मुंबई, 29 मार्च : ऑनलाईन स्पेसमधील महिलांच्या छेडछाडीविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी नेटवर्क 18 (Network18) आणि ट्रुकॉलर या कंपनीनं (Truecaller) महिला दिनानिमित्त (Women’s Day) 'इट्सनॉटओके' कँपेन (Campaign) राबवलं होतं. या यशस्वी कँपेननंतर या दोन्ही कंपन्या आता पुन्हा एकदा महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्र आल्या आहेत. नेटवर्क 18 आणि ट्रूकॉलरच्या वतीनं नवी दिल्ली येथे आज (29 मार्च 22) ‘द कॉल इट आउट कॉनक्लेव्ह’ (The Call It Out Conclave) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलमध्ये (Oberoi Hotel) हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सध्याच्या डिजिटल जगातील ऑनलाइन सेफ्टी (Online Safety) आणि सेफ्टीशी संबंधित इतर समस्यांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. ऑनलाईन सेफ्टीमध्येही विशेषत: महिलांसाठी (Women) ऑनलाईन स्पेस अधिक सुरक्षित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येतील, ऑनलाईन हरॅसमेंट (Online Harassment) झाल्यास महिलांना कुठे तक्रार नोंदवता येईल, याबाबत या कार्यक्रमामध्ये चर्चा केली जाणार आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar), बॉलिवूड स्टार रवीना टंडन (Raveena Tandon), दिल्लीच्या विशेष पोलीस आयुक्त शालिनीसिंग आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तसंच, केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचे राज्यमंत्री देवुसिंह चौहान (Devusinh Chauhan) आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Rakesh Asthana) हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
सायबर सुरक्षेबाबत जागरुकता (Cyber Security Awareness) निर्माण करणाऱ्या टिप्स देऊन श्रोत्यांचं प्रबोधन करण्यासोबतच, हे वक्ते सायबर कायद्यांबद्दल (महिलांच्या छळवणुकीसंबंधी) आणि छळाच्या प्रकरणांची तक्रार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबद्दलही बोलणार आहेत. याशिवाय महिला सुरक्षेसंदर्भात भविष्यातील आव्हानांबद्दलही या ठिकाणी चर्चा होणार आहे.
सीएनबीसी-टीव्ही 18च्या (CNBC-TV18) मॅनेजिंग एडिटर शिरीन भान (Shereen Bhan) आणि ट्रूकॉलरच्या सह-संस्थापक व सीईओ अॅलन मामेडी (Alan Mamedi) यांचं एक चर्चासत्रदेखील आयोजित करण्यात आलेलं आहे. या चर्चासत्रात दोन्ही कंपन्यांनी कोणत्या कारणांमुळे ही विशेष मोहीम सुरू केली, महिलांसाठी सेफ ऑनलाईन स्पेस निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजातील संबंधित सर्व घटकांना कसं एकत्र केलं, याबाबत उपस्थितांना ऐकायला मिळेल. यासोबतच, स्वीडनचे राजदूत क्लास मोलिन (Ambassador Klas Molin) आणि ट्रु कॉलरच्या संचालक मंडळाच्या सदस्या अॅन्निका पॉउटीयानेन (Annika Poutiainen) हे आपले अनुभव मांडणार असल्याने या संवादात्मक कार्यक्रमातून प्रेक्षकांना जागतिक स्तरावरील घटनांचा कोनासाही घेता येईल.
राजकीय कार्यकर्त्या आणि आपच्या आमदार आतिशी(MLA Atishi), डिझायनर आणि राजकारणी शायना एनसी (Shaina NC), सामाजिक कार्यकर्त्या आणि सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या संचालिका डॉ. रंजना कुमारी, वकील पुनीत भसीन, दिल्ली पोलीस दलातील डीसीपी (IFSO) केपीएस मल्होत्रा, डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशनचे संस्थापक व संचालक ओसामा मंझर हे मान्यवरदेखील 'द कॉल इट आऊट कॉन्क्लेव्ह' कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम आज संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल. CNN- News18, CNBC-TV18 साइट, युट्युब, फेसबुक, आणि ट्विटरसह सोशल मीडिया चॅनेलवर या कार्यक्रमाचं लाईव्ह-स्ट्रिमिंग होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Truecaller, Women safety