅक्ट म्यूट किंवा ब्लॉक करु शकतात. युझर्स न वाचलेल्या चॅट मार्क करु शकतात आणि त्यांना मेसेज ओपन करता रिप्लाय देऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात