मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सावधान! तुमचाही पासवर्ड होऊ शकतो सहजासहजी हॅक, जाणून घ्या त्या मागील कारण

सावधान! तुमचाही पासवर्ड होऊ शकतो सहजासहजी हॅक, जाणून घ्या त्या मागील कारण

password hack

password hack

हॅकिंगच्या वाढत्या धोक्यामुळे इंटरनेट बॅकिंगचा, सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड अवघड म्हणजे सहज हॅक न करता येईल असा ठेवा, असा सल्ला अनेकदा दिला जातो.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 16 नोव्हेंबर :हॅकिंगच्या वाढत्या धोक्यामुळे इंटरनेट बॅकिंगचा, सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड अवघड म्हणजे सहज हॅक न करता येईल असा ठेवा, असा सल्ला अनेकदा दिला जातो. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एका रिपोर्टनुसार बहुतांश भारतीय युजर्स असा पासवर्ड वापरतात जो सहजासहजी हॅक करता येतो. यामध्ये ‘password’, ‘password@123’, ‘password123′, ‘password@1’ आणि ‘password1’ अशा शब्दांचाही पासवर्ड म्हणून वापर केला जातोय.

  नॉर्ड सिक्युरिटीचा पासवर्ड मॅनेजर विभाग नॉर्डपास (NordPass) ने 2022 च्या सर्वात सामान्य पासवर्डचा अहवाल शेअर केला आहे. 2022 मध्ये जागतिक स्तरावर पासवर्ड ठेवताना युजर्सकडून ‘Password’ या शब्दाचा उपयोग 49 लाख वेळा आणि भारतात 34 लाख वेळा करण्यात आला आहे, असे या अहवालात म्हटलं आहे.

  तर, भारतातील दुसरा सर्वाधिक पसंतीचा पासवर्ड '123456' हा होता, जो 1,66,757 वेळा वापरला गेला होता. याशिवाय ‘BigBasket’ हा चौथा सर्वाधिक वापरला गेलेला पासवर्ड असून तो 75,081 वेळा वापरला गेला होता. अहवालानुसार, भारतात सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या काही पासवर्डमध्ये 'qwerty', 'anmol123' आणि 'googledummy' यांचा समावेश आहे. अनेक युजर्स त्यांच्या पासवर्डमध्ये देशाचे नाव ठेवण्यास प्राधान्य देतात. यामध्ये 'India123' आणि 'India@123' अशा पासवर्डलाही अनेकांची पसंती होती.

  हेही वाचा - WhatsApp पाठोपाठ Facebook ला मोठा धक्का, इंडिया हेड आणि डायरेक्टरचा कंपनीला रामराम

  नॉर्डपासच्या अहवालानुसार 2002 मध्ये वापरल्या जाणार्‍या 200 सर्वात सामान्य पासवर्डपैकी 73 टक्के हे मागील वर्षीसारखेच होते. तसेच या यादीतील 83 टक्के पासवर्ड एका सेकंदात हॅक केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे कोविड-19 नंतर किराणा माल ऑनलाइन ऑर्डर करण्याच्या युजर्सच्या बदलत्या सवयींमुळे ‘BigBasket’ भारतातील चौथा सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड म्हणून वापरल्याचं मानलं जातं.

  'iloveyou' हा पासवर्ड खूप लोकप्रिय

  अनेक युजर्सला पासवर्डच्या माध्यमातून प्रेम किंवा द्वेष व्यक्त करणं आवडतं असल्याचेही या अहवालात समोर आलं आहे. उदाहरणार्थ, 'iloveyou' आणि या शब्दांचं इतर भाषांमधील भाषांतर भारतासह अनेक देशांमध्ये पासवर्ड म्हणून वापरलं जातं. पासवर्ड म्हणून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या शब्दामध्ये 'iloveyou' हा शब्द 81 व्या क्रमांकावर आहे.

  दरम्यान, व्यक्ती आणि मोठ्या कंपन्यांवर होणारे सायबर हल्ले पाहता, सहज क्रॅक करता येण्याजोग्या पासवर्डचा वापर धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच नेहमी कठीण पासवर्ड वापरणं फायद्याचं ठरतं. अन्यथा तुमचं बँक अकाउंट, सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड हॅक झाल्यास त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. तसंच तुमचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं.व

  First published:
  top videos

   Tags: Password