मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू' (Koo) मध्ये मोठी भरती; अभियांत्रिकी, प्रॉडक्ट्स, कम्यूनिटीच्या लोकांना संधी

स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू' (Koo) मध्ये मोठी भरती; अभियांत्रिकी, प्रॉडक्ट्स, कम्यूनिटीच्या लोकांना संधी

स्वदेशी किंवा भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू' (Koo) पुढील एका वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून 500 पर्यंत नेणार आहे. यासाठी कंपनी अभियांत्रिकी, प्रोडक्ट्स आणि कम्यूनिटी मॅनेजमेंटमध्ये लोकांना भरती करून घेण्याचा विचार करत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : स्वदेशी किंवा भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कू' (Koo) पुढील एका वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून 500 पर्यंत नेणार आहे. यासाठी कंपनी अभियांत्रिकी, प्रोडक्ट्स आणि कम्यूनिटी मॅनेजमेंटमध्ये लोकांना भरती करून घेण्याचा विचार करत आहे. ट्विटर (Twitter)  या सोशल मीडिया साईट स्वदेशी पर्याय म्हणून लोकांसाठी 'कू' सोशल मीडिया साईटला लोकांसमोर आणलं जात आहे. 'कू'मध्ये सध्या 200 कर्मचारी कार्यरत आहेत. कूचे सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, कंपनीमध्ये सध्या 200 कर्मचारी आहेत. अभियांत्रिकी, प्रोडक्ट्स आणि कम्यूनिटी मॅनेजमेंटसारख्या विभागांमध्ये नवीन नियुक्त्यांसह कर्मचारी वर्गाची संख्या पुढील एका वर्षात 500 पर्यंत पोहोचेल. या व्यतिरिक्त ही कू सोशल मीडिया कंपनी शासकीय संबंध, मार्केटिंग, ब्रँड मार्केटिंग सारख्या क्षेत्रात नवीन कर्मचारी भरती करणार आहे. परंतु, यामध्ये छोट्या टीम काम करतील. राधाकृष्ण म्हणाले, "आम्हाला चांगल्या आणि प्रतिभावंत लोकांना या कामासाठी घ्यायचे आहे. ते कूसाठी काम करू शकतात आणि भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक पातळीवर घेऊन जाऊ शकतात. अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावत यांनी KOO सुरू केलं अप्रमेय राधाकृष्ण आणि मयांक बिदावत यांनी गेल्या वर्षी सोशल मीडियावर व्यक्त होण्याबरोबरच भारतीय भाषांचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात राहण्याच्या उद्देशानं कू KOO सुरू केलं. हे हिंदी, मराठी, तेलगू आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे वाचा - अमानूष! घटस्फोट मिळण्यासाठी क्रूरतेचा कळस, गर्भवती पत्नीला टोचलं HIVचं इंजेक्शन कूने 1 कोटी युजरचा टप्पा पार केला भारतातील अनेक केंद्रीय मंत्री आणि सरकारी विभागांनी स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कूचा वापर सुरू केल्यानंतर गेल्या काही महिन्यांत कूच्या युजर संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या वापरकर्त्यांची संख्या एक कोटीवर पोहोचली. येत्या एका वर्षात 10 कोटी युजर पर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
First published:

Tags: Jobs, Koo App, Social media

पुढील बातम्या