मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

इंटरनेटशिवायही पाहता येणार चित्रपट आणि OTT कंटेंट, अजिबात VIDEO नाही थांबणार!

इंटरनेटशिवायही पाहता येणार चित्रपट आणि OTT कंटेंट, अजिबात VIDEO नाही थांबणार!

 आता या सर्व गोष्टी इंटरनेट (Internet) कनेक्शनशिवायही पाहता येणार आहेत. यासाठी D2M अर्थात डायरेक्ट टू मोबाइल ब्रॉडकास्टिंग टेक्नोलॉजीचा

आता या सर्व गोष्टी इंटरनेट (Internet) कनेक्शनशिवायही पाहता येणार आहेत. यासाठी D2M अर्थात डायरेक्ट टू मोबाइल ब्रॉडकास्टिंग टेक्नोलॉजीचा

आता या सर्व गोष्टी इंटरनेट (Internet) कनेक्शनशिवायही पाहता येणार आहेत. यासाठी D2M अर्थात डायरेक्ट टू मोबाइल ब्रॉडकास्टिंग टेक्नोलॉजीचा

मुंबई, 07 जून : अलीकडच्या काळात सर्वच गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्या आहेत. मनोरंजनदेखील त्याला अपवाद नाही. आता क्रिकेटच्या मॅचेस, रिअ‍ॅलिटी शोज, सीरियल्सचे एपिसोड किंवा अगदी चित्रपट अशा सर्व गोष्टी इंटरनेटच्या साह्याने मोबाइलच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) केव्हाही आणि कुठेही पाहता येतात. आता या सर्व गोष्टी इंटरनेट (Internet) कनेक्शनशिवायही पाहता येणार आहेत. यासाठी D2M अर्थात डायरेक्ट टू मोबाइल ब्रॉडकास्टिंग टेक्नोलॉजीचा (Direct To Mobile Broadcasting Technology) वापर केला जाणार आहे. या नवीन तंत्रज्ञानावर सध्या काम सुरू आहे. क्रिकेटचा लाइव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी किंवा सर्व प्रकारचा मल्टीमीडिया कंटेंट अ‍ॅक्सेस (Access) करण्यासाठी आता इंटरनेटची गरज पडणार नाही. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) आणि प्रसार भारती एकत्रितपणे डीटूएम ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या तपासणीसाठी टेलिकम्युनिकेशन विभागाने आयआयटी-कानपूर या संस्थेसह (IIT Kanpur) भागीदारी केली होती. त्यात यश मिळालं, तर लवकरच युझर्सना इंटरनेटशिवाय मल्टीमीडिया कंटेंटचा (Multimedia Content) आनंद घेता येणार आहे, याबद्दलचे वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे. आता डीटूएम ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुमच्या मोबाइलवर थेट मल्टिमीडिया कंटेंट प्रसारित होईल. ज्याप्रमाणे एफएम (FM) ऐकण्यासाठी कोणत्याही वायर्ड कनेक्शनची गरज भासत नाही, अगदी त्याचप्रमाणे हा कंटेंट तुमच्या मोबाइलवर दिसू शकेल. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुम्हाला क्रिकेटची मॅच लाइव्ह पाहता येईल. तसंच ताज्या बातम्यादेखील जाणून घेता येतील. `इंडियन एक्सप्रेस`च्या वृत्तानुसार, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युझर्स त्यांच्या मोबाइलवर इंटरनेटशिवाय ओटीटी कंटेंटही पाहू शकतील. डीटूएम ब्रॉडकास्टींग टेक्नोलॉजी ब्रॉडबॅंड (Broadband) आणि ब्रॉडकास्ट एकत्र करून विकसित करण्यात येत आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या डायरेक्ट-टू-मोबाइल आणि 5G ब्रॉडबँड कन्व्हर्जन्स रोड मॅप फॉर इंडिया कार्यक्रमात या तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितलं, की, 'डायरेक्ट- टू-मोबाइल आणि 5G ब्रॉडबॅंडमुळे देशातल्या ब्रॉडबॅंड आणि स्पेक्ट्रमच्या वापरात सुधारणा होईल.' सध्याच्या काळात इंटरनेट कनेक्शन संथ असेल, तर व्हिडिओच्या व्हिज्युअल गुणवत्तेत (Visual Quality) फरक पडतो, बफरिंग न झाल्यामुळे कंटेंट थांबतो. नव्या ब्रॉडकास्ट तंत्रामुळे या समस्या दूर होणार आहेत. कारण यात इंटरनेटचा वापर केला जाणार नाही. तसंच या तंत्रज्ञानामुळे युझर्सपर्यंत पोहोचणारी फेक अर्थात खोटी माहिती रोखणं शक्य होणार आहे. देशात एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी इंटरनेट अडथळा ठरणार नाही. प्रत्येक माहिती युझर्सपर्यंत थेट पोहोचेल. ज्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही किंवा इंटरनेट संथ आहे, अशा भागातल्या नागरिकांसाठी हे तंत्रज्ञान खूप फायदेशीर ठरणार आहे. नियोजनानुसार सर्व गोष्टी घडत गेल्या, तर डीटूएम ब्रॉडकास्टिंग टेक्नॉलॉजी देशातला एक मोठा गेमचेंजर ठरू शकते. यामुळे युझर्स, तसंच टेलिकॉम कंपन्यांना थेट फायदा होईल. ते या तंत्रज्ञानाच्या मदतीनं व्हिडिओ ट्रॅफिक मोबाइल नेटवर्कवरून ब्रॉडकास्ट नेटवर्कवर ऑफलोड करू शकतील.
First published:

पुढील बातम्या