लॅपटॉप शटडाऊन न करता झोपणं पडलं महागात, थोडक्यात वाचला जीव

लॅपटॉप शटडाऊन न करता झोपणं पडलं महागात, थोडक्यात वाचला जीव

एका नेटवर्किंग इंजिनिअरला त्याचा लॅपटॉप शटडाऊन न करता स्लीप मोडमध्ये ठेवणं महागात पडलं.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : आपल्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे अनेकदा आग लागण्याचे प्रकार घडतात. शॉर्ट सर्किटमुळे किंवा संबंधित उपकऱणांमध्ये बिघाड झाल्याने त्यांचा स्फोटही होतो. कधी कधी यामुळे जिवित हानीही होते. आता एका लॅपटॉपमुळे संपूर्ण घरालाच आग लागल्याची घटना घडली आहे. एका नेटवर्किंग इंजिनिअरला त्याचा लॅपटॉप शटडाऊन न करता स्लीप मोडमध्ये ठेवणं महागात पडलं. त्याने लॅपटॉप तसाच ठेवला आणि निघून गेला. त्यानंतर अचानक लॅपटॉपला आग लागली आणि ती फ्लॅटमध्ये सर्वत्र पसरली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गाझियाबादमधील राजनगर एक्सटेंशनच्या रीव्हर हाईट्स सोसायटीमध्ये राहुल सिंग हे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. नोएडातील एका कंपनीत ते काम करतात. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास लॅपटॉपवर काम करत असतानाच त्यांना झोप आली. तेव्हा काम बंद केल्यानंतर त्यांनी लॅपटॉप शटडाऊन न करता स्लीपमोडला ठेवला आणि झोपले.

सकाळी उठल्यानंतर जेव्हा राहुल यांनी पाहिलं तर लॅपटॉप ज्या खोलीत होता ती खोली धुराने भरली होती. त्यानंतर लॅपटॉप जळत असल्याचं आणि अंथरूण पेटलेलं दिसलं. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. त्यांनी आग नियंत्रणात आणली.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता समजलं की, रात्री लॅपटॉपवर काम संपल्यानंतर तो शटडाऊन न करता तसाच स्लीप मोडवर ठेवला. घरात आग लागली तेव्हा बाल्कनीत गेल्याने राहुल कुमार वाचले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: technology
First Published: Nov 28, 2019 08:30 AM IST

ताज्या बातम्या