मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /या फ्लॅटमध्ये गृहोपयोगी सर्व इलेक्ट्रिकल साहित्य, तरी वीज बील शून्य! तुम्हीही ट्राय करू शकता ही पद्धत

या फ्लॅटमध्ये गृहोपयोगी सर्व इलेक्ट्रिकल साहित्य, तरी वीज बील शून्य! तुम्हीही ट्राय करू शकता ही पद्धत

घरातील प्रत्येक इलेक्ट्रिकल मशीन आणि घरगुती उपकरणं पूर्णपणे सौरऊर्जेवर चालतात. मनोजित यांनी पाचव्या मजल्यावर छतावर सोलर पॅनल बसवली आहेत.

घरातील प्रत्येक इलेक्ट्रिकल मशीन आणि घरगुती उपकरणं पूर्णपणे सौरऊर्जेवर चालतात. मनोजित यांनी पाचव्या मजल्यावर छतावर सोलर पॅनल बसवली आहेत.

घरातील प्रत्येक इलेक्ट्रिकल मशीन आणि घरगुती उपकरणं पूर्णपणे सौरऊर्जेवर चालतात. मनोजित यांनी पाचव्या मजल्यावर छतावर सोलर पॅनल बसवली आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Kolkata, India

    कोलकाता 24 मार्च : पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील मेकॅनिकल आयकॉन अशी ओळख असलेल्या मनोजित मंडल या व्यक्तीच्या फ्लॅटचं वीज बिल शून्य आहे. त्यांच्या फ्लॅटमध्ये एसीपासून इंडक्शन ओव्हन आणि किचन चिमणीपर्यंत जवळपास सर्व उपकरणं आहेत. महिनाअखेरीस इतर लोकांना जास्त वीज बिल येत असताना मनोजित मोंडल यांना मात्र शून्य रुपये वीज बिल येतं. कारण, मनोजित यांच्या 'मॉडिफाइड सोलर पॉवर्ड फ्लॅट'मधील सर्व उपकरणं सौर उर्जेवर चालतात. त्यामुळे मनोजित यांची दरमहा तीन ते 3.5 हजार रुपयांची बचत होते.

    बांकुरा जिल्ह्यातील काटजुरीडंगा येथील रहिवासी असलेले मनोजित मोंडल आपल्या परिसरात चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांनी सौरऊर्जेवर चालणारी मॉडिफाईड कार तयार करून सर्वांना प्रभावित केलं आहे. मनोजित यांची 'मॅजिक कार' अवघ्या 35 रुपयांत 100 किलोमीटर अंतर धावते. जर, तुम्ही मनोजितच्या गॅरेजमधून घरात प्रवेश केलात तर तुम्हाला पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारं इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर दिसेल.

    घरातील प्रत्येक इलेक्ट्रिकल मशीन आणि घरगुती उपकरणं पूर्णपणे सौरऊर्जेवर चालतात. मनोजित यांनी पाचव्या मजल्यावर छतावर सोलर पॅनल बसवली आहेत. त्यानंतर मनोजितच्या फ्लॅटच्या बाल्कनीत बसवलेल्या इन्व्हर्टरद्वारे सोलर पॅनलमधून निघणारा डीसी करंट एसी करंटमध्ये बदलला जातो. ही संपूर्ण यंत्रणा आपल्या घरात बसवण्यासाठी मनोजित यांनी अडीच लाख रुपये खर्च केले आहेत.

    ही 'वन टाइम इन्व्हेस्टमेंट' केल्यानंतर मनोजित यांचा वीज वापर जवळपास शून्यावर गेला आहे. आपण हा सेटअप कोणत्याही घरात बसवू शकतो, असं मनोजित यांनी सांगितलं. ते म्हणाले, "हा संपूर्ण सेटअप बसवण्यासाठी मी अडीच लाख रुपये खर्च केले आहेत आणि गेल्या पाच वर्षांपासून मी याचा वापर करत आहे. त्यामुळे सेटअपसाठी खर्च केलेली संपूर्ण रक्कम आता वसूल झाली आहे. आता माझा वीज वापराचा खर्च शून्य आहे. जर कोणाला हाच सेटअप घरामध्ये लावायचा असेल ते अगदी सहज करू शकतात."

    सध्या जगभर ऊर्जेचं संकट आहे. जीवाश्म इंधन मर्यादित आहे त्यामुळे जीवाश्म इंधनाची किंमत कालांतरानं प्रचंड वाढेल. शिवाय, जीवाश्म इंधनामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं. त्यामुळे पर्यावरणास अनुकूल मार्गानं ऊर्जा संकट सोडवण्याचा एक चांगला पर्याय म्हणून सौर ऊर्जेकडे पाहिलं जात आहे. ही बाब लक्षात घेऊनच मनोजित यांनी सौरऊर्जेचा पर्याय निवडला. सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी पूर्ण होते आणि पैसेही वाचतात. मनोजित दरवर्षी वीज बिलात किमान 35 ते 40 हजार रुपयांची बचत करत आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Electricity bill, Local18