Home /News /technology /

स्मार्टफोनचा डेटा बॅकअप घेण्याचा विचार करताय? मग या पद्धतीनं घ्या SMS आणि Apps बॅकअप

स्मार्टफोनचा डेटा बॅकअप घेण्याचा विचार करताय? मग या पद्धतीनं घ्या SMS आणि Apps बॅकअप

आता तुमची Google Search History पासवर्डने सुरक्षित होईल.

आता तुमची Google Search History पासवर्डने सुरक्षित होईल.

डेटा बॅकअप कसा घेणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत

    मुंबई, 25 जुलै: एखादा नवीन स्मार्टफोन घेताना किंवा जुना स्मार्टफोन (Smartphone) बिघडल्यास आपल्या बॅकअपची (Data Backup) गरज असते. बॅकअप म्हणजे आपल्या फोनचा जुना डेटा किंवा सध्याचा डेटा परत आणणे. मात्र अनेकांना बॅकअप नक्की कसं घेणार याबद्दल माहिती नसते. अनेकदा बॅकअप घेताना डेटा चुकून गायब होतो, मात्र आता चिंता करू नका . डेटा बॅकअप कसा घेणार (How to smartphone Backup) याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. SMS बॅकअप यासाठी SMS Backup+ डाउनलोड करा आणि ओपन करून कनेक्टवर क्लिक करा. यानंतर पॉपअपमध्ये आपलं Gmail अकाउंट शोधा आणि ऍक्सेसची परवानगी द्या. पुन्हा एकदा अप्लिकेशनमध्ये जा आणि बॅकअपवर क्लिक करा. यानंतर तुमचे सर्व टेक्स्ट मेसेज तुमच्या Gmail अकाउंटवर सेव्ह होतील. यामुळे तुम्ही तुमचे टेक्स्ट मेसेज Gmail वर वाचू शकता. या मेसेजना SMS Backup+ रिस्टोरवर क्लिक करा आणि पॉपअपवर 'ok' वर क्लिक करा. SMS Backup+ ला  डिफॉल्ट एसएमएस अप्लिकेशन म्हणून निवडा. यानंतर हे अप्लिकेशन तुमच्या टेक्स्ट मेसेजचे बॅकअप घेईल. अप्लिकेशन बॅकअप यासाठी सर्वात पहिले ES File Explorer डाउनलोड करा आणि Homepage वर क्लिक करा. वरती असलेल्या अँड्रॉइड रोबोटच्या खाली असलेल्या अप्लिकेशनवर क्लिक करा. जोपर्यंत कुठल्या आयकॉनवर चेकमार्क दिसत नाही तोपर्यंत होल्ड करून ठेवा. आणि सर्व आयकॉन्सना सिलेक्ट करा. यानंतर खाली तुम्हाला बॅकअपचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. यामुळे तुमचे apk फाईल्स सेव्ह होतील. सेव्ह झालेत की नाही हे बघण्यासाठी User apps वर क्लिक करा आणि Backed-up Apps मध्ये जा. यानंतर तुम्ही बॅकअप घेतलेल्या अप्लिकेशन्स पुन्हा इन्स्टॉल करू शकता. या फाईल्स तुम्ही पेन ड्राइव्हमध्ये सेव्ह करून ठेऊ शकता. नवीन मोबाईल घेतल्यास या फाईल्स तुम्ही कॉपी करू शकता. मीडिया, मेसेज आणि सिस्टम बॅकअप यासाठी आपल्या फोनला USB केबलने कनेक्ट करा. जर तुम्ही Mac वापरत असाल तर Android File Transfer ही अप्लिकेशन आहे का हे तपासून घ्या. यानंतर कम्युटरवर My Computer ओपन करा. ज्या फाईल्सचा बॅकअप ग्घ्यायचा आहे त्या SD फाईलला नेव्हिगेट करून कॉपी करून घ्या. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फाईल्सचा बॅकअप घेऊ शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: User data

    पुढील बातम्या