Home /News /technology /

Smartphone : तुमचा स्मार्टफोन हरवलाय का? 'या' ट्रिक्स वापरून येईल शोधता

Smartphone : तुमचा स्मार्टफोन हरवलाय का? 'या' ट्रिक्स वापरून येईल शोधता

 तुमचा स्मार्टफोन हरवला असेल किंवा कोणीतरी चोरला असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोन नंबरवर कॉल करून पाहा.

तुमचा स्मार्टफोन हरवला असेल किंवा कोणीतरी चोरला असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोन नंबरवर कॉल करून पाहा.

तुमचा स्मार्टफोन हरवला असेल किंवा कोणीतरी चोरला असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोन नंबरवर कॉल करून पाहा.

    मुंबई, 12 एप्रिल : आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन (Smart phone) असणं ही चैनीची नव्हे, तर गरजेची वस्तू झाली आहे. बहुतांश कामांसाठी आपण स्मार्टफोनवर अवलंबून राहू लागलो आहोत. म्हणूनच, स्मार्टफोन हरवला (Smartphone lost) किंवा चोरी झाला तर आपल्या घरातल्या सदस्याचा नंबरसुद्धा ठाऊक नसतो, अशी वेळ अनेकांवर येऊ शकते. त्यामुळेच माणसांची अनेकदा फजिती होते. फोन हरवला तर तो शोधण्यासाठी काही ट्रिक्स (Tricks) वापरल्या जाऊ शकतात. स्मार्टफोनच्या माध्यमातून आज-काल अनेक कामं घरबसल्या करता येतात. त्यातही गेल्या दोन वर्षांच्या कोविड काळात आपण स्मार्टफोनवर जास्तच अवलंबून राहू लागलो आहोत. इतकं, की मोबाइल फोन जर हरवला किंवा चोरी झाला तर आपलं सगळं कामच खोळंबून जातं. मोबाइल फोन हरवल्यानंतर तो शोधून काढण्यासाठी काही ट्रिक्सचा वापर करता येतो. त्या ट्रिक्सद्वारे स्मार्टफोन सोप्या पद्धतीनं ट्रॅक करता येतो आणि अगदी स्विच ऑफ असला तरीही.. तुमचा स्मार्टफोन हरवला असेल किंवा कोणीतरी चोरला असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोन नंबरवर कॉल करून पाहा. तुमचा फोन आसपास कुठे असेल असंही असू शकतं. एखाद्या भल्या व्यक्तीला तुमचा फोन सापडला असेल, तर फोन केल्यानंतर तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. शक्यतो फोनवर पासवर्ड सेट करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून तो कोणीही अ‍ॅक्सेस करू शकणार नाही आणि तो शोधण्यास तुम्हालाही वेळ मिळेल, या बद्दलचं वृत्त 'झी न्यूज'नं प्रसिद्ध केलं आहे. तुम्ही अँड्रॉइड युझर असाल, तर फोन हरवल्यानंतर तो शोधण्यासाठी अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजरमध्ये फाइंड माय डिव्हाइस या फीचरचा वापर करू शकता. अँड्रॉइड डिव्हाइसची लोकेशन ट्रॅकिंग सर्व्हिस योग्य रीतीने काम करायला हवी असेल, तर तुमच्या फोनचं जीपीएस फीचर ऑन असायला हवं. अन्यथा हे फीचर कोणत्याच कामाचं नाही. तुम्ही अँड्रॉइड डॉट कॉम स्लॅश फाइन्ड (android.com/find) वर साइन इन करून तुमच्या फोनचा माग घेऊ शकता. असं केल्यानंतर तुम्हाला 'लॉस्ट फोन'चा पर्याय दिसेल. त्या पर्यायाच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन सोप्या पद्धतीनं ट्रॅक करू शकता आणि त्यामधला डेटाही डिलिट करू शकता. तुम्ही आयफोन (iPhone) युझर असलात, तर सर्वप्रथम तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवरून आपल्या अ‍ॅपल आयडीवर लॉग-इन करून 'लॉस्ट मोड' अ‍ॅक्टिव्हेट करा. तुम्ही अ‍ॅपलच्या फाइन्ड माय आयफोन (iPhone) या फीचरचाही वापर करू शकता. फाइन्ड माय नेटवर्कच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन स्विच ऑफ झाल्यानंतर 24 तासांनंतरही ट्रॅक करू शकता. तुमच्याकडे दुसरं अ‍ॅपल डिव्हाइस नसेल, तर तुम्ही आयक्लाउड डॉट कॉम (icloud.com) या वेबसाइटवर जाऊन या फीचर प्रयोग करू शकता.
    First published:

    पुढील बातम्या